YCMOU Online Admission All Courses Notifications Prospectus Portal Link
YCMOU EXAM UPDATE
सूचना पत्र क्र. १०
बी.एड. सेवांतर्गत (P108) शिक्षणक्रम २०२६-२८ प्रवेश कागदपत्रे पडताळणी अधिकार पत्राबाबत (Authority Letter)
बी.एड. सेवांतर्गत (P108) शिक्षणक्रम २०२६-२८ तुकडीच्या प्रवेशासाठीची कागदपत्रे पडताळणी विभागीय केंद्रांवर दि. १८ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत होणार आहे. बी.एड. प्रवेशासाठी अर्ज करणारे जे अर्जदार कागदपत्रे पडताळणीसाठी वैद्यकीय, तांत्रिक व शासकीय कारणांमुळे उपस्थित राहू शकणार नाही, त्या अर्जदारांनी सोबत जोडलेले अधिकार पत्र (Authority Letter) देऊन, अधिकार प्राप्त व्यक्तीला मूळ कागदपत्र, छायंकित प्रत (झेरॉक्स संच) व स्वतःचे मूळ आधार कार्ड घेऊन, आपल्या जिल्ह्यांच्या कागदपत्रे पडताळणीसाठी दिलेल्या तारखेला संबंधित विभागीय केंद्रावर उपस्थित राहता येईल.
कागदपत्रे पडताळणीची व अध्यापन पध्दती बाबतची सर्व जबाबदारी ही संबंधित अर्जदाराचीच असेल याची कृपया नोंद घ्यावी.
संचालक,
शिक्षणशास्त्र विद्याशाखा
अध्यक्ष,
बी.एड. प्रवेश समिती
जा.क्र.: यचममुवि/नोंदणी/२०२५/229
दि. १३/०८/२०२५
सूचना पत्र क्र. 09
सेवांतर्गत बी. एड. (P80) शिक्षणक्रम सन २०२५-२७ प्रवेश कागदपत्रे पडताळणी वेळापत्रक
सेवांतर्गत बी.एड. (P80) शिक्षणक्रम २०२५-२७ प्रवेशासाठीची कागदपत्रे पडताळणीचे वेळापत्रक सोबत जोडल्याप्रमाणे आहे, याची सर्व उमेदवारांनी (प्रवेशेच्छुकांनी) नोंद घ्यावी. आपल्या जिल्ह्याच्या वेळापत्रकाप्रमाणे संबंधित उमेदवाराने कागदपत्रे पडताळणीसाठी विभागीय केंद्रावर मूळ कागदपत्रे व छायांकित (झेरॉक्स) संच तसेच बी. एड. माहितीपुस्तिकेतील ‘२, ३ व ४’ परिशिष्टांसह उपस्थित राहावे. आपण संबंधित दिनांकास अनुपस्थित राहिल्यास आपल्याला कोणत्याही सबबीवर कागदपत्रे पडताळणीची पुन्हा संधी दिली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
अध्यक्ष,
बी. एड. प्रवेश समिती
संचालक, शिक्षणशास्व विद्याशाखा
सोबत : विभागीय केंद्र कागदपत्रे पडताळणी समिती जिल्हानिहाय वेळापत्रक.
जावक क्र. : नोंदणी/2026/630
दिनांक : 12.08.2026
शुल्क सवलतीसंदर्भात सूचनापत्रक
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे प्रवेश घेणाऱ्या बंदी बांधव, दृष्टिबाधित, अनाथ, एचआयव्ही बाधित, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे पाल्य, नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थी, आर्मी विद्यार्थी तसेच तृतीय पंथी या प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बी.एड. (सेवांतर्गत), बी.एड. (विशेष), शालेय व्यवस्थापन पदविका, एम.ए. शिक्षणशास्त्र तसेच एम.बी.ए हे शिक्षणक्रम वगळून इतर शिक्षणक्रमांच्या माहितीपुस्तिकेत नमूद केल्यानुसार शुल्क सवलत लागू करण्यात आलेली आहे.
तथापि, बी.एड. (सेवांतर्गत), बी.एड. (विशेष), शालेय व्यवस्थापन पदविका, एम.ए. शिक्षणशास्त्र हे शिक्षणक्रम सेवेत असलेल्या शिक्षकांसाठी असल्यामुळे प्रवेशित विद्यार्थी अर्थाजन करीत असतात. तसेच एम.बी.ए. शिक्षणक्रम हा व्यावसायिक शिक्षणक्रम आहे. या बाबींचा विचार करून विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने वरील प्रवर्गातील विद्यार्थ्यांना माहितीपुस्तिकेत नमूद करण्यात आलेले शिक्षणक्रम शुल्क भरून प्रवेश घ्यावा लागेल असा ठराव संमत केला आहे.
