TET is Mandatory For Ashram Shala Teachers
TET is Mandatory For Ashram Shala Teachers
TET Pass / Uttirn Hone Aavshyak Ashram Shala Shikshak
TET is mandatory for primary teachers in Ashram schools from 1st to 8th to pass the “Teacher Eligibility Test”.
Tet is Mandatory For All Teachers Teaching Class 1st To Class 8th
*शिक्षकांसाठी दोन वर्षांत टीईटी उत्तीर्ण बंधनकारक*
_उत्तीर्ण न झाल्यास शिक्षकांची सेवा संपुष्टात_
* सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) संदर्भात दिलेल्या निर्णयानंतर राज्यातील शिक्षक आणि शिक्षक संघटनांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, आता सर्व शिक्षकांना दोन वर्षाच्या आत टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य ठरणार आहे.
* राज्य सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने या निर्णयानुसार कार्यवाही सुरू केली आहे. विभागाचे कक्ष अधिकारी श्रीनाथ हेंद्रे यांनी यासंबंधी सूचना इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या संचालकांना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.
* १६ ऑक्टोबर रोजी विभागाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबरला दिलेल्या आदेशानुसार पुढील निर्णय घेण्यात आला.
* या आदेशानुसार ‘बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९’ (आरटीई कायदा) अंतर्गत सर्व शिक्षकांनी ‘शैक्षणिक व्यावसायिक पात्रता’ मिळवणे आवश्यक आहे.
*काय आहेत अटी?*
१. आरटीई कायदा लागू होण्यापूर्वी नियुक्त आणि सेवाकाळ अजून पाच वर्षापेक्षा अधिक बाकी आहे, अशा शिक्षकांना पुढील दोन वर्षाच्या आत टीईटी परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल.
२. ठरावीक मुदतीत परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास अशा शिक्षकांची सेवा संपुष्टात येईल आणि त्यांना सक्तीने निवृत्त करण्यात येईल. मात्र, त्यांनी आवश्यक सेवाकाळ पूर्ण केला असल्यास त्यांना निवृत्तीवेतन आणि इतर लाभ मिळतील.
* ज्यांचा सेवाकाळ पाच वर्षापेक्षा कमी आहे, अशा 3 ३ शिक्षकांना टीईटी न देता निवृत्तीपर्यंत सेवा करता येईल. पण अशा शिक्षकांनी पदोन्नतीसाठी प्रयत्न केल्यास टीईटी उत्तीर्ण करणे आवश्यक राहील.
* अल्पसंख्याक शाळांतील शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण करणे बंधनकारक राहणार नाही.
”टीईटी परीक्षा शिक्षकांच्या गुणवत्तेसाठी योग्य असली तरी २०१० पूर्वी नियुक्त व पाच वर्षांपेक्षा जास्त सेवा असलेल्या शिक्षकांना सूट द्यावी. मुख्याध्यापक पदोन्नतीसाठी टीईटी अनिवार्य केल्याने अनुभवी शिक्षकांचा अन्याय होतो. त्यांच्या अनुभवाचा सन्मान राखून सूट द्यावी.’
क्रमांकः विभशा-२०२५/प्र.क्र.९१/विजाभज-२
दिनांक-१७/१०/२०२५
विषयः इ. १ ली ते ८ वी पर्यंतच्या आश्रमशाळेतील प्राथमिक शिक्षकांना “शिक्षक पात्रता परीक्षा” उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्याबाबत
संदर्भ -१) संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, म.रा., पुणे यांचे पत्र क्र. इमाबकसं/ आशा/टीईटी/२०२५-२६/२८४५, दि.४/६/२०२५
२) संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, म.रा. पुणे क्र. यांचे पत्र क्र. इमाबकसं/आशा/टीईटी/२०२५-२६/३९२२, दि.४/८/२०२५
महोदया,
उपरोक्त विषयांच्या अनुषंगाने, मा. सचिव (इतर मागास बहुजन कल्याण विभाग) यांचे अध्यक्षतेखाली गुरुवार, दिनांक १६/१०/२०२५ रोजी व्ही.सी.द्वारे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेस अनुसरुन आपणास खालीलप्रमाणे कळविण्यात येत आहे –
१. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ मधील तरतुदीनुसार सर्वच शिक्षकांना “शैक्षणिक व व्यावसायिक आणि शिक्षक पात्रता परिक्षा” उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे.
२. जे सेवेत असलेले शिक्षक RTE कायदा लागू होण्यापूर्वी भरती झालेले आहेत आणि ज्यांना निवृत्तीपर्यंत पाच वर्षांपेक्षा जास्त सेवा उरलेली आहे, त्यांच्यासाठी दोन वर्षांच्या आत शिक्षक पात्रता परिक्षा (TET) उत्तीर्ण करणे बंधनकारक राहील. विहित मुदतीत शिक्षक पात्रता परिक्षा (TET) उत्तीर्ण न केल्यास, त्यांच्या सेवा तात्काळ संपुष्टात येतील. अशा कर्मचाऱ्यांना सक्तीने निवृत्त केले जाईल आणि जेवढे हक्काचे निवृत्तीपश्चात लाभ आहेत ते दिले जातील. मात्र, निवृत्ती लाभमिळविण्यासाठी शिक्षकाने नियमांनुसार आवश्यक सेवाकाल पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
२. ज्या शिक्षकांची सेवा पाच वर्षांपेक्षा कमी शिल्लक आहे, असे शिक्षक शिक्षक पात्रता परिक्षा (TET) परीक्षा उत्तीर्ण न करताही निवृत्ती वयापर्यंत सेवेत राहू शकतील. मात्र अशा कोणत्याही शिक्षकाने (ज्याची सेवा पाच वर्षांपेक्षा कमी शिल्लक आहे) पदोन्नतीसाठी प्रयत्न केल्यास, अशा शिक्षकांना TET उत्तीर्ण करणे बंधनकारक राहील.
४. अल्पसंख्यांक शाळांना RTE कायदा लागू नाही. त्यामुळे अल्पसंख्यांक शाळांमधील शिक्षकांना TET उत्तीर्ण करणे बंधनकारक नाही.
मा. सर्वोच्च न्यायालयाने सिव्हील अपिल क्र. १३८५/२०२५ मध्ये दि. १/९/२०२५ रोजी दिलेल्या न्यायनिर्णयास अनुसरुन प्रकरणी कार्यवाही करावी.
आपला,
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन
इतर मागास बहुजन कल्याण विभाग,मंत्रालय (विस्तार), मुंबई
प्रत – (१) मा. सचिव (इतर मागास बहुजन कल्याण विभाग) यांचे स्वीय सहायक
(२) सह सचिव (विजाभज-२) इ.मा.ब.क. विभाग यांचे स्वीय सहायक
(३) अवर सचिव (विधी) इ.मा.ब.क. विभाग
प्रति,
संचालक,
इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, म.रा., पुणे

