Vidyarthi Divas Celebrations
Vidyarthi Divas Celebrations
Vidyarthi Din Sajra
Regarding celebrating this day as “Students’ Day” in all schools and junior colleges in the state on November 7th.
Dr. Babasaheb Ambedkar School Admission/ Entrance Day to be celebrated as “Students’ Day” in all schools and junior colleges.
दिनांक ७ नोव्हेंबर, हा दिवस राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधून “विद्यार्थी दिवस” म्हणून साजरा करण्याबाबत.
दिनांक : २७ ऑक्टोबर, २०१७.
प्रस्तावना :-
दिनांक ७ नोव्हेंबर, १९०० या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतापसिंग हायस्कूल, राजवाडा चौक, जि. सातारा येथे शाळा प्रवेश झाला. त्यांनी शाळेत प्रवेश घेतला त्यावेळी त्यांचे नाव भिवा असे होते. या शाळेच्या रजिस्टरला “१९१४” या क्रमांकासमोर आजही बाल भिवाची स्वाक्षरी असून हा ऐतिहासिक दस्तऐवज शाळा प्रशासनाने जपून ठेवला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन म्हणजे एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहूल म्हटली पाहिजे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पाऊल शाळेत पडल्यामुळेच ते स्वतः सुशिक्षित आणि प्रज्ञावंत झाले आणि करोडो दलितांचे-वंचितांचे उध्दारकर्तेही झाले. ते शाळेत गेल्यामुळेच ज्या संविधानाचा आज सर्वांत आदर्श संविधान म्हणून जगभर गौरव होत असतो, त्या भारतीय संविधानाचे ते शिल्पकारही ठरले.
माझे संविधान माझा अभिमान महत्वपूर्ण माहिती लेख व प्रश्न मंजुषा या ओळीला स्पर्श करा
परिणामतः भारतीय समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मानवी मूल्ये रुजू शकली गेली म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन ही अत्यंत महत्वाची आणि इतिहासाला कुस बदलावयास लावणारी क्रांतिकारी घटना ठरते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आजीवन विद्यार्थी होते. त्यांनी आपला हा विद्या व्यासंग आयुष्याच्या शेवटपर्यंत जपला.
शासन परिपत्रक
आजचा प्रत्येक विद्यार्थी हा या देशाचे भविष्य आहे. त्यामुळे आदर्श विद्यार्थी निर्माण होणे काळाची गरज आहे. शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या कठोर परिश्रमांची जाण सर्व विद्यार्थ्यांना होण्यासाठी दिनांक ७ नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी ” विद्यार्थी दिवस ” म्हणून साजरा करण्यात यावा.
२. “विद्यार्थी दिवस” या उपक्रमांतर्गत सर्व शाळांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन, इत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक क्र. २०१७१०२७१७३६३१००२१ असा आहे. हे शासन परिपत्रक डिजीटल स्वाक्षरी साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापारीवर्तन दिन प्रश्न मंजुषा व लेख वाचा या ओळीला स्पर्श करून
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,
शासन परिपत्रक पीडीएफ मध्ये प्राप्त करण्यासाठी या ओळीला स्पर्श करा
सह सचिव, महाराष्ट्र शासन,
महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन परिपत्रक क्र. औचिमु-२५१६/प्र.क्र.१४७/१७/एस.डी.४. मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई
