Abhyagatansathi Nishchit Vel Rakhiv
Abhyagatansathi Nishchit Vel Rakhiv
Fixed time reserved for visitors
abhyagatansathi nishchit vel rakhun
thevanebabat
Regarding reserving a specific time for visitors
अभ्यागतांसाठी निश्चित वेळ राखून ठेवणेबाबत
महाराष्ट्र शासन महसूल विभाग (भूसंपादन सह) शासन निर्णय क्रमांकः बैठक-२०२६/प्र.क्र. ७२/समन्वय-०३, मंत्रालय, मुंबई
दिनांक: ०९ सप्टेंबर, २०२६
वाचा –
१) सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र. संकीर्ण २०२३/प्र.क्र.०३/१८ (र. व का.), दि.२८.०३.२०२३
शासन परिपत्रक
राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत अनेक धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत. सदर धोरणात्मक निर्णय राबविण्याची जबाबदारी राज्य शासनाच्या क्षेत्रीय कार्यालयांकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे तालुका, जिल्हा, विभाग अशा स्तरांवर राज्य शासनाची कार्यालये कार्यरत असून या कार्यालयांशी सर्वसामान्य जनतेचा थेट संबंध येत असतो. जनतेच्या तक्रारी समजुन घेणे, त्यांच्या अडीअडचणी दूर करणे, शासनाच्या विविध योजना इत्यादींची माहिती देणे, इत्यादी कामे स्थानिक कार्यालयातील अधिकारी यांनी करणे अपेक्षित आहे. त्यामुळे जनमानसांत लोकाभिमुख शासनाची प्रतिमा तयार होते. परंतू शासनाच्या असे निर्दशनास आले आहे की, जेव्हा लोक तक्रारी / गाऱ्हाणे घेऊन स्थानिक कार्यालयात जातात तेव्हा अधिकारी / कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसतात. लोकांच्या तक्रारींची दखल न घेतल्याने व त्यांचे समाधान न झाल्याने ही सर्व जनता त्यांच्या तक्रारी/म्हणणे घेऊन मंत्रालयात येतात. सबब लोकांच्या तक्रारींची दखल घेणे, त्यांचे समाधान करण्यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात याव्यात.
१) राखीव वेळः कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांसाठी मध्यवर्ती नोंदवही ठेवावी. प्रत्येक महसूल अधिकाऱ्याने (जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व नायब तहसीलदार) सर्व कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी ०३.०० ते ०५.०० ही वेळ सर्वसामान्य नागरिकांच्या भेटीसाठी आणि त्यांच्या तक्रारी निवारणासाठी अनिवार्यपणे राखीव ठेवावी.
२) बैठकांचे नियोजनः सदर राखीव वेळेत (दुपारी ३ ते ५) कोणत्याही अंतर्गत बैठका अथवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे (VC) नियोजन करू नये, जेणेकरून नागरिकांना पूर्ण वेळ देता येईल.
३) सूचना फलकः या राखीव वेळेबाबतची माहिती देणारा फलक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आणि अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर दर्शनी भागात ठळकपणे लावण्यात यावा.
४) अपवादात्मक परिस्थिती: जर काही अत्यंत तातडीच्या शासकीय कामामुळे / नियोजित शासकीय
दौऱ्यामुळे/मा. मंत्री महोदयांच्या किंवा उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीमुळे अधिकारी कार्यालयात उपस्थित राहू शकणार नसतील, तर तशी पूर्वकल्पना सूचना फलकावर प्रसिद्ध करावी आणि नागरिकांचे अर्ज स्वीकारण्यासाठी पर्यायी सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करावी.
०२. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६०९०९१६४३००२३४८ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
AAYLANE VYANKATESH GANPAT
Digitally signed by AAYLA AND FOREST DEPARTMENT, SHTRA REVENUE 20-640c07ab14867655721cc25cshe3437227 89AP9870 GANPAT 21520CFE CHAAYLANE VYANKATESH
(व्यंकटेश आयलाने) कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन