These rules may be called the Maharashtra Registration of Births and Deaths
(Amendment) Rules, 2026
Maharashtra Janm V Mrutyu Nondani (Sudharana) Niyam 2026
Maharashtra Registration of Births and Deaths (Amendment) Rules, 2026
Maharashtra Registration of Births and Deaths
RNI No. MAHBIL/2009/31733
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-अ
वर्ष १२, अंक ९८]
शुक्रवार, जुलै ३१, २०२६/ श्रावण ९, शके १९४८
[पृष्ठे ५४, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ३२४
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
सार्वजनिक आरोग्य विभाग
१० वा मजला, गोकुळदास तेजपाल रुग्णालय आवार, नवीन मंत्रालय, मुंबई ४०० ००१,
दिनांक ३१ जुलै, २०२६.
अधिसूचना
जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९.
क्रमांक जमृनों-२०२४/१६/प्र.क्र. ७०/ कु.क.२. जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ (१९६९ चा १८) याच्या कलम ३० द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, केंद्र सरकारच्या मान्यतेने याद्वारे महाराष्ट्र जन्म व मृत्यू नोंदणी नियम, २००० मध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी पुढीलप्रमाणे महाराष्ट्र जन्म व मृत्यू नोंदणी (सुधारणा) नियम, २०२६ करीत आहे:-
(२) ते शासकीय राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील.
२. महाराष्ट्र जन्म व मृत्यू नोंदणी नियम, २००० (यात यापुढे ज्याचा निर्देश “मुख्य नियम” असा केला आहे) याच्या नियम ५ मध्ये पोट-नियम (३) नंतर, पुढील पोट-नियम जादा दाखल केले जातील :-
(४) महाराष्ट्र जन्म व मृत्यू नोंदणी (सुधारणा) नियम, २०२६ यामध्ये निर्देशिलेल्या नमुन्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी नाव आले असेल तेथे ते (प्रथम नाव), (मधले नाव), (आडनाव) या स्वरूपात नमूद करण्यात येईल आणि त्यामध्ये कोणत्याही संक्षिप्त रूपांचा समावेश असणार नाही.
(५) महाराष्ट्र जन्म व मृत्यू नोंदणी (सुधारणा) नियम, २०२६ यामध्ये निर्देशिलेल्या नमुन्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी दिनांक आला असेल तेथे तो दिवस महिना-वर्ष या स्वरूपात नमूद करण्यात येईल. जेथे दिनांक असेल तेथे दिवस दोन अंकी, महिना दोन अंकी आणि वर्ष हे चार अंकी असे नमूद करण्यात येईल.
(६) महाराष्ट्र जन्म व मृत्यू नोंदणी (सुधारणा), नियम, २०२६ यामध्ये निर्देशिलेल्या सर्व नमुन्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी पत्ता आला असेल, तेथे त्यामध्ये राज्य, जिल्हा, उपजिल्हा, शहर किंवा गाव, प्रभाग क्रमांक, (शहराच्या बाबतीत उपलब्ध असल्यास) परिसर, घर क्रमांक व पिन कोड यांचा समावेश असेल :
भाग चार-अ-३२४-१
(१)

janm v mrutyu nondani adhinium, 1969.
Births and Deaths Registration Act, 1969.
RNI No. MAHBIL/2009/31733
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-अ
वर्ष १२, अंक ९८ (२)]
शुक्रवार, जुलै ३१, २०२६/श्रावण ९, शके १९४८
[पृष्ठे ६, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ३२५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
सार्वजनिक आरोग्य विभाग
गोकुळदास तेजपाल रुग्णालय, संकुल इमारत, १० वा मजला, नवीन मंत्रालय, मुंबई ४०००३२,
दिनांक ३१ जुलै २०२६.
अधिसूचना
जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९.
क्रमांक जमृनों-२०२४/१६/प्र.क्र.७०/कु.क.२. जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ (१९६९ चा १८) याच्या कलम ४, ६, ७ व १० द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, आणि उक्त अधिनियमान्वये निबंधकाच्या नियुक्तीशी संबंधित सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व अधिसूचना, आदेश व इतर संलेख यांचे अधिक्रमण करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे :-
(अ) उक्त अधिनियमाच्या प्रयोजनार्थ, या सोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (२) मधील अधिकारी, स्तंभ (३) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या पदनामाद्वारे, स्तंभ (४) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या स्थानिक क्षेत्रांसाठी नोंदणी अधिकारी म्हणून पुढीलप्रमाणे नियुक्त करीत आहेत; आणि
(ब) प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रातील आरोग्य सेवकांना, उक्त अधिनियमाच्या प्रयोजनार्थ, प्रत्येक जन्म किंवा मृत्यू बद्दल निबंधकास अधिसूचित करण्यासाठी सूचक म्हणून विनिर्दिष्ट करीत आहेत.
भाग चार-अ-३२५-१
(१)
