Shalanchi Patpadtalni
Shalanchi Patpadtalni
Shalanchi Patpadtalni GR Circular
Shalanchi Patpadtalni Guidelines
Shalanchi Patpadtalni Velapatrak Time Table Date Shedule
Shalanchi Patpadtalni margdarshak suchna
Regarding the inspection of schools in the state
Regarding the screening of students in schools in the state.
पटपट आणि पूर्व नियोजन नमुना
महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे
दिनांक:
क. शिसमा/ टि-८६/२०२५-२01820129
31 MAR 2026
प्रति,
विभागीय शिक्षण उपसंचालक (सबै)
शिलणाधिकारी (प्राथनिक माध्यमिक जिल्हा परिषद (सर्व) शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण, उत्तर बृहन्मुंबई
विषय: राज्यातील शाळांची पटपडताळणी करणेबाबत.
संदर्भ:- शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, शासनपत्र क्रमांक: लवेसु-१२२५/प्र.क्र.१०/२५/ एराएम.३, दिनांक ०३.११.२०२५
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने राज्यातील शाळांची पटपडताळणी करण्याबावत खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.
१. इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी विद्याथ्यांची पटपडताळणी करण्याची आवश्यकता नाही. बोर्डाच्या परीक्षेमधील विद्यार्थी उपस्थिती ही ग्राह्य धरण्यात येईल.
२. शैक्षणिक सत्र २०२५-२६ माय इयत्ता ११ वी मधील विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षेतील मराठी, इंग्रजी आणि भौतिकशास या विषयाच्या परीक्षेच्या दिवशी पटपडताळणी करण्यात यावी.
३. इयत्ता २ री ते इयत्ता ८वी च्या वर्गाच्या बाबतीत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी आयोजित केलेल्या नियतकालिक मूल्यांकन डावणी (PAT) परीक्षेच्या दिनांकादिवशी म्हणजेच ११/०४/२०२६० १५/०४/२०२६,२२/०४/२०२, रोजी करण्यात यावी,
४. इयत्ता ९ वी या वर्गाच्या बावतीत पटपडताळणी उपरोक्त तारखांच्या (११/०४/२०२६, १५/०४/२०२६,२२/०४/२०२०) दिवशीच करणे नियोजित आहे.
५. राज्यातील सर्व शाळामधील पटपडताळणी दिनांक ११/०४/२०२६, दिनांक १५/०४/२०२६ व दिनांक २२/०४/२०२६ या तीन दिवशी करण्याच्या अनुषंगाने इयत्ता ९ वी चे मराठी, गणित व इंग्रेजी या विषयांची वार्षिक परीक्षा अनुक्रमे दि. २१ एप्रिल २०२६, ११ एप्रिल २०२६ व २२ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात
६. तसेच इयत्ता ११ वीच्या बाबतीत मराठी, भौतिकशाख व इंग्रजी या विषयांची वार्षिक परीक्षासुध्दा अनुक्रमे दि.११ एप्रिल २०२६, १५ एप्रिल २०२६ व २२ एप्रिल २०२१, रोजी आयोजित करण्यात यावेत. जेणेकरुन राज्यातील सर्व शाळांमधील इयता से लेती की पटपडताळणी उपरोक्त तीन दिवशी पुर्ण होईल,
७. राज्यातील शाळांवी पटपडताळणी करण्याचे अनुषंगाने स्टुडंट पोर्टलवर HM Login, Cluster Head Login, BEO Logn 4 EO Logn वर सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पटपडताळणीच्या अनुषंगाने शाळेस भेट देणारे पथक उपरोक्त लॉगीनचा वापर करुन हजार व गैरहजर विद्यार्थ्यांची नोंद करतील. या सुविधेबाबत सविस्तर माहीती / सूचना आपणास ७ एप्रिल २०२६, रोजी किंवा तत्पूर्वी कळविण्यात येईल.
८. राज्यातील शाळांची पटपडताळणी करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आवश्यक आहे. त्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील केंद्र प्रमुख, गट शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य, योजना), लेखाधिकारी, अधीक्षक (शालेय पोषण आहार), जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (IET) पे अधिव्याख्याता वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक चे अधीक्षक व विस्तार अधिकारी संवर्ग इ. याची नेमणूक शाळेस भेट देणारे पथक म्हणून करावी व शाळेस प्रत्यक्ष भेट देवून पटपडताळणी करण्यासाठी नेमणूक करण्यात यावी.
९. शिक्षणाधिकारी (माध्य/ प्राथ) यांनी शाळा निहाय पटपडताळणीचे नियोजन आपल्या पातळीवरुन एकत्रितपणे करावे. अंमलबजावणी प्रभावीपणे होईल याकडे लक्ष द्यावे.
Digitally signed by
SHARAD SHANKARGIRI GOSAVI Date: 31-03-2026 13:27:16
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक
प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे
Digitally signed by
PALKAR MAHESH MADHUKAR
Date: 30-03-2026 20:25:54
(डॉ. महेश पालकर)
शिक्षण संचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
