Teaching Hours for Teachers
Teaching Hours for Teachers
Fixing minimum working days in the academic year
Teaching hours and minimum hours per week for teachers
शैक्षणिक वर्षामधील कामाचे किमान दिवस, शिक्षणाचे तास व शिक्षकांसाठी प्रत्येक आठवड्याला किमान तास निश्चित करणे
महाराष्ट शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन निर्णय क्र. पीआरइ २०१०/प्रक्र.११४/प्राशि-१
मंत्रालय विस्तार भवन, मुंबई
दिनांक, २९ एप्रिल, २०११
वाचा -१) बालका मोफत व सक्तिच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९
२) मुंबइ प्राथमिक शिक्षा नियम, १९४९ नियम क्र. १२५
प्रस्तावना केंद्र सरकारने सन २००२ च्या ८६ व्या संविधान विशोधन अधिनियमान्वये अनुच्छेद २१ (अ) मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराचा समावेश केला आहे. त्यानुसार सहा ते चौदा वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणारा अधिनियम, Right of Children to Free and Compulsory Education Act, 2009 (No.35, 2009), केंद्र शासनाने पारित करुन तो भारत सरकारच्या २७.८.२००९ च्या राजपत्रात प्रसिध्द केला आहे. तसेच, भारत सरकारच्या दिनांक १६.२.२०१० च्या राजपत्रात सदर अधिनियम दिनांक १.४.२०१० पासून संपूर्ण भारतात (जम्मू व काश्मिर वगळता) लागू केला असल्याचे नमुद केले आहे.
२. समता, सामाजिक न्याय, लोकशाही आणि मानवी समाजामध्ये न्यायाची प्रस्थापना ही मूल्ये, सर्व मुलांच्या प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून साधली जावू शकतात, यादृष्टीने हा अधिनियम अंमलात आणला आहे. त्यामुळे सहा ते चौदा वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण पुरविण्याची, त्यांना शाळांमध्ये प्रवेश देण्याची, उपस्थितीची आणि प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी शासने स्विकारली आहे.
३. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील प्रकरण ४ कलम १९ व २५ अन्वये प्राथमिक शाळेसाठी असलेली मानके व निकष यांची पूर्तता करण्यासाठी शासन निर्णय दि.१ मार्च २०११ रोजी निर्गमित केले आहे तथापि त्यात सुधारणा करण्यासाठी निवेदने प्राप्त झाली त्यामुळे काही सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय
शैक्षणिक वर्षामधील कामाचे किमान दिवस, शिक्षणाचे तास व शिक्षकांसाठी प्रत्येक आठवड्याला किमान तास निश्चित करणे, याबाबतचा शासन निर्णय शासन, शालेय निर्णय शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. पीआरई २०१०/प्रक्र.११४/प्राशि-१ दि. १मार्च, २०११ अधिक्रमित करुन शासन पुढील प्रमाणे आदेश देत आहे.-
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील प्रकरण ४ कलम १९ (ए) अन्वये अधिनियमातील अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेली मानके व निकष यानुसार प्रत्येक शिक्षकांसाठी प्रत्येक शैक्षणिक वर्षांमधील शिक्षकांच्या कामाचे किमान दिवस व शिक्षणाचे तास तसेच शिक्षकांसाठी प्रत्येक आठवड्याला शाळेतील कामाचे तास व शाळेबाहेरील चिंतन व अभ्यासाचे तास खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहेत.
अ) इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी शैक्षणिक वर्षातील शाळेतील शिक्षकांचे कामाचे दिवस किमान २०० इतके राहतील.
ब) इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गासाठी शैक्षणिक वर्षांत शिक्षकांचे कामाचे दिवस किमान २२० इतके राहतील.
क) इयत्ता पहिली ते पाचवी वर्गांसाठी शैक्षणिक वर्षातील अध्यपनाचे किमान घड्याळी तास ८०० इतके राहतील.
ड) इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी शैक्षणिक वर्षांतील अध्यपनाचे किमान घड्याळी तास १००० इतके राहतील.
इ) प्रत्येक शिक्षकांसाठी प्रत्येक आठवड्याला पाठाची तयारी करण्यासह अध्यापनाचे किमान ४५ तास इतकें राहतील. यात शाळेबाहेरील चिंतन व व अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी १५ तास व प्रत्यक्ष शाळेतील शिकविण्याचे किमान ३० तासांचा समावेश असेल.
फ) पाठाची तयारी करण्यासाठी अध्यापनाचे ४५ तास याचा अर्थ शिक्षक किंवा विद्यार्थ्यांसाठी ८ तासांची शाळा असा होत नसून शिक्षक व विद्यार्थी यांच्या शाळेतील अध्यापन-अध्ययनासाठी पूर्वीप्रमाणेच ३० तास अपेक्षित राहतील. तसेच आठवड्यातून सहा दिवस किंवा पाच दिवस चालणा-या शाळांची वेळ पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात या निर्णयाचा अडसर राहणार नाही.
पाठाची तयारी, (म्हणजे शाळेबाहेरील चिंतन व अभ्यासाचे तास) पाठासाठी मुद्देनिहाय गोळा करावयाची माहिती वा साहित्य यासाठी स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे : अध्ययन
अध्यापन विषयक साहित्य तयार करणे, पाठाचे टाचण तयार करणे, सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन विषयक नोंदी, तंत्र विकसित करणे व प्रत्यक्ष मूल्यांकन करणे. मुलांना शिकविण्यासाठी चांगले ज्ञानयुक्त पुस्तके वाचणे. अभ्यासात मागे राहणा-या मुलांना चांगली प्रगती करण्यासाठी चिंतन करणे. क्रमिक पुस्तकांच्या जोंडीने संदर्भ पुस्तके वाचने यासाठी (एकूण १५ तास) राहतील शैक्षणिक दृकश्राव्य साधने इत्यादी मामतंत्रांच्या सहाय्याने दिग्दर्शित अध्यापन व स्वयंअध्ययन करुन घेणे.
हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेब साईटवर देण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक क्र. २०११०४२९१३३९५२००१ असा आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने
🌐👉 सदर शासन निर्णय पीडीएफ मध्ये हवा असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा 👈
अवर सचिव, महाराष्ट्र शासन