Rashtriya Shikshak Puraskar Aavedane online Link
Rashtriya Shikshak Puraskar Aavedane online Link
san 2026 che rashtriya shikshak puraskar aavedane online magavinyababat.
Regarding online solicitation of applications for the National Teacher Award for the year 2026
क्र. शिसंमा.online राष्ट्रीय/शिपु/२०२६/ए-२/विद्या शाखा/
दि. १९/०६/२०२६
महत्वाचे/कालमर्यादित/ई-मेल व्दारे
विषय :- सन २०२६ चे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार आवेदने ऑनलाईन मागविण्याबाबत.
संदर्भ :- शासन पत्र क्र. पीटीसी-२०२६/प्र.क्र. ४६ अ/टीएनटी-४ दि. १९/०६/२०२६ पत्रासोबतचे सहपत्र सहसचिव (inst. & Trng.) / भारत सरकार, शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, कर्तव्य भवन नवी दिल्ली यांचे पत्र क्र. डी.ओ. १-३/२०२६- एनएटी दि.१५/०६/२०२६ चे पत्र व त्यासोबतचे सहपत्र.
उपरोक्त संदर्भाधिन शासन पत्रासोबतच्या सहपत्रात सहसचिव (inst. & Trng.) / भारत सरकार, शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, कर्तव्य भवन नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय पुरस्कार २०२६ साठी मार्गदर्शक सूचना सुधारित केल्या आहेत. ऑनलाईन स्वः नामांकन करण्यासाठी दि. १५ जून, २०२६ पासून
Rashtriya Shikshak Puraskar Online Apply Link Web Portal Link
https://nationalawardstoteachers.education.gov.in
या वेबपोर्टलवर स्वः नामांकन सुरू होणार आहे. त्यानुसार राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांनी आपली स्वः नामांकने
https://nationalawardstoteachers.education.gov.in
वेबपोर्टलवर दिनांक १० जुलै २०२६ पर्यंत सादर करावयाची आहेत. तसेच अर्जदाराकडून स्वः नामांकने अंतिम करून दिनांक १३ जुलै, २०२६ पर्यंत सादर करावयाची आहेत. या
दिनांक १५ जून, २०२६ पासून वेबपोर्टलवर ऑनलाईन स्वः नामांकन करण्यासाठी लिंक सुरू करण्यात आली आहे. दिनांक १० जुलै, २०२६ पर्यंत इच्छुक शिक्षकांनी राष्ट्रीय पुरस्कारासाठी ऑनलाईन स्वः नामांकने स्विकारण्याची मुदत आहे. तसेच अर्जदाराकडून स्वः नामांकने अंतिम करून दिनांक १३ जुलै, २०२६ पर्यंत सादर करावयाची आहेत. आपल्या जिल्हयातील स्थानिक वर्तमानपत्रातून मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी देण्यात यावी. सोबत प्रसिद्धी पत्रकाचा नमुना सादर केला आहे.
शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा (न.पा./म.न.पा./जि.प.), मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित शाळा (प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक) शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक ऑनलाईन स्वः नामांकन भरण्यास पात्र आहेत.
अधिक माहिती व सविस्तर सूचनांसाठी सोबत माहिती प्रत जोडली आहे. सहसचिव (inst. & Trng.)/ भारत सरकार, शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांनी दिलेल्या सोबतच्या वेळापत्रकानुसार व मार्गदर्शक सूचनानुसार विहित वेळेत अंमलबजावणी करावी.
Digitally signed by PALKAR MAHESH MADHUKAR Date: 19-06-2026 18:42:29
(डॉ. महेश पालकर)
शिक्षण संचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
शिक्षण संचालनालय, म.रा., पुणे
प्रत :-

१) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मुंबई ४०० ०३२ माहितीसाठी सविनय सादर
२) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, मुंबई ४०० ०३२ माहितीसाठी सविनय सादर
३) मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे ४११००१ माहितीस्तव सविनय सादर..
४) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना माहितीस्तव.
प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग,
२) शिक्षण अधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषदा सर्व,
३) शिक्षण निरीक्षक (बृहन्ममुंबई) (उत्तर/दक्षिण/पश्चिम)
४) शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी, सर्व महानगरपालिका