Teachers Day Quiz With Certificate
Teachers Day Quiz With Certificate
Teachers Day Quiz With Digital Certificate शिक्षक दिन प्रश्न मंजुषा सोडवा आकर्षक ईप्रमाणपत्र मिळवा
क्र.आशिका-२०२६/आस्था-क-माध्यमिक/
दिनांकः स्वाक्षरीखाली नमूद आहे.
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२. शिक्षणाधिकारी, (प्राथमिक/माध्यमिक) सर्व
३. शिक्षण निरीक्षक/प्रशासन अधिकारी/शिक्षणाधिकारी (मनपा/नपा), सर्व
विषय : शिक्षक दिनानिमित्त आयोजित विशेष प्रेरणादायी सुसंवाद सत्रास ऑनलाईन उपस्थित राहणेबाबत…
संदर्भ : मा. आयुक्त (शिक्षण) यांच्या सूचना दि. ०३ सप्टेंबर २०२६
उपरोक्त विषयास अनुसरून आपणास सस्नेह कळविण्यात येते की, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दि. ०५ सप्टेंबर हा दिवस आपण ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करत आहोत. या निमित्ताने शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील सर्व शिक्षक व संबंधितांसाठी एका विशेष प्रेरणादायी सुसंवाद सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात मा. सचिन्द्र प्रताप सिंह, आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य आणि राज्यातील काही निवडक क्रियाशील, नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविणारे शिक्षक आपले विचार मांडणार आहेत. मा. आयुक्त (शिक्षण) व सर्व संचालक महोदय हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून सदर कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तरी, सदर कार्यक्रमास आपल्या अधिनस्त सर्व क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी यांनी तसेच अधिनस्त सर्व माध्यम आणि व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांनी व पालकांनी खालील दिलेल्या यु-ट्युब लिंकवर क्लिक करुन उपस्थित राहण्याबाबत संबंधितांस कळविण्यात यावे.
दिनांक: ०५ सप्टेंबर २०२६
वेळ: सकाळी ११.०० ते १२.३०
लिंक: https://www.youtube.com/live/GH४e-CHHNfE?si=o8qSLuGZKclJbmiq
Digitally signed by Harun Ismail Atar Date: 04-09-2026 19:42:06 (हारुन आतार) शिक्षण सहसंचालक (प्रशासन, अंदाज व नियोजन)
प्रत माहिती व पुढील आवश्यक कार्यवाहीस्तव सादरः-
१. मा. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
२. मा. शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुण
े
❀ ५ सप्टेंबर ❀
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जन्मदिन
जन्म – ५ सप्टेंबर १८८८ (तामिळनाडू)
स्मृती – १७ एप्रिल १९७५ (चेन्नई)
भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतीप्रत्यर्थ त्यांचा जन्मदिन संपूर्ण भारतभर ‘शिक्षक दिवस’ म्हणून साजरा करतात. डॉ. राधाकृष्णन यांनी १९०९ ते १९४८ वर्षं पर्यंत शिक्षक म्हणून काम केले. त्यांचा सर्वात आवडता विषय होता तो लेखन. शालेय जीवना पासूनच त्यांनी हा लेखनाचा छंद जोपासला होता. आपली मते, विचार ते निर्भीडपणे मांडीत आणि लिहीत. आपल्या लेखनातून सतत ते सत्याचाच पाठपुरावा करीत. त्यांच्या लेखनाला एक वेगळीच धार होती. तेज होते. त्यांचे लेखन मोजकेच होते. पण विचार करायला लावणारे होते. तत्वज्ञान हा तर त्यांचा सर्वात आवडता विषय. या विषयावर त्यांनी अनेक कसदार लेख विविध नियतकालिकांतून लिहिले. निरनिराळ्या विषयांवरील त्यांच्या ग्रंथाना सखोल तत्वज्ञानाची जोड मिळाली होती. साहजिकच या ग्रंथानी आम दुनियेत वाहवा मिळविली. त्यांचे ग्रंथ म्हणजे भारत देशाचा अमोल ठेवाच आहे. ते एक मैल्यवान लेणे होते. डॉ. राधाकृष्णन यांनी मोजकेच ग्रंथ लिहिले. पण त्या ग्रंथांनी त्यांना प्रसिद्धीच्या उंच शिखरावर नेऊन ठेवले. या ग्रंथांची नावे जरी नजरे खालून घातली तरी त्यातील विषयांची विविधता उमगेल. त्यांची पुस्तके भारतीय तत्त्वज्ञानाची, धर्माची आणि संस्कृतिची ओळख करून देतात. त्यांनी भारतीय तत्त्वज्ञान, धर्म व संस्कृती यांची ध्वजा दाही दिशांना सतत उंचच उंच फडकवित ठेवली. ही भारतीय साहित्याचे थोर सेवाच ठरली आहे. भारता बाहेरील अनेक टीकाकार भारतीयांना प्राणापलीकडे प्रिय असणाऱ्या हिंदू धर्मावर, त्याच्या तत्त्वज्ञानावर, आचार-विचार, संस्कृतीवर, रीतिरिवाजावर सडकून टीका करायचे. या टीकेत जहालपण असायचे. विरोधक आणि टीकाकारांना आपल्या धार धार लेखणीने त्यांनी गप्प केले होते.