वरील प्रवर्गातील विद्यार्थ्यांना बी.एड. (सेवांतर्गत), बी.एड. (विशेष), शालेय व्यवस्थापन पदविका, एम.ए. शिक्षणशास्त्र तसेच एम.बी.ए. या शिक्षणक्रमांना प्रवेश घेताना शुल्कात कोणतीही सवलत लागू राहणार नाही याची कृपया संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
नोंदणी कक्ष
सचालक
विद्यार्थी सेवा विभाग
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिक
एन.सी.टी.ई. मान्यताप्राप्त शिक्षणशास्त्र पदवी शिक्षणक्रम (बी.एड.) (P108)
प्रवेश सूचना : शैक्षणिक वर्ष २०२६-२८
प्रवेश-पात्रतेच्या अटी
(१) डी.एड./डी.टी.एड./डी.एल.एड. डिप्लोमा पूर्ण केलेले आणि महाराष्ट्रातील सरकारमान्य प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून किमान दोन वर्षांचा अनुभव आणि सध्या सेवेत असणे आवश्यक.
(२) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी खुल्या प्रवर्गासाठी किमान ४९.५०% गुण व राखीव प्रवर्गासाठी ४४.५०% गुण.
प्रवेश-अर्ज व माहितीपुस्तिका ऑनलाईन विद्यापीठाच्या
http://ycmou.digitaluniversity.ac
या वेबसाईटवर उपलब्ध आहे. प्रक्रिया शुल्क खुल्या प्रवर्गासाठी रु. १०००/- व राखीव प्रवर्गासाठी रु. ५००/- ऑनलाईन भरून अर्ज ऑनलाईन सादर करावा.
प्रवेश प्रक्रिया सुरू
कालावधी : २७ जुलै ते ०३ ऑगस्ट २०२६ (रात्री ११.५९ मि.)
अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळास भेट द्यावी.
http://ycmou.digitaluniversity.ac
डॉ. गोविंद कतलाकुटे कुलसचिव (प्र.)
जा.क्र.पनिका/मे 2026/1987
दि. 16/03/2026
परिपत्रक
क्र. 85/ मे 2026 परीक्षा
विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील जुलै-2025 व जानेवारी-फेब्रुवारी 2026 या प्रवेश सत्रातील प्रवेशित नियमित व जानेवारी 2026 या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची उन्हाळी परीक्षा, विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, दि. 28 मे 2026 पासून ऑफलाईन पद्धतीने (विवरणात्मक Descriptive) महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावर आयोजित केल्या जाणार आहेत.
🙋 हेही वाचा –
या परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी (Repeater) विद्यार्थ्यासाठी परीक्षा अर्ज (Repeater Form) भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले असून त्याबाबतचे सूचनापत्र विद्यापीठ पोर्टलवर प्रसिद्ध केलेले आहे. तसेच या परीक्षेचे वेळापत्रके व सूचनापत्र यथावकाश पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येतील. सर्व संबंधित अभ्यासकेंद्रांनी व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, परीक्षा आयोजन विषयक सर्व बाबींकरीता विद्यापीठ पोर्टलला वेळोवेळी भेट द्यावी /माहिती पहावी. विद्यार्थी अथवा अभ्यासकेंद्राना परीक्षाविषयक सर्व बाबींकरिता स्वतंत्रपणे कळवले जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
विद्यापीठाचे पोर्टल
Click Tab :
https://ycmou.digitaluniversity.ac
: Examination Tab – May 2026
(भटूप्रसाद पाटील)
परीक्षा नियंत्रक
ALSO READ 👇
YCMOU Online Admission All Courses Notifications Prospectus Portal Link
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
एन.सी.टी.ई. मान्यताप्राप्त शिक्षणशास्त्र पदवी शिक्षणक्रम (बी.एड.) (P80)
प्रवेश सूचना : शैक्षणिक वर्ष २०२५-२७
प्रवेश-पात्रतेच्या अटी
(१) डी.एड./डी.टी.एड./डी.एल.एड. डिप्लोमा पूर्ण केलेले आणि महाराष्ट्रातील सरकारमान्य प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून किमान दोन वर्षांचा अनुभव आणि सध्या सेवेत असणे आवश्यक.
(२) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी खुल्या प्रवर्गासाठी किमान ५०% गुण व राखीव प्रवर्गासाठी ४५% गुण.
प्रवेश-अर्ज व माहितीपुस्तिका ऑनलाईन विद्यापीठाच्या
http://ycmou.digitaluniversity.ac
या वेबसाईटवर उपलब्ध आहे. प्रक्रिया शुल्क खुल्या प्रवर्गासाठी रु. १०००/- व राखीव प्रवर्गासाठी रु. ५००/- ऑनलाईन भरून अर्ज ऑनलाईन सादर करावा.
