Shikshak Bharti Second Phase Update पवित्र पोर्टल शिक्षक भरती दुसरा टप्पा

Shikshak Bharti Second Phase Update

Shikshak Bharti Second Phase Update

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Join Now

दिनांक ०९/०१/२०२६
उमेदवारांसाठी सूचना

उमेदवारांसाठी दिनांक २६/१२/२०२५ रोजी सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, त्यातील खुल्या प्रवर्गातून CTET दिलेल्या ज्या उमेदवारांकडे सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी कोणत्याही आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर त्यांनाच त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लागू असलेली सूट / सवलत मिळेल. सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी आरक्षणाचे प्रमाणपत्र नसेल तर त्यांना सूट / सवलतीचा लाभ घेता येणार नाही. यामुळे काही उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे त्याबाबत स्पष्ट करण्यात येते की, शिक्षक पात्रता परीक्षा देण्यापूर्वी वा परीक्षेच्या वेळी कोणत्याही आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर त्यांना त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लागू असलेली गुणांची सूट/सवलत मिळेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

राज्यातील कोणत्याही आरक्षणाचा लाभ घ्यावयाच्या असल्यास उमेदवारांकडे राज्यात अधिवास असल्याबाबतचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) असणे आवश्यक आहे, तथापि काही उमेदवारांकडे जातीचे दाखले आहेत परंतु अधिवास प्रमाणपत्रे (Domicile Certificate) उपलब्ध नाहीत. अशा उमेदवारांनी खालील अ), ब) व क) मध्ये दर्शलल्याप्रमाणे ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा व अतिरिक्त कागदपत्रे यामधील प्रत्येकी एक पुरावा एकत्रित पीडीएफ करून अपलोड करावा.

अ) ओळखीचा पुरावा (खालीलपैकी कोणताही एक) :-

आधार कार्ड

वाहन चालविण्याचा परवाना

पासपोर्ट

पॅन कार्ड

मतदार कार्ड

ब) पत्त्याचा पुरावा (खालीलपैकी कोणताही एक) :-

टेलिफोन, गॅस, वीज देयक, मालमत्ता कर इत्यादी उपयुक्तता बिले.

बँक पासबुक

रेशन कार्ड

भाडे करार

क) अतिरिक्त कागदपत्रे :-

महाराष्ट्र राज्यात जन्म झाल्याबाबतचे जन्म प्रमाणपत्र

महाराष्ट्र राज्यात शिक्षण झाल्याबाबतचा शाळा सोडल्याचा दाखला

महाराष्ट्र राज्यातून उत्तीर्ण माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र

ज्या उमेदवारांनी यापूर्वी अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) नाही म्हणून त्याप्रमाणे स्व-प्रमाणपत्र पूर्ण केले असेल. मात्र, त्यांच्याकडे वरील अ, ब आणि क मध्ये नमूद केलेल्या कागदपत्रांच्या यादीतील प्रत्येकी एक पुरावा उपलब्ध असेल, अशा उमेदवारांना त्यांचे स्व-प्रमाणपत्र Uncertify करून योग्य तो पुरावा अपलोड करून स्व-प्रमाणपत्र पुन्हा पूर्ण करता येईल, याची नोंद घ्यावी. मात्र, कागदपत्रे पडताळणीच्या वेळी मूळ अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) सादर करणे बंधनकारक राहील.

पोर्टलवर नोंदणी (Registration) करण्यासाठी व नोंदणी केलेल्या उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र स्वप्रमाणित (Self Certification) करण्यासाठी दिनांक १४.०१.२०२६ पर्यंत मुदतवाढ राहील, याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.

  दिनांक ०८/०१/२०२५
  उमेदवारांसाठी सूचना

नोंदणी केलेल्या उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक ०८/०१/२०२६ पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. स्व- प्रमाणपत्र पूर्ण करणे शिल्लक असलेल्या उमेदवारांची संख्या विचारात घेता पोर्टलवर नोंदणी (Registration) करण्यासाठी व नोंदणी केलेल्या उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र स्वप्रमाणित (Self Certification) करण्यासाठी दिनांक १२/०१/२०२६ पर्यंत मुदतवाढ राहील, याची संबंधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी.

ALSO READ 👇

पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षक पदभरतीमध्ये शैक्षणिक वर्षा अखेर रिक्त होणारी संभाव्य रिक्त पदे विचारात घेण्याबाबत….

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण- २०२५/प्र.क्र. ९५३/टीएनटी-१ हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक : ०१ जानेवारी, २०२६.

