Vidyarthynche Aadhaar Pramnikaran विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करणेबाबत. Aadhaar authentication of students
Students Aadhaar Validation Approval
महाराष्ट्र शासन
शिक्षण आयुक्तालय,
महाराष्ट्र राज्य, मध्यवती इमारत, डॉ. अॅनी बेझंट मार्ग, पुणे
क्र. आशिका/आस्था-क १०६/विद्यार्थी-आधार/२०२५/
दि.०१/०४/२०२५
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व) विभाग
२. शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक (सर्व) जिल्हा परिषदा
३. शिक्षण निरिक्षक, बृहन्मुंबई महानगरपालिका (पश्चिम/दक्षिण/उत्तर)
विषय :- शालेय विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक १०० टक्के प्रमाणित करण्याबाबत.
संदर्भ : १. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक दिनांक १४/०८/२०१७
२. प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून याबबात निर्गमित करण्यात आलेले परिपत्रक दिनांक ०४/०२/२०२० व दिनांक १५/०१/२०२१
३. वित्त विभाग शासन निर्णय दिनांक ०८/०६/२०२२
४. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दिनांक ३०/०६/२०२२
५. आधार विषयक वेळोवेळी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बैठका
६. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे अशा पत्र क्र संकीर्ण-२०२५/प्रक्र १९/एसडी-१ दिनांक १३/०२/२०२५
राज्यातील सर्व विभागाच्या सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांतील इ. श्ली ते इ. १२वी मध्ये शिकत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे युडायस प्लस व सरल पोर्टलमधील स्टुडंट पोर्टलवर आधार नोंदणी/अद्ययावत करणाचे काम पूर्ण करुन संबंधित विद्याध्यांचे आधार क्रमांकाची खात्री (Validation) करणे आवश्यक आहे. वासाठी राज्यस्तरावरुन वेळोवेळी सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत.
शालेय शिक्षण विभांतर्गत विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार, शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत दुर्बल, वंचित घटकाकरीता २५टक्के प्रवेश प्रक्रिया तसेच वैयक्तिक लाभाच्या विविध शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात. संदर्भ क्र ३ व ४ अन्वये विविध सवलती व वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शी पध्दतीने पोहचविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसंच संदर्भ क्र.६ अन्वये मा. मुख्यमंत्री महोदयांनी १०० दिवसांच्या कार्यक्रमामध्ये शालेय विद्यार्थ्यांचे १०० टक्के आधार नोंदणी करण्याबाबत सूचना प्राप्त आहेत. त्याअनुषंगाने निर्यामतपणे आढावा घेण्यात येत आहे. याबाबत मा.प्रधान सचिव, शालेय शिक्षण यांचेकडून देखील वारंवार आढावा घेण्यात येत आहे. सद्यस्थितीत राज्यात एकुण ९४.७२ टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणित झाले आहेत. विविध कारणास्तव विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणित न होणे, आधार कार्ड उपलब्ध नसणे यामुळे १०० टक्के काम पूर्ण होताना दिसून वेत नाही.
उर्वरित ५ टक्के विद्याध्यांचे आधार नोंदणीबाबत शाळा, केंद्र व तालुकास्तवर सुक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी तालुकास्तवरावरून कांही शाळांकरिता मिळून एक नोडल अधिकारी यांची नियुक्ती करावी. प्रत्येक शाळेतील ज्या विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणित झालेले नाही त्या विद्यार्थ्यांचे नाव व कारणासह यादी शाळांनी तयार करावी, या विविध कारणांचा आढावा घेऊन अशा विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणित करण्यासाठी तंत्रस्नेही शिक्षक, केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी यांच्या मदतीने कार्यवाही करता येईल. ज्या शाळांमध्ये जास्त प्रमाणात आधार प्रमाणित नसलेले विद्यार्थी संख्या असेल तेथे स्वतः गटशिक्षणाधिकारी अथवा वर्ग-२ दर्जाचे अधिकारी यांनी भेट देऊन आधार विषयक कार्यवाही पूर्ण करावी.
युडायस प्लस व सरल पोर्टलवरील केंद्र प्रमुख, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या लॉगीनवर सर्व संख्यात्मक व शाळा/विद्यार्थी निहाय माहिती उपलब्ध आहे. या महितोद्वारे आधार प्रमाणित करण्यात मागे असलेल्या शाळा पाहता येतात, या माहितीच्या आधारे नियमितपणे आढावा घेऊन प्रत्येक शाळेचा पाठपुरावा करुन आधार प्रमाणिकरणाची कार्यवाही पूर्ण करता येईल.
तसेच या नियुक्त केलेल्या नोडल अधिकारी यांनी आठवडयातून किमान दोन वेळा केंद्र प्रमुख, गटशिक्षणाधिकारी यांचे कडून नियमित आढावा घ्यावा. प्रसंगी शिक्षणाधिकारी यांनी गटशिक्षणाधिकारी यांचेद्वारा आयोजित केलेल्या केंद्र प्रमुख यांच्या ऑनलाईन आढाव्यामध्ये सहभाग घेऊन येणाऱ्या अडीअडचणीचे निराकरण करावे. याबाबत शिक्षणाधिकारी यांनी आठवडयातून किमान एकदा गटशिक्षणाधिकारी यांची आढावा बैठक घ्यावी.
