Shikshan Sevak Shikshak Padbharti

Shikshan Sevak Shikshak Padbharti

Shikshan Sevak Shikshak Padbharti

Pavitra Pranalimarfat Shikshan Sevak/Shikshak Padbharti San 2025

Shikshan Sevak/Teacher Recruitment Year 2025 through Pavitra Portal

आदिवासी विकास विभाग
महाराष्ट्र शासन

Tribal Development Dept., Govt. of Maharashtra

Tribal Development Commissionerate आदिवासी विकास आयुक्तालय,नाशिक

ई-मेल: admnctd.nsk-mh@gov.in

वेबसाईट :-
www.mahatribal.gov.in

जा.क्र. प्रशा-2025/प्र. क्र.55 / का.2 (2) / 6830

दिनांक – 6 ऑगस्ट, 2026

आदिवासी विकास विभाग

पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती

जाहिरात-2026

आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य नाशिक यांचे अधिनस्त असलेले वर्ग 03 संवर्गाचे नियुक्ती प्राधिकारी अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक / ठाणे / अमरावती / नागपूर यांच्या आस्थापनेवरील शासकीय आश्रमशाळेतील पेसा / नॉनपेसा क्षेत्रातील रिक्त असलेली प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक व उच्च माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक) या संवर्गातील पदे पवित्र पोर्टलद्वारे 100 टक्के भरण्याकरिता खालील नमूद केलेल्या पदापैकी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या उमेदवारांकडुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

Shikshan Sevak Shikshak Padbharti
Shikshan Sevak Shikshak Padbharti

वरील जागा हया अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजा (अ), भज (ब), भज (क), भज (ड), विमाप्र, इमाव, ई डब्ल्यू एस, एसईबीसी, अराखीव यानुसार समांतर व सामाजिक आरक्षणानुसार पात्र उमेदवारांनी

https://tait2025.mahateacherrecruitment.org.in

या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने नोंद करावी.

उमेदवारांना प्राधान्यक्रम Generate करण्याची सुविधा दिनांक 06/08/2026 पासुन उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच प्राधान्यक्रम Lock करण्यासाठी दिनांक 06/08/2026 ते 11/08/2026 असा कालावधी देण्यात येत आहे.

आदिवासी विकास विभागातील अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक / ठाणे / अमरावती व नागपूर यांचे कार्यक्षेत्रातील प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक व उच्च माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक) संवर्गाची सविस्तर जाहिरात आदिवासी विकास विभागाच्या

https://tribal.maharashtra.gov.in

या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.

 सोबत - सविस्तर प्राधान्यक्रमाबाबत सुचना

ठिकाण :- नाशिक
दिनांक :- 6/8/2026

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक

Leave a Comment

error: Content is protected !!