Shalana Fibre To The Home Broadband Connectivity
Shalana Fibre To The Home Broadband Connectivity
Shalana Fibre To The Home (FTTH) Broadband Connectivity
BSNL kadun shalanna Fibre to the Home (FTTH) broadband connectivity upalabdha
BSNL provides Fibre to the Home (FTTH) broadband connectivity to schools
shalanna Fibre to the Home (FTTH) broadband connectivity BSNL kadun upalabdha
rajyatil 1,115 gramin bhagatil shasakiy madhyamik v uccha madhyamik shalanmadhye Fibre to the Home (FTTH) broadband connectivity BSNL kadun upalabdha karun denebabat
Regarding provision of Fibre to the Home (FTTH) broadband connectivity by BSNL in 1,115 government secondary and higher secondary schools in rural areas of the state
जा.क्र. मप्राशिप/समग्र शिक्षा/संगणक/२०२६-२७/
दिनांक :
प्रति,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद – सर्व.
संदर्भ: BSNL यांच्या सोबत झालेला सामंजस करार दि. २२/०७/२०२६.
उपरोक्त संदर्भिय विषयाच्या अनुषंगाने राज्यातील १,११५ ग्रामीण भागातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये Fibre to the Home (FTTH) ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी भारत संचार निगम लिमिटेड, मुंबई यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने या कार्यालयासोबत दि. २२ जुलै, २०२६ रोजी सामंजस (MOU) करार झालेला आहे. कराराच्या अनुषंगाने १,११५ शाळांमध्ये इंटरनेट वापराचे एकत्रित मासिक देयक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई या कार्यालयामार्फत अदा करण्यात येणार आहे.
भारत संचार निगम लिमिटेड, मुंबई यांच्या कार्यालयाकडून ग्रामीण भागातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक १,११५ शाळांमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने, त्यांच्याकडून येणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना इंटरनेट सुविधा बसविण्याकरिता शाळेच्या मुख्याध्यापकांना आपल्या स्तरावरून सहकार्य करण्यासाठी कळविण्यात यावे. सोबत दिलेल्या यादी प्रमाणे इंटरनेट सुविधा कार्यान्वित झाल्यानंतर या कार्यालयास अहवाल सादर करावा.
सोबत : राज्यातील १,११५ ग्रामीण भागातील शाळांची यादी.
Digitally signed by Sanjay Lalasaheb Yadav Date: 24-07-2026 18:26:10
(संजय यादव, भा.प्र.से.) राज्य प्रकल्प संचालक म.प्रा.शि.प., मुंबई.

राज्यातील १,११५ ग्रामीण भागातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये Fibre to the Home (FTTH) ब्रॉडबैंड कनेक्टिव्हिटी BSNL कडून उपलब्ध करून देणेबाबत
जा.क्र मप्राशिप/समग्र शिक्षा/संगणक / BSNL/२०२६-२७/2537
दिनांक: 30 JUL 2026
पुरवठा आदेश (Supply Order)
प्रति,
M/s. Pr. General Manger (CFA) 0/0 CGM Maharashtra Telecom Circle, Juhudanda Admin, Complex, 1st Floor, ‘D’ Wing] Juhu Road Santacruz (W), Mumbai-400054.
संदर्भ: १) अवर सचिव, महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे जा.क्र. ई-गव्ह-२०२६/प्र.क्र.२१/संगणक दि. २३/०६/२०२६ रोजीचे इतिवृत्त.
२) सामंजस्य (MOU) करार दि. २२ जुलै, २०२६.
उपरोक्त संदर्भिय पत्र क्र. १ नुसार राज्यातील ग्रामीण भागातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये Fiber to the Home (FTTH) ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी BSNL कडून उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने कळविण्यात आले आहे.
संदर्भिय पत्र क्र. २ नुसार १११५ शाळांमध्ये Fiber to the Home (FTTH) ब्रॉडबैंड कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्यासाठी खालील नमूद केलेल्या अर्टी व शर्तीनुसार पुरवठा आदेश देण्यात येत आहे.
सामंजस्य (MOU) करारानुसार १११५ शाळांमध्ये Fiber to the Home (FTTH) ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी उपलब्ध देण्यात येणारा तपशील पुढील प्रमाणे –
Sr. No.
1 Plan Details
Plan Name
2 Fiber_BB_MH Govt_799
Genration of CAF
3 Centrally
Billing Pattern
4 Centralized Quarterly billing, First bill to be issued in the first month once connection is installed, subsequent bills after every three months.
Advance one time payment for provisioning Nil of connection
5 Installation Charges
Nil
6 Wi-Fi ONT cost
Nil
7 Plan Type
Monthly Bandwidth (Download speed)
Plan 799 (FTTH-Broadband)
8 Upto 100 Mbps till 3300GB, Upto 2 Mbps beyond
9 Monthly charges (Rs)
799+GST
10 Download limit speed per month
Unlimited
11 Voice calling
24Hrs. Unlimited free calling (Local +STD)
12 Static IP
No Static IP will be provided
13 Additional facility like OTT etc.
Not Applicable
14 Charges for extras fiber beyond 500 meters leads
Rs 10/- per meter.
15 Centralized Billing Approval & Monitoring
school SPOC details to be shared
16 Centralized CAF Approval & Monitoring
school SPOC details to be shared.
अटी व शर्ती :-
पुरवठा आदेश प्राप्त झाल्यानंतर स्विकृती असल्याबाबत या कार्यालयास १५ दिवसाचे आत कळविण्यात यावे.
पुरवठादाराने आदेशातील आणि MOU मधील सर्व अटी व शर्तीचे पालन करणे बंधनकारक असेल.
पुरवठा आदेशासोबत उपलब्ध करून दिलेल्या शाळेच्या यादीनुसार इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक असले.
शाळेला इंटरनेट सुविधा उपलब्ध आणि सुरू झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर देयके अदा करण्यात येईल.
केंद्र व राज्य शासनाकडून मंजूर होणारा निधी व निधी उपलब्ध झाल्यानंतर देयक अदा करण्यात येईल.
पुरवठा सेवादाराने वेळोवेळी याप्रकरणी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास लेखी सादर करावा.
पुरवठादाराने सदर उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता प्रोजेक्ट मॅनेजरची निवड करून या कार्यालयास त्याचे नाव, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी याबाबतची सविस्तर माहिती लेखी कळवावे.
पुरवठादाराने निविदेतील अटी व शर्तीनुसार काम न केल्यास पुरवठा आदेश स्थगित, रद्द, मुदतवाढ देण्याचे सर्व अधिकार राज्य प्रकल्प संचालक यांचेकडे राखून ठेवण्यात आले आहेत.
सोबत : सामंजस्य (MOU) करार व १११५ शाळांची यादी.
(संजय यादव, भा.प्र.से.)
राज्य प्रकल्प संचालक, म.प्रा.शि.प., मुंबई.
