SET EXAM UPDATE

SET EXAM UPDATE

IMG 20250220 120859
SET EXAM UPDATE

SET EXAM UPDATE

सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (पूर्वीचे पुणे विद्यापीठ) महाराष्ट्र शासन व गोवा शासन प्राधिकृत व यु.जी.सी., नवी दिल्ली मान्यताप्राप्त नोडल एजन्सी आयोजित सेट परीक्षा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित करीत असलेली चाळीसावी (४० वी) सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) रविवार, दि. १५ जून, २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहे. सदरहू परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगांव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी, नंदुरबार व पणजी (गोवा) या केंद्रांवर घेण्यात येईल. विद्यार्थ्यांनी अर्ज केवळ ऑनलाईन पध्दतीने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर (https://setexam.unipune.ac.in) उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यातच भरावयाचा आहे. संकेतस्थळावर अर्ज दि. २४ फेब्रुवारी, २०२५ सकाळी ११.०० वाजल्यापासून दि. १३ मार्च, २०२५ सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत उपलब्ध असेल. ५०० रू. विलंब शुल्कासहीत अर्ज भरण्याचा कालावधी दि. १४ मार्च, २०२५ सकाळी ११.०० वाजल्यापासून दि. २१ मार्च, २०२५ सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत असेल.विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील संपूर्ण अर्ज संगणकावर ऑनलाईन पध्दतीने अचूक भरावा. अर्जाची छापील प्रत स्वतःकडे जतन करून ठेवावी. तसेच सदरची प्रत कोणत्याही परीक्षा केंद्रावर अथवा सेट विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांचेकडे पाठवू नये.परीक्षा शुल्क१. खुलारू. ८००/- (प्रक्रिया शुल्कासह)२ . इतर मागासवर्गीय/भटक्या व विमुक्त जाती जमाती /रू. ६५०/- (प्रकिया शुल्कासह)सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग (फक्त उन्नत व प्रगत गटात न मोडणाऱ्या उमेदवारांसाठी) (For Non-Creamy Layer)* / खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS)/आणि विकलांग प्रवर्ग (PWD) / अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/तृतीयपंथी/अनाथ(टिप: उन्नत व प्रगत गटात न मोडणाऱ्या उमेदवारांसाठी वार्षिक उत्पन्नाच्या आर्थिक मयदिसंबंधी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा अलीकडील निर्णय संदर्भासाठी पहावा तसेच यासंदर्भात गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी गोवा शासनाने निर्गमित केलेले शासन निर्णय बंधनकारक असतील.)विद्यार्थ्यांनी सेट परीक्षा फी फक्त केडीट/डेबीट कार्ड द्वारे किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे भरावी. विद्यार्थ्यांनी अर्जाची छापील प्रत त्यांच्याकडे ठेवणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी सेट परीक्षेचे शुल्क केडिट/डेबीट कार्ड / इंटरनेट बँकिंग द्वारे अदा करतील त्यांनी याबाबतचा पुरावा जतन करून ठेवावा.सेट परीक्षेचे शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाच्या

या संकेतस्थळावर साधारणतः एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवडयात प्रसिध्द करण्यात येईल. परीक्षा शुल्क भरून सुध्दा ज्या विद्यार्थ्यांचे नाव सदर यादीत समाविष्ट नसेल अशा विद्यार्थ्यांनी शुल्क अदा केल्याचा पुरावा set-support@pun.unipune.ac.in या ई-मेल आयडीवर पाठवावा.सेट परीक्षेचे माहितीपत्रक व अभ्यासक्रम विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

IMG 20250220 120910
SET EXAM UPDATE

टिप:- जर विद्यार्थी एखाद्या विषयात आधीच सेट परीक्षा उत्तीर्ण (पात्र) असेल तर त्याला परत त्याच विषयात सेट परीक्षा देता येणार नाही.परिपत्रक पीडीएफ कॉपी लिंकप्रा. (डॉ.) ज्योती भाकरेप्रभारी कुलसचिव तथा सदस्य सचिव (सेट)

STATE ELIGIBILITY TEST (SET) FOR ASSISTANT PROFESSORSHIP

SAVITRIBAI PHULE PUNE UNIVERSITY (formerly University of Pune)