यासाठी दिनांक ०१/०४/२०२५ ते १५/०४/२०२५ या कालावधीत विशेष मोहिम राबवून प्रत्येक शाळेतील शिल्लक आधार प्रमाणित असलेल्या विद्यार्थी निहाय काम केल्यास नक्कीच पुढील काही दिवसांमध्ये १०० टक्के आधार प्रमाणित करण्याची कार्यवाही पूर्ण होईल.
तसेच, आधार प्रमाणित झालेल्या सर्व विद्याथ्यांच्या APAAR ID ची देखिल कार्यवाही पूर्ण करावी.
तरी शासन निर्णयामध्ये नमूद बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी योग्य ते नियोजन करुन राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंद करुन आधार प्रमाणित होतोल यादृष्टीने आपल्या विभागातील कार्यवाही पूर्ण करावी व केलेली कार्यवाही वेळोवेळी या कार्यालयास व शासनास अवगत करावी.
(सचिन्द्र प्रताप सिंह, भा.प्र.से.)
आयुक्त (शिक्षण)
महाराष्ट्र राज्य, पुणे-१
प्रत पुढील आवश्यक कार्यवाहीस्तव
१. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय, म.रा. पुणे २. शिक्षण संचालक (प्राथमिक) शिक्षण संचालनालय, म.रा. पुणे
प्रतिलिपी :
मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२ यांना माहितीस्तव सविनय सादर
Also READ
Students Aadhaar Validation Approval स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य १७, डॉ. आंबेडकर मार्ग,
पुणे-४११ ००१.
दूरध्वनीक्रमांक :-०२०/२६१२६७२६/२६१२३५१५
E-mail Id:- directorscheme.mh@gmail.com
जा.क्र.शिसंयो/संकीर्ण/शिष्यवृत्ती/२०२४/यो-४०३/1155
दिनांक : ०९ मे, २०२४
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व
२. शिक्षणाधिकारी (माध्यमिक / योजना) जिल्हा परिषद सर्व
३. शिक्षण निरीक्षक (उत्तर/दक्षिण/पश्चिम) मुंबई
४. प्रशासन अधिकारी मनपा/नपा/नप सर्व
५. गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती सर्व
विषय: विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करणेबाबत.Aadhaar authentication of students
संदर्भ : अल्पसंख्यांक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्र. क्र. अविवि-२०२४/९४/प्र.क्र.४९/का ६, दिनांक २३.०४.२०२४
उपरोक्त विषयाबाबत अल्पसंख्यांक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे संदर्भाधीन पत्र व त्यासोबतचे पत्र सोबत जोडण्यात आलेले आहे.
प्रकरणी शालेय शिक्षण विभागाने राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत मान्यता मिळालेल्या खाजगी शाळा व्यवस्थापनांनी विद्यार्थ्यांची संख्या वाढवून आवश्यकतेपेक्षा अधिक शिक्षक शिक्षकेतर पदे मंजूर करून घेतली असल्याचे निदर्शनास आले असल्याचे नमुद करून विद्यार्थ्यांची नोंद करतांना त्यांच्या “आधार” ची नोंद करणे आवश्यक असल्याचे तसेच विभागामार्फत विविध गटांसाठी शिष्यवृत्तीच्या योजना राबविल्या जातात, विद्यार्थी नोंदणी तसेच शिष्यवृत्तीच्या विविध योजना पारदर्शी पद्धतीने राबविण्यासाठी “आधार” ची नोंद करणे आवश्यक आहे असे निर्देशित करण्यात आलेले आहे.
🙋♀️👇
Also Read – धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना सन २०२४-२५ साठी पूर्वतयारी व अंमलबजावणीबाबत
👇☝👇☝👇☝👇
संदर्भाधीन पत्रातील निर्देशानुसार आपणांस याद्वारे कळविण्यात येते की, उच्च व्यावसायिक व इयत्ता १२ वी नंतर सर्व अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या राज्यातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरीता शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी संचालक, वैद्यकीय शिक्षण संचालनालय मुंबई, संचालक तंत्र शिक्षण संचालनालय मुंबई व संचालक, उच्च शिक्षण संचालनालयास्तरावर करण्यात येते, त्याचप्रमाणे आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व शाळा/कनिष्ठ महाविदयालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरीता शिष्यवृत्ती योजनेच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी, तसेच बँकेच्या खात्याला आधारशी लिंक करण्याची कार्यवाही तातडीने करण्याबाबत आपल्या स्तरावरून आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व शाळा / कनिष्ठ महाविदयालय यांना अवगत करावे. तसेच व्ही.सी. आयोजित करून सूचना द्याव्यात. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करावा.
(डॉ महेश पालकर)
शिक्षण संचालक (योजना) महाराष्ट्र राज्य,
पुणे-१
प्रत: मा. अवर सचिव, (का ६) अल्पसंख्यांक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई ३२ यांना माहितीस्तव सविनय सादर