वाचा :
१. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय, क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र. १७४/टीएनटी-१, दि. २१.०६.२०२३.
२. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. आस्था-क/प्राथ-१०६/शै.स-रि.पदे/२०२५/१६०८७१९, दि. १६.१२.२०२५

प्रस्तावना :
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक पदभरती पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत आहे. उपरोक्त संदर्भाधीन क्र. १ येथील शासन निर्णयान्वये सद्यस्थितीत ८०% पर्यंत रिक्त पदे भरण्याची तरतूद आहे. शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी-२०२५ मधील निकालाच्या आधारे पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. दरवर्षी सेवानिवृत्ती व संचमान्यतेनुसार उपलब्ध होणा-या रिक्त पदांवर प्रत्यक्ष अध्यापनाचे कार्य करण्यासाठी शिक्षक उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. तसेच बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ मधील तरतूदीनुसार शाळांतील पदे १०% पेक्षा अधिक पदे रिक्त ठेवता येणार नसल्याची बाब विचारात घेता, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील शैक्षणिक वर्ष २०२५-२६ अखेर संभाव्य रिक्त पदे भरतीसाठी विचारात घेण्यास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

    शासन निर्णय :

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील त्या शाळांच्या संचमान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष २०२५-२६ अखेर म्हणजे माहे मे-२०२६ अखेर संभाव्य रिक्त होणारी पदे विचारात घेऊन संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयात नमूद मर्यादेत शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी-२०२५ मधील गुणांकनाच्या आधारे शिक्षक संवर्गातील पदभरती करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६०१०११२१२४५००२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Shikshak Bharti Second Phase Update
पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षक पदभरतीमध्ये शैक्षणिक वर्षा अखेर रिक्त होणारी संभाव्य रिक्त पदे विचारात घेण्याबाबत शासन निर्णय महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण- २०२५/प्र.क्र. ९५३/टीएनटी-१

उप सचिव, महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण- २०२५/प्र.क्र. ९५३/टीएनटी-१ हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक २९/१२/२०२५

 उमेदवारांसाठी सूचना

उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक २९/१२/२०२५ पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. परंतु स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्याबाबत उमेदवारांकडून मागणी होत आहे. तसेच स्व- प्रमाणपत्र पूर्ण करणे शिल्लक असलेल्या उमेदवारांची संख्या विचारात घेता पोर्टलवर नोंदणी (Registration) करण्यासाठी दिनांक ०६/०१/२०२६ पर्यंत मुदतवाढ तर नोंदणी केलेल्या उमेदवारांना स्व – प्रमाणपत्र स्वप्रमाणित (Self Certification) करण्यासाठी दिनांक ०८/०१/२०२६ पर्यंत मुदतवाढ राहील, यापुढे मुदत दिली जाणार नाही याचीही संबंधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Shikshak Bharti Second Phase Update
दिनांक २९/१२/२०२५ उमेदवारांसाठी सूचना उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक २९/१२/२०२५ पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. परंतु स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्याबाबत उमेदवारांकडून मागणी होत आहे. तसेच स्व- प्रमाणपत्र पूर्ण करणे शिल्लक असलेल्या उमेदवारांची संख्या विचारात घेता पोर्टलवर नोंदणी (Registration) करण्यासाठी दिनांक ०६/०१/२०२६ पर्यंत मुदतवाढ तर नोंदणी केलेल्या उमेदवारांना स्व – प्रमाणपत्र स्वप्रमाणित (Self Certification) करण्यासाठी दिनांक ०८/०१/२०२६ पर्यंत मुदतवाढ राहील, यापुढे मुदत दिली जाणार नाही याचीही संबंधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी.

ALSO READ 👇

दिनांक २६/१२/२०२५

उमेदवारांसाठी सूचना

उमेदवारांना यापूर्वी नॉन क्रिमी लेअर (NCL) प्रमाणपत्र सन २०२५-२६ साठी ग्राह्य असलेले सादर करण्याबाबत सूचना क्रमांक ब (११) मध्ये नमूद करण्यात आलेले आहे. त्याबाबत स्पष्ट करण्यात येते कि, सन २०२५-२६ साठी ग्राह्य असलेले सध्याचे NCL प्रमाणपत्र नोंद करता येईल.

तसेच EWS प्रवर्गातील उमेदवाराचे प्रमाणपत्र उत्पनावर आधारित असल्याने २०२५-२६ साठी ग्राह्य असणारे प्रमाणपत्र पोर्टलवर नोंद करणे आवश्यक आहे.

