TET Mandatory For Teachers And Calculation Of Exam Attempts प्राथमिक शिक्षकाकरिता (इ. १ ली ते ८ वी) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य करणेबाबत. स्पष्टीकरण संधीची गणना करण्याबाबत.

TET Mandatory For Teachers And Calculation Of Exam Attempts

TET Mandatory For Teachers And Calculation Of Exam Attempts

Calculation of TET exam attempts

TET Exam Compulsory for Teachers

TET Mandatory Opportunities for Teachers

Regarding making educational and professional qualifications and Teacher Eligibility Test (TET) mandatory for primary teachers (1st to 8th). Clarification regarding calculation of opportunities.

प्राथमिक शिक्षकाकरिता (इ. १ ली ते ८ वी) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य करणेबाबत. स्पष्टीकरण संधीची गणना करण्याबाबत.

दिनांक :- २४ नोव्हेंबर, २०१७

वाचाः-१) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. आरटीई-२०१०/(प्र.क्र.५७२)/प्राशि-१ दि.१३.२.२०१३.

२) शासन परिपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, एसएसएन-२०१६/(३०/१६)/टिएनटी-२, दि.३०.६.२०१६.

प्रस्तावना :-

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्ती (इ. १ ली ते ८ वी) केंद्रशासनाने निर्देशित केलेल्या किमान शैक्षणिक, व्यावसायिक अर्हतेनुसार तसेच शिक्षक पात्रता परीक्षा उतीर्ण उमेदवारांमधून करण्याबबात संदर्भाधीन क्र.१ च्या शासन निर्णयान्वये सूचित करण्यात आलेले आहे. तथापि मागासवर्गीच्या पदाचा अनुशेष आदिवासी परिक्षेत्रांतर्गत दुर्गम भागात बोली भाषा ज्ञात असलेल्या शिक्षकाची करावयाची नियुक्ती इत्यादी कारणामुळे नियुक्त करण्यात आलेले काही शिक्षक हे “शिक्षक पात्रता परीक्षा” उत्तीर्ण नसल्याचे आढळून आल्याने, सदर पात्रता परीक्षा प्रथम तीन संधीत उत्तीर्ण होण्याबाबत संदर्भाधीन क्र. २ च्या शासन परिपत्रकान्वये बंधनकारक करण्यात आलेले आहे.

C-TET आणि TET समकक्ष वाचा या ओळीला स्पर्श करून

सदर “शिक्षक पात्रता परीक्षा” उत्तीर्ण होण्यासाठी देण्यात आलेल्या प्रथम तीन संधीची गणना केव्हापासून करण्यात यावी याबाबत संभ्रम क्षेत्रीय स्तरावर असल्याचे निर्दशनास आल्याने सदर बाब शासन स्तरावर विचाराधीन होती.

शासन परिपत्रक

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळामध्ये केंद्रशासनाच्या निदेशाप्रमाणे किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण असणाऱ्या शिक्षकाची नियुक्ती सरळ सेवेने दि.१३.२.२०१३ नंतर करण्यात आलेली असल्यास व असा शिक्षक राज्य शासनाने संदर्भाधीन क्र. १ च्या शासन निर्णयान्वये बंधनकारक केलेली “शिक्षक पात्रता परीक्षा” उत्तीर्ण नसल्यास, सदर शिक्षकाने उक्त परीक्षा संदर्भाधीन क्र. २ च्या शासन परिपत्रकानुसार प्रथम तीन संधीत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. सदर तीन संधीची गणना दि.३०.६.२०१६ पासून पुढील लगतच्या तीन “शिक्षक पात्रता परीक्षा” अशी असेल.

C – TET / TET वैधता कालावधी आजीवन वैध वाचा या ओळीला स्पर्श करून

२. दि. ३०.६.२०१६ नंतर रिक्त पदावर होणारी नविन नियुक्ती ही “शिक्षक पात्रता परीक्षा” उत्तीर्ण धारकाचीच राहील.

३. कंत्राटी स्वरुपात शिक्षक पदावरील नियुक्ती बाबत संदर्भाधीन क्र. २ शासन परिपत्रक विहीत करण्यात आलेल्या तरतूदी कायम राहतील.

हे शासन परिपत्रक शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०१७११२७१७०१४०५९२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

TET Deemed Qualified
टी.ई.टी अर्हता अप्राप्त शिक्षकांना  “मानिव पात्र” घोषीत करणेबाबत
संदर्भ:- मा. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दि. १ सप्टेंबर, २०२५ वाचा या ओळीला स्पर्श करून

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

शासन परिपत्रक पीडीएफ मध्ये प्राप्त करा या ओळीला स्पर्श करून

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन परिपत्रक क्रमांक :- टिईटी-२०१७/(प्र.क्र.३३५)/टीनटी-१, मंत्रालय, मुंबई

TET Mandatory For Teachers And Calculation Of Exam Attempts
TET Mandatory For Teachers And Calculation Of Exam Attempts

Leave a Comment

error: Content is protected !!