Sutti Kalavdhit Mukhyadhyapak Karykal

Regarding the tenure of the Principal during vacation period

Vidyarthynche Aadhaar Pramnikaran

School Headmaster working periods in long holidays / vacations

सुटीच्या कालावधीत मुख्याध्यापकांच्या कार्यकालाबाबत

महाराष्ट्र शासन – शालेय शिक्षण विभाग

शासन परिपत्रक क्रमांक : एसएसएन १०९७/(८१०) / माशि २ मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०० ०३२.

दिनांक: १५ मे, १९९९.

संदर्भ :- (१) शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे परिपत्रक क्रमांक १२८४/१४५०/क, दिनांक २१ जुलै १९८४.

(२) शालेय शिक्षण विभाग, शासन पत्र क्रमांक एसएसएन २६९६/७४५/ (६५७)/माशि-२, दिनांक. १९.१०.१९९७

(३) शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे परिपत्रक क्रमांक अमाशा ३१९४/२६२२०/क, दिनांक ११.४.१९९७

शासन परिपत्रक :-

१ महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मधील नियम क्रमांक १६ (१८) (ब) अनुसार सुटीच्या कालावधीत कराव्या लागणाऱ्या कामाची भरपाई करण्याच्या प्रयोजनार्थ प्रत्येक पूर्ण वर्षासाठी १५ दिवसांची अर्जित रजा मुख्याध्यापकांना अनुज्ञेय आहे. मोठ्या सुटीच्या कालावधीत मुख्याध्यापकांनी शाळेच्या प्रशासकीय कामकाजास्तव शालेय कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक ठरते. त्यांना सुटीच्या कालावधीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे, दाखले देणे व पुढील वर्षाचे नियोजन करणे इत्यादी कामे करावी लागतात.

२. उपरोक्त परिस्थिती विचारात घेऊन व महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ च्या नियम १६ (१८) (ब) ला बाधा न येता खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

(१) मुख्याध्यापकांना काम नसताना सुटीच्या कालावधीत शाळेत हजर राहण्याबाबत सक्ती करण्यात येऊ नये अथवा त्यासाठी वेतन कपात करण्यात येऊ नये.

(२) सुटीच्या काळात शालेय कार्यालयातील कामकाज ज्या दिवशी केले जाईल त्या दिवशी मुख्याध्यापकाने हजेरी पत्रकात सही करणे आवश्यक आहे.

(३) सुटीच्या कालावधीमध्ये मुख्याध्यापकांनी केलेल्या कामाच्या प्रयोजनार्थ १५ दिवसांची अर्जित रजा अनुज्ञेय आहे. म्हणजेच किमान ३० दिवस कार्यालयात उपस्थित राहून काम करणे अपेक्षित आहे. वर्षभरातील एकूण ६३ दिवसांच्या सुट्टीच्या कालावधीत मुख्याध्यापकांनी साधारणतः निम्मे दिवस म्हणजे किमान ३० दिवस शाळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे. मात्र शाळेत उपस्थित असल्याच्या दिवशी पूर्ण वेळ उपस्थिती आवश्यक आहे असे नाही. एकंदरीत कामाच्या व्याप्तीनुसार उपस्थिती आवश्यक ठरेल. (४) मुख्याध्यापक सुटीच्या काळात शाळेत अनुपस्थित राहिल्यास त्यांना देय अर्जित रजा मान्य होणार नाही. शिवाय शाळेची निकडीची व महत्त्वाची कामे वेळीच पार न पाडल्याबद्दल संस्था मुख्याध्यापकांना दोषी धरुन ती शिस्तभंगविषयक कार्यवाही करु शकेलं. वरील सर्व सूचना त्वरीत सर्व शाळांच्या निदर्शनास आणून द्याव्यात.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

👇👇👇👇👇

परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा

(वृंदा पवार)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

1680269441151

Leave a Comment

error: Content is protected !!