Std 9th Marathi Kumarbharti Santvani Dharila Pandharicha Chor Swadhyay MCQs with Answers

Std 9th Marathi Kumarbharti Santvani Dharila Pandharicha Chor Swadhyay MCQs with Answers

image 2
Std 9th Marathi Kumarbharti Santvani Dharila Pandharicha Chor Swadhyay MCQs with Answers

Std 9th Marathi Kumarbharti Santvani Dharila Pandharicha Chor Swadhyay MCQs with Answers

खालील कविता लक्षपूर्वक वाचा व प्रश्नमंजुषेत विचारलेल्या प्रश्नांचा योग्य पर्याय निवडा.

२. संतवाणी- (आ) धरिला पंढरीचा चोर

संत जनाबाई : वारकरी संप्रदायातील संत कवयित्री. संत नामदेवांच्या शिष्या, त्यांना संत नामदेवांच्या सान्निध्यात विठ्ठलभक्तीचा ध्यास लागला. संत जनाबाईंनी विपुल काव्यरचना केली आहे. विशुद्ध वात्सल्य, आत्मसमर्पणाची भावना त्यांच्या अभंगवाणीत ओतप्रोत भरलेली आहे.

प्रस्तुत अभंगात संत जनाबाईंनी भक्तीच्या माध्यमातून विठ्ठलाला कसे प्राप्त केले, याबाबतचे वर्णन केले आहे.

धरिला पंढरीचा चोर ।
गळां बांधोनियां दोर ।।१।।

हृदय बंदिखाना केला ।
आंत विठ्ठल कोंडिला ||२||

शब्दें केली जवाजुडी ।
विठ्ठल पार्थी धातली बेडी ।।३।।

सोहं शब्दाचा मारा केला।
विठ्ठल काकुलती आला ।।४।।

जनी म्हणे बा विठ्ठला ।
जीवें न सोडीं भी तुला ।।५।।

[सकलसंतगाथा खंड पहिला संत जनाबाईंचे अभंग
अभंग क्र. १८०]

संपादक-प्रा. डॉ. र. रा. गोसावी.

SOLVE QUIZ ⏬

मराठी (कुमारभारती) इयत्ता नववी
२. संतवाणी- (आ) धरिला पंढरीचा चोर – संत जनाबाई

विठ्ठल या शब्दासाठी कवितेत (अभंगात) दिलेली उपमा.

देव
ईश्वर
पंढरीचा चोर

हृदय या शब्दासाठी कवितेत (अभंगात) दिलेली उपमा ओळखा.

बंदिखाना
एक अवयव
एक शब्द

पंढरीचा चोर म्हणजे…..


रीकृष्ण
श्रीविष्णू
श्रीविठ्ठल

श्रीविठ्ठल काकुलती आला ; कारण ….. ….

त्याच्यावर सोहं शब्दांचा मारा केला.
त्याच्या पायात बेडी घातली.
त्याच्या गळ्यात दोर बांधला.

संतवाणी- (आ) धरिला पंढरीचा चोर या कवितेचे कवी/ कवयित्री

संत नामदेव
संत जनाबाई
संत तुकाराम

धरिला पंढरीचा चोर या कवितेचा रचना प्रकार.

अभंग
मुक्तछंद
अष्टाक्ष

धरिला पंढरीचा चोर या कवितेचा काव्यसंग्रह.

सकलसंतगाथा खंड पहिला : संत नामदेव महाराजांची अभंगगाथा
सकलसंतगाथा खंड पहिला : संत तुकाराम महाराजांची अभंगगाथा
सकलसंतगाथा खंड पहिला : संत जनाबाईंचे अभंग

धरिला पंढरीचा चोर या कवितेचा विषय.


संत सज्जनांची महती या कवितेतून/अभंगातून सांगितली आहे.
विठ्ठलाचे प्रेम व जवळीक लाभावी हे या अभंगातून सांगितले आहे.
साध्या राहणीत परमोच्च सुख असते हे या अभंगातून सांगितले आहे.

कवितेतून व्यक्त होणारा (स्थायी) भाव.

साधी राहणीतील शुद्ध व सात्विक भाव.
संताची थोरवी व्यक्त करताना भक्तिभाव.
विठ्ठल हृदयात राहावा हा भक्तिभाव.

धरिला पंढरीचा चोर या कवितेतून व्यक्त होणारा विचार.

चोर- शिपाई या रूपकांतून श्री विठ्ठलाचा निरंतर सहवास.
जिवाशिवाचे नाते जोडावे.
साधी राहणी ठेवावी.

याचा बंदिखाना केला.

हृदयाचा
हाताचा
प्रेमाचा

यांची बेडी केली.

लोखंडाची
सोन्याची
शब्दांची

याचा मारा केला.

सोहं शब्दाचा
फुलांचा
पानांचा

विरुद्धार्थी शब्द ओळखा
साव
धरणे
बाहेर

आत
चोर
सोडणे

लिंग ओळखा – जुडी

त्रीलिंग
पुल्लिंग
नपुंसकलिंग

लिंग ओळखा – हृदय

स्त्रीलिंग
पुल्लिंग
नपुंसकलिंग

अचूक शब्द ओळखा.

बंदीखाना
बंदिखाना
बंधिखाना
बंदिखाणा

अचूक शब्द ओळखा.
पंढरीचा
पंधरीचा
पंढरिचा
पन्ढरीचा

जनी म्हणे बा ………

विठ्ठला
पांडूरंगा
कृष्णा

प्रश्न मंजुषा सोडवा व आदर्श उत्तरे बघा

SOLVE QUIZ ⏬

मराठी कुमारभारती इयत्ता नववी
Marathi Kumarbharti Iytta Nvavi

२. संतवाणी- (अ) जैसा वृक्ष नेणे प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा

Leave a Comment

error: Content is protected !!