खुल्या प्रवर्गातून केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) दिलेले उमेदवारांपैकी ज्यांना ५५% ते ६० % या दरम्यान गुण असतील अशा उमेदवारांना त्यांच्या CTET प्रमाणपत्रावर Not Qualified अशी नोंद आहे. त्यातील ज्या उमेदवारांकडे सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी कोणत्याही आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर त्यांनाच त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लागू सूट/सवलत मिळेल. सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी आरक्षणाचे प्रमाणपत्र नसेल तर त्यांना सूट / सवलतीचा लाभ घेता येणार नाही. सबब ज्यांच्याकडे अशी प्रमाणपत्र त्यावेळी नसतील तर त्यांनी सदर परीक्षेतील पेपर-१/पेपर-२ गुणांची (५५% ते ६०% या दरम्यान गुण) नोंद करू नये. अशी नोंद केल्यास संबंधित उमेदवार त्यास जबाबदार राहतील.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ परीक्षेच्या वेळी अर्ज करताना उमेदवारांना त्यांचे दोन मोबाईल क्रमांक नोंद करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या, परंतु काही उमेदवारांनी परीक्षा एकच मोबाईल क्रमांक नोंद केला आहे व सदर मोबाईल क्रमांक कार्यान्वित नसेल तर त्यांना पवित्र पोर्टलवर स्व प्रमाणपत्र पूर्ण करता येत नसल्याचे विनंती अर्ज प्राप्त होत आहेत. या उमेदवारांना स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्यास OTP अनिवार्य असल्याने त्यांचा सध्याचा मोबाईल पोर्टलवर असणे आवश्यक आहे. यासाठी ज्यांना परीक्षेच्या वेळी नोंद केलेला मोबाईल कार्यान्वित नसेल अशा उमेदवारांनी त्यांनी TAIT-२०२५ साठी नोंद केलेल्या ई-मेल आयडी वरून त्यांनी विनंती अर्ज, ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅनकार्ड, वाहन चालविण्याचा परवाना यापैकी एक कागदपत्र तसेच परीक्षा क्रमांक व TAIT-२०२५ परीक्षेचा नोंदणी क्रमांक, नवीन मोबाईल क्रमांक यासह edupavitra२५@gmail.com या ई मेल वर Update/Chagne Mobile number अशा विषय ई-मेल केल्यास अशा उमेदवारांना स्व प्रमाणपत्र करण्यासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक अपडेट करून देता येईल.

पवित्र पोर्टल अथवा अन्य पदभरती मधून यापूर्वी प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक इत्यादी एक वेळ लाभ देय असणाऱ्या प्रमाणपत्राचा लाभ घेऊन सेवेत रुजू झालेल्या उमेदवारांना पुन्हा त्या प्रमाणपत्राचा लाभ देय नाही, त्यामुळे अशा उमेदवारांना त्यांचा TAIT २०२५ मध्ये सहभागी व्हावयाचे असल्यास सदर आरक्षणाचा लाभ न घेता त्यांचा मूळ प्रवर्ग अथवा खुला प्रवर्ग असेल तर तसे नोंद करून पदभरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी स्व-प्रमाणपत्र पूर्ण करू शकतील.

ज्या उमेदवारांकडून चुकीची नोंद झाल्यामुळे ती दुरुस्त करावयाची असेल आणि स्व-प्रमाणपत्र प्रमाणित (Self Certified) केले असेल तर त्यांना त्याचे स्व-प्रमाणपत्र Uncertify करता येईल व अशी योग्य नोंद करून पुन्हा स्व-प्रमाणपत्र स्व-प्रमाणित (Self Certified) करणे आवश्यक आहे, याची नोंद घ्यावी.

Shikshak Bharti Second Phase Update पवित्र पोर्टल शिक्षक भरती दुसरा टप्पा
Shikshak Bharti Second Phase Update पवित्र पोर्टल शिक्षक भरती दुसरा टप्पा

ALSO READ 👇

दिनांक : १५/१२/२०२५
उमेदवारांसाठी सूचना
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ नुसार शिक्षक पदभरती करण्यासाठी उमेदवारांकडून स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत.


१. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ ही दिनांक २७/०५/२०२५ ते दिनांक ३०/५/२०२५ आणि ०२/०६/२०२५ ते ०५/०६/२०२५ या कालावधीमध्ये ऑनलाईन घेण्यात आलेली आहे. सदर चाचणीस २.२८.८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती.
२. सदर चाचणी दिलेल्या उमेदवारांना स्व.प्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आलेली आहे.
३. उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र करताना आवश्यक असणाऱ्या तपशीलवार मार्गदर्शक सूचना स्वतंत्रपणे पोर्टल वर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
४. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ परीक्षा केवळ एक वेळ देण्याची तरतूद आहे. उमेदवारांना चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र वितरित करताना चाचणीसाठी एकापेक्षा अनेक प्रवेशपत्र प्राप्त झाल्यास केवळ एकाच प्रवेश पत्राद्वारे चाचणीस प्रविष्ट होण्याबाबत सूचित करण्यात आले होते. असे एकापेक्षा जास्त वेळा चाचणीस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्यावर सहभागी करून घेता येणार नाही. त्यामुळे अशा उमेदवारांनी निवडप्रक्रियेत सहभागी होऊ नये, सहभागी झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द होईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
५ उमेदवारांना स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक १५/१२/२०२५ ते दिनांक २९/१२/२०२५ पर्यंत मुदत देण्यात येत आहे.
६. TET/CTET मध्ये तफावत येत असलेल्या उमेदवारांना त्यांचे लॉगीनवर Request for Change in Data या मेनूअंतर्गत सुविधा देण्यात आलेली आहे.

दिनांक : १५/१२/२०२५ उमेदवारांसाठी सूचना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ नुसार शिक्षक पदभरती करण्यासाठी उमेदवारांकडून स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत
दिनांक : १५/१२/२०२५ उमेदवारांसाठी सूचना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ नुसार शिक्षक पदभरती करण्यासाठी उमेदवारांकडून स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत

Read More

1 thought on “Shikshak Bharti Second Phase Update पवित्र पोर्टल शिक्षक भरती दुसरा टप्पा”

Leave a Comment

error: Content is protected !!