AUTHORISED NODAL AGENCY OF GOVERNMENT OF MAHARASHTRA & GOA

(Accredited By U.G.C., New Delhi)

Date of 40th SET Examination:

Sunday, 15th June, 2025

Period for submitting online examination form: 24th February, 2025 to 13th March, 2025

Period for submitting online application form with late Fees:

14th March, 2025 to 21st March, 2025

Detailed information about the SET examination and the process for submitting the online application form will be available on the website

40th SET Examination REGISTRATION LINK

40th SET Examination ADMIT CARD/HALL TICKET

40th SET Examination DATE SHEDULE

40th SET Examination RESULT LINK

SET EXAM MORE INFORMATION LINK

15 जून 2025 रोजी होणाऱ्या सेट परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध, विद्यार्थ्यांना 13 मार्च 2025 पर्यंत अर्ज करण्याची संधी
★ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आयोजित सहायक प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या 40 व्या सेट परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली असून सविस्तर वेळापत्रक नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे.
★ सेट परीक्षा दिनांक – रविवार, दि. 15 जून 2025
★ अर्ज मुदत – 24 फेब्रुवारी 2025 ते 13 मार्च 2025
★ सेट परीक्षा संकेतस्थळ :

परीक्षेच्या तयारीसाठी लिंक :-

from 24.02.2025.

Advt. No. 04

Date: 20/02/2025

Prof. (Dr.) Jyoti Bhakare Offg. Registrar & Member Secretary (SET)

IMG 20250123 165050
SET EXAM UPDATE

SET EXAM UPDATE

महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे

सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा

OW/2025/G/10

दिनांक: २३/०१/२०२५

परिपत्रक क्र. १५ / २०२५

विषय ४०व्या सेट परीक्षेबाबत.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुचनेप्रमाणे आतापर्यंत ३९ सेट परीक्षांचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पारंपारिक पध्दतीने (OMR based) करण्यात आलेले आहे.

यापूर्वी दि. २७/१२/२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले परिपत्रक क्र. ३१४/२०२४ रह करण्यात येत असून या परिपत्रकाद्वारे सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, ४० वी सेट परीक्षा पूर्वी प्रमाणेच पारंपारिक पध्दतीने (OMR based) रविवार दि. १५ जून, २०२५ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

अधिक जाणून घ्या या ओळीला स्पर्श करून

सवय, रविवार दि. १५ जून, २०२५ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या ४०व्या सेट परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक, अभ्यासक्रम व इतर अनुषंगिक माहिती वेळोवेळी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

IMG 20250123 165059
SET EXAM UPDATE

प्रा. (डॉ.) ज्योती भाकरे प्रभारी कुलसचिव तथा सदस्य सचिव

IMG 20241227 215125
SET EXAM UPDATE

SET EXAM UPDATE

State Level Eligibility Test 2025

rajya stariy patrata pariksha

SET EXAM 40TH 2025 Information

महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट)

(विद्यापीठ अनुदान आयोग मान्यताप्राप्त व महाराष्ट्र व गोवा शासन प्राधीकृत)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा

OW/2024/G/194

दिनांक: २७/१२/२०२४

परीपत्रक क्र. ३१४/२०२४

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुचनेप्रमाणे आतापर्यंत ३९ सेट परीक्षांचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पारंपारीक पध्दतीने (OMR based) करण्यात आलेले आहे.

या परीपत्रकाद्वारे सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, ४० वी सेट परीक्षा पूर्वी प्रमाणेच पारंपारीक पध्दतीने (OMR based) रविवार दि. ४ मे, २०२५ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

सबब, रविवार दि. ४ मे, २०२५ रोजी आयोजित परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक, अभ्यासक्रम व इतर अनुषंगिक संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. करण्यात येणाऱ्या ४० व्या सेट माहिती वेळोवेळी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

प्रा. (डॉ.) ज्योती भाकरे

कुलसचिव तथा सदस्य सचिव

SET exam schedule declared SET EXAM 2025 DATE 4th May 2025

IMG 20241227 215137
SET EXAM UPDATE

circular of Maharashtra state SET EXAM 40th 2025 LINK

1 thought on “SET EXAM UPDATE”

Leave a Comment

error: Content is protected !!