Summer Vacation Declared For Schools
महत्त्वाचे
क्रःशिसंमा-25/(ओ-01)/ उन्हाळी सुट्टी/एस-1/3080 दि.22 जून, 2025.
विषय : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2025 ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष सन 2025-26 सुरु करणेबाबत.
संदर्भ: १. या कार्यालयाचे पत्र समक्रमांक 2237, दि.29/04/2025.
- एबीपी माझा या न्युज चॅनेलवरील दि.22/06/2025 ची बातमी.
महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळ त्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने उद्या दि. 23/06/2025 रोजी एक दिवस विदर्भातील शाळा बंद ठेवणार असल्याबाबतची बातमी एबीपी माझा या न्युज चॅनेलवर प्रसिध्द झाल्याचे दिसून येत आहे.
या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, या कार्यालयाच्या संदर्भ क्र.1, दि.29/04/2025 च्या पत्रान्वये कळविल्यानुसार विदर्भातील शाळा 23 जून ते 28 जून, 2025 या कालावधीत सकाळच्या सत्रात व दि.30/06/2025 पासून नियमित वेळेत सुरु करण्याबाबत आपले स्तरावरुन सर्व संबंधितांना सूचना द्याव्यात.
(डॉ. महेश पालकर)
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय
माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे
Regarding the commencement of the summer vacation of the year 2025 and the academic year 2025-26 for primary, secondary and higher secondary schools in the state.
प्रति,
- विभागीय शिक्षण उपसंचालक, नागपूर.
- विभागीय शिक्षण उपसंचालक, अमरावती
प्रत :
शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली यांना आवश्यक त्या तात्काळ कार्यवाहीस्तव.
Summer Vacation Declared For Schools
महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय
माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे
महत्त्वाचे परिपत्रक
प्रति,
क्रःशिसंमा-25/(ओ-01)/उन्हाळी सुट्टी/एस-1/2237
दि. 29 APR 2025
विषय : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2025 ची उन्हाळी सुटटी व शैक्षणिक वर्ष 2025-26 सुरु करणेबाबत.
संदर्भ : शासन परिपत्रक क्रःसंकिर्ण-2023/प्र.क्र.105/एस.डी.4, दि. 20/04/2023.
उपरोक्त संदर्भीय परिपत्रकान्वये शासनाने, संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत. या अनुषंगाने राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2025 ची उन्हाळी सुटटी व शैक्षणिक वर्ष 2025-26 सुरु करणेबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.
सुटीच्या कालावधीत मुख्याध्यापकांच्या कार्यकाला बाबत परिपत्रक सविस्तर वाचा या ओळीला स्पर्श करून
- राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शुक्रवार, दि.02 में, 2025 पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
- राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरु असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास, विद्यार्थ्यांना सूटी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा.
- पुढील शैक्षणिक वर्ष सन 2025-26 मध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार दि.16 जून, 2025 रोजी सुरु करण्यात याव्यात.
- जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार, दि.23 जून, 2025 ते 28 जुन 2025 पर्यंत सकाळ सत्रात 7.00 ते 11.45 यावेळेत सुरु करण्यात याव्यात. सोमवार दि.30.06.2025 पासून नियमित वेळेत सुरु करण्यात याव्यात.
वरील सूचना आपल्या अधिनस्थ सर्व मान्यता प्राप्त राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून द्याव्यात.
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय म.रा., पुणे.
👉 परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा 👈
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक शिक्षण संचालनालय) म.रा., पुणे.
प्रत :
- मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांना माहितीस्तव सविनय सादर.
- मा. आयुक्त, शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय, मध्यवर्ती इमारत, पुणे-01 यांना माहितीस्तव सविनय सादर.
- कक्ष अधिकारी (एसडी-4), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-32. यांना माहितीस्तव सविनय सादर.
- विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग.
- शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद, सर्व.
- शिक्षण निरीक्षक (उत्तर/पश्चिम/दक्षिण), बृहन्मुंबई.
Summer Vacation Declared For Schools
शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर
Summer Vacation 2025 Declared For Schools
११) राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांचा निकाल महाराष्ट्र दिन ध्वजारोहनानंतर दि. ०१/०५/२०२५ रोजी जाहीर करण्यात यावा. याचबरोबर ०२ मे २०२५ पासून सर्व शाळांना उन्हाळी सुट्टी सुरु होईल.
CIRCULAR PDF COPY LINK