कुलसचिव
प्रवेश प्रक्रिया सुरू
कालावधी : २५ ते ३१ जुलै २०२५ (रात्री ११.५९ मि.) अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळास भेट द्यावी.
http://ycmou.digitaluniversity.ac
http://www.ycmou.ac.in
Also Read 👇
YCMOU Online Admission All Courses Notifications Prospectus Portal Link
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik
जा.क्र.वि.से.वि/वि.कें./२०२५/13
दिनांक : १७ जानेवारी २०२५
शैक्षणिक सत्र जानेवारी २०२५ चे प्रवेश दिनांक २० जानेवारी २०२५ पासून सुरू होत आहेत. कृषी शिक्षणक्रम, बी.एड. (सेवांतर्गत), बी.एड. (विशेष) आणि विज्ञान विद्याशाखा शिक्षणक्रमाच्या बी.एस्सी व एम.एस्सी. या शिक्षणक्रमांव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांसाठी प्रवेश सुरू होत आहे. ज्या शिक्षणक्रमांसाठी प्रवेश सुरू होणार आहेत, त्यांच्या माहितीपुस्तिका विद्यापीठाच्या 👇
☝️या वेबसाईटवर उपलब्ध आहे. शैक्षणिक सत्र जानेवारी २०२५ च्या प्रवेशाबाबत आपल्या विभागीय केंद्रांतर्गत असलेल्या सर्व

अभ्यासकेंद्रांना अवगत करावे. शैक्षणिक सत्र जानेवारी २०२५ मध्ये ज्या शिक्षणक्रमांसाठी प्रवेश सुरु होणार आहेत, त्यांची जाहिरात सोबत जोडली आहे.
★
(प्रा.डॉ. प्रकाश देशमुख)
संचालक, विद्यार्थी सेवा विभाग
सोबत – शैक्षणिक सत्र जानेवारी २०२५ प्रवेशाबाबतची जाहिरात
प्रत – मा. कुलगुरू यांचे माहितीसाठी सविनय सादर.
प्रति,
विभागीय संचालक/वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची सर्व विभागीय केंद्रे, अमरावती/छ.संभाजीनगर/मुंबई/नागपूर/नाशिक/पुणे/कोल्हापूर/नांदेड
Also Read 👇
YCMOU Online Admission All Courses Notifications Prospectus Portal Link
Yashwantrao Chavan Maharashtra Open University, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,
Nashik
नाशिक
जावक क्र. : नोंदणी/2024/193
दिनांक: 31 मे 2024
सूचनापत्रक क्र. 1/2024-25
१) विद्वत परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार बी.एड., बी.एड. विशेष), शिक्षणक्रमांव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांची सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया खालील तक्यात नमूद केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सुरू होत आहे.
क्र. तपशील
१) ऑनलाईन प्रवेश अर्ज विनाविलंब शुल्क भरण्याची मुदत
मुदत दिनांक 01.06.2024 ते दिनांक 31.07.2024 पर्यंत (संध्याकाळी 11.59 वाजेपर्यंत)
२) विद्यार्थ्यास ज्या शिक्षणक्रमाला प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील होमपेजवर जाऊन Admission या टॅबवर Prospectus (माहितीपुस्तिका) 2024-25 या ठिकाणी विविध शिक्षणक्रमांच्या माहितीपुस्तिका उपलब्ध आहेत.
🙋♂️ हेही वाचाल प्रवेश प्रक्रिया बद्दल अधिक माहिती जाणून घ्या त्यासाठी या ओळीला स्पर्श करा
३) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याने वर नमूद केलेल्या विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे व अचूक भरलेला प्रवेश अर्ज अजरलेला प्रवेश अर्ज सादर करता येईल. काही लाईन पद्धतीने भरून विद्यार्थ्यांस
४) विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या विहित मुदतीतच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा.
👉 Prospectus माहिती पुस्तिका पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 👈
🌐 अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
मार्फत मा. संचालक, विद्यार्थी सेवा विभाग
प्रत: 1) मा. कुलगुरू यांचे माहितीसाठी सविनय सादर
2) मा. प्र-कुलगुरू यांचे माहितीसाठी सविनय सादर
प्रत: 1) सर्व वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार, य.च.म.मु. विद्यापीठाचे विभागीय केंद्र यांनी सदरचे सूचनापत्र
आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व अभ्यासकेंद्रांच्या निदर्शनास आणून द्यावे.
2) सर्व विद्याशाखा/केंद्र/कक्ष
3) एम.के.सी.एल.
4) डाटा प्रोसेसिंग सुपरवायझर, विद्यार्थी सेवा विभाग
उपकुलसचिव
नोंदणी कक्ष




Please inform me about Ph.D. course of YCMOU.
Please inform me about Ph.D. course
For phD when forms will be available at site