UDISE PLUS Updating information of students who have not provided Aadhaar number ज्या विद्यार्थ्यांनी आधार क्रमांक दिलेला नाही त्यांची माहिती अपडेट करणे
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रिडा विभाग
समग्र शिक्षा
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
जा.क्र.मप्राशिप/समग्र शिक्षा/यु-डायस/संगणक/२०२३-२४/650
दिनांक: 23 FEB 2024
प्रति,
१) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व.
२) शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, सर्व.
३) शिक्षण निरीक्षक – उत्तर, दक्षिण व पश्चिम, मुंबई.
४) शिक्षणाधिकारी/प्रशासनाधिकारी, महानगरपालिका, सर्व.
विषयः सन २०२३-२४ यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमधील दि. १५/०२/२०२४ रोजीच्या अहवालानुसार आधार नंबर उपलब्ध न करून दिलेल्या विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करणेबाबत. |
संदर्भ: दिल्ली NIC सेंटर याचे दि. १५/०२/२०२४ रोजीच्या अहवालानुसार. |
यु-डायस प्लस प्रणालीमधील दिनांक १५/०२/२०२४ च्या अहवालानुसार राज्यातील ५,५८,७४४ विद्यार्थ्यांचे आधार नंबर ९९९९ ९९९९ ९९९९ असे नोंदविलेले दिसुन येत आहेत. भारत सरकारच्या सूचनेनुसार सदर विद्यार्थ्यांचे आधार नंबर विद्यार्थ्यांना प्राप्त झाले असल्यास त्या विद्यार्थ्यांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमध्ये अद्ययावत करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तरी अशा विद्यार्थ्यांची माहिती तात्काळ अद्ययावत करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांना आपल्या स्तरावरून आदेशित करावे.
सोबत : जिल्हानिहाय अहवाल.
(सरोज जगताप) सहा. संचालक (कार्यक्रम/प्रशा.) म.प्रा.शि.प., मुंबई.
प्रत : माहितीस्तव सविनय सादर,
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. मा. आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
प्रत : माहिती व उचित कार्यवाहीस्तव,
१. मा. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.
२. मा. शिक्षण संचालक (माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.
सोबत : जिल्हानिहाय अहवाल |