५ सप्टेंबर शिक्षक दिन
गुरु ब्रह्मा, गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरः ।
गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः ॥
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (5 सप्टेंबर 1888 – 17 एप्रिल 1975) भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शिक्षक
माननीय मुख्याध्यापक महोदय, उपस्थित शिक्षकवृंद, पालकवर्ग आणि माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचे या पवित्र आणि प्रेरणादायी कार्यक्रमात मनःपूर्वक स्वागत !
आजचा दिवस अत्यंत विशेष आहे. कारण हा दिवस आहे आपल्या जीवनाचे शिल्पकार, मार्गदर्शक आणि प्रेरणादाते असलेल्या शिक्षकांचा सन्मान करण्याचा.
भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आपण दरवर्षी 5 सप्टेंबर हा दिवस “शिक्षक दिन” म्हणून साजरा करतो.
शिक्षक आपल्याला केवळ पुस्तकातील ज्ञान देत नाहीत, तर चांगले विचार, संस्कार, शिस्त आणि जीवन जगण्याची दिशा देतात.
ते आपल्या जीवनातील अंधार दूर करून यशाच्या प्रकाशाकडे नेणारे दीपस्तंभ आहेत.
चला, आपण सर्वजण आपल्या शिक्षकांचा आदर करूया, त्यांच्या ऋणाची जाणीव ठेवूया आणि त्यांच्या शिकवणुकीनुसार आपले जीवन घडवूया.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्व शिक्षकांचा मनापासून सन्मान करूया.
धन्यवाद !
जय हिंद ! जय भारत !
शिक्षकांचे आभार, त्यांच्या ऋणाची परतफेड अशक्यच आहे.

🖕या आणि अशा प्रकारच्या रोजच्या आणि दिनविशेष वर आधारित आपल्या फोटोसह स्टेटस प्राप्त करण्यासाठी खालील ओळीला स्पर्श करा DNYANYATRITANTRASNEHI चे अॅप आले आहे.खालील लिंकवर क्लिक करून सर्व सदस्य आता सामील व्हा आणि तुमचे सदस्य ओळखपत्र प्राप्त करा
Dear Teacher,
Happy Teacher’s Day ✨
You are the guiding light who inspires, nurtures, and shapes the future.
That’s why, as a small token of gratitude, we’ve a little surprise for you. ✨
Click below to see it 👇🏽
Sending my wishes of a happy teacher’s day to you, with this wonderful journey ✨ Click on this link to experience:
जागतिक शिक्षक दिन World / International Teacher’s Day कधी असतो अधिक जाणून घ्या या ओळीला स्पर्श करा
Thise Exam paper is very nice and important information for teachar Day
it is very good information for the teacher and it is good thing for the teacher who are respected
Good
Good
very nice thing to solve such questions and opportunity to express you
Good and informative.
Happy teachers day
Very nice & informative you are programme.
This type of competitions can increases more kwoledgeand information
Very good
Good information. Happy Teachers Day