Unhachi Tivrata Shala Sakal Satrat
Unhachi Tivrata Shala Sakal Satrat
Unhachi Tivrata
Intensity of summmer
हेही वाचाल – उष्णतेची लाट मार्गदर्शक सूचना ….वाचा या ओळीला स्पर्श करून
आदेश
जा.क्र.साशा/कार्या-1/4-5/नैसर्गिक आपत्ती/शाळा सुट्टी आदेश/2026/310
दि. १८/06/2026
वाचले :-
- आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005,
- शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय मुंबई यांचे कडील शासन परिपत्रक क्र. संकिर्ण-2019/प्र.क्र.199/एसडी-2 दिनांक 02/08/2019
- शासन परिपत्रक क्र. संकिर्ण-2019/प्र.क्र. 199/एसडी-2 दि. 23/12/2019
४. विभागीय उपसंचालक मुंबई यांचेकडील पत्रक्र. सिउर्स/माध्यमिक/संकिर्ण/2022/7077, दि. 13/07/2026
५. मुख्य कार्यकारी अधि कारी, रा. जि.प. अलिबाग यांचेकडील पत्र क्र. २६३५दि.१८/०६/२०२६
६. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), राजिप, अलिबाग यांचेकडील पत्रदि. १८/०६/२०२६
७. भारतीय हवामान विभाग मुंबई यांचेकडील पूर्वसूचना दिनांक १८/06/202६.
आदेश:-
ज्याअर्थी, संदर्भ क्र.1 कडील अधिनियमाव्दारे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. नैसर्गिक आपत्ती पुर्व, आपत्ती दरम्यान व आपत्ती पश्चात मदत कार्य करण्याची जबाबदारी प्राधिकरणाची आहे.
ज्याअर्थी, उक्त संदर्भ क्र. २ अन्वये प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वसूचनेवरून जिल्ह्यातील त्या-त्या भागातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेवून, संपूर्ण जिल्ह्याकरिता अथवा जिल्ह्यातील स्थानिक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहिर करण्याचे अधिकार सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत.
ज्याअर्थी, संदर्भ क्र.6 कडील भारतीय हवामान खात्याच्या दिनांक 18/06/2026 रोजी पूर्वसूचनेनुसार रायगड जिल्ह्याला उष्ण आणि दमट हवामानासह दुपारी/संध्याकाळी हलक्या पावसाची किंवा गडगडाटासह पावसाची शक्यता (Hot and humid condition. Possibility of light to moderate rain accompanied with thunderstorm towards afternoon/evening) यलो अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे. एलनिनोचा परिणाम म्हणून अद्याप मान्सून जिल्हयामध्ये दाखल झाला नसल्याचे वातारणामध्ये उष्णता व आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने उष्णतेच्या लाटेचा परिणाम जाणवत आहे. सदर हवामानाच्या पूर्वसूचना व उक्त संदर्भ क्र.5 कडील मुख्य अधिकारी, रा.जि.प. अलिबाग यांचे विनंतीनुसार दुपारच्या सत्रातील प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरविणे आवश्यक असल्याचे माझे मत झाले आहे.
त्याअथीं, मी, किशन ना. जावळे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडील शासन निर्णय दि.02/08/2019 अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जिल्हयातील सर्व अंगणवाडी व सर्व प्रकारच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा दि.१९/०६/२०२६ रोजी पासून दि.३०/०६/२०२६ रोजी पर्यंत दुपारच्या सत्राऐवजी सकाळच्या सत्रामध्ये भरविण्याचे आदेश देत आहे.
उक्त आदेशाची अमंलबजावणी तात्काळ करण्यात यावी, सदरहू आदेश आज दिनांक 18/06/2026 रोजी माझे सही व शिक्क्यानिशी दिला आहे.
(किशन ना. जावळे) जिल्हाधिकरी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड अलिबाग.
प्रतः मुख्य कार्यकारी अधिकारी, रा.जि.प. अलिबाग
प्रतः-शिक्षणाधिकारी (प्राथमिक), रा.जि.प. अलिबाग
प्रतः-जिल्हा माहिती अधिकारी, रायगड २/-सदर आदेशास प्रसिध्दी द्यावी.
प्रत: सर्व संबंधितांस.
हेही वाचाल –
अपडेट्स हवामान चेतावणीसाठी या ओळीला स्पर्श करून
हेही वाचाल –
Unhachi Tivrata Shala Sakal Satrat
Unhachi Tivrata Shala Sakal Satrat उन्हाची तीव्रता लक्षात घेता शाळा सकाळ सत्रात भरविणे बाबत
.Considering the intensity of summer, the school will be held in the morning session
वरील परिपत्रके पीडीएफ मध्ये डाऊनलोड करा
