SENIOR AND SELECTION GRADE TRAINING 2024-25 OFFLINE IN DIET
SENIOR AND SELECTION GRADE TRAINING 2024-25 OFFLINE IN DIET
SENIOR AND SELECTION GRADE TRAINING 2024-25 OFFLINE IN DIET
वरिष्ठ वेतन व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण
नमस्कार 🙏
मा. संचालक scert पुणे यांच्या आदेशानुसार,
- वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणार्थी यांनी आपल्या प्रशिक्षण केंद्रावर दिलेल्या वेळेपूर्वी किमान अर्धा तास म्हणजे सकाळी 9.00 वाजता उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
- राज्यस्तरावरील सूचनानुसार 9.15 वाजता समन्वयक यांना पोर्टलवर आपली उपस्थिती अपलोड करायची आहे. तसेच प्रत्येक तासिकेला ऑनलाईन व ऑफलाईन अशी दोन्ही प्रकारे उपस्थिती राज्यस्तरावरून पोर्टल मार्फत घेतली जाणार आहे.
- एखाद्या वेळी कोणत्याही कारणाने संबंधिताची उपस्थिती पोर्टल द्वारे पाठविली गेली नाही तर पुढच्या तासिकेपासून संबंधित प्रशिक्षणार्थी यांचे नाव यादीतून आपोआप डिलीट केले जाणार आहे.
- प्रत्येक तासिकेला शेवटच्या 10 मिनिटात वस्तुनिष्ठ ऑनलाईन चाचणी सुद्धा द्यावी लागणार आहे.त्यासाठी प्रत्येकाजवळ इंटरनेट सुविधा असलेला मोबाईल आवश्यक असेल. त्यातही 50% गुणांसह उत्तीर्ण होणे अनिवार्य आहेत.
- प्रशिक्षण संदर्भातील प्रत्येक कृती 100% उपस्थिती सह यशस्वीरित्या पूर्ण केल्या खेरीज प्रशिक्षण पूर्ततेचे प्रमाणपत्र पोर्टलवरून डाउनलोड होणार नाही अशी सक्त सूचना राज्य स्तरावरून देण्यात आलेली असल्याने सर्व प्रशिक्षणार्थी बंधू भगिनी यांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी.
- तसेच मधल्या वेळच्या जेवणाची व्यवस्था प्रशिक्षणार्थी यांनी स्वतः करायची आहे. प्रशिक्षण केंद्रावर भोजन, नास्ता, चहा यापैकी कोणतीही व्यवस्था प्रशिक्षण स्थळी असणार नाही.
- अशा प्रकारे प्रशिक्षण उपस्थिती, ऑनलाईन हजेरी, ऑनलाईन चाचणी, स्वाध्याय पूर्तता, लेखी चाचणी या सर्व बाबी राज्यस्तरावरून सनियंत्रित होणार आहेत त्यात प्रशिक्षण केंद्र तथा जिल्हास्तरावरून कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप संधी असणार नाहीय त्यामुळे सर्व संबंधितानी या बाबतीत आपापली खबरदारी घेऊन प्रशिक्षणाची आचारसंहिता – मार्गदर्शक सूचना पाळाव्यात ही माझी विनंती आहे.
- अशा प्रकारे राज्यस्तरावरून एकच वेळी राज्यभरात सारख्या वेळापत्रकानुसार सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.30 या वेळेत चालणारे प्रशिक्षण पहिल्यांदा आयोजित होत आहे.
सर्व क्षेत्रिय अधिकारी यांनी या सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील अपेक्षित प्रशिक्षणार्थी यांचे पर्यंत तात्काळ पोहचवाव्यात. ही विनंती आहे 🙏
Also Read 👇
वरिष्ठ वेतन व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण
प्रास्ताविक
शिक्षक म्हणून आपण बारा वर्षे सेवा पूर्ण केली आहेत. वरिष्ठ वेतन श्रेणी प्राप्त करण्यासाठी हे सेवांतर्गत प्रशिक्षण अनिवार्य आहे. तसेच शिक्षक म्हणून आपण चोवीस वर्षे सेवा पूर्ण केली आहेत. निवड वेतन श्रेणी प्राप्त करण्यासाठी हे सेवांतर्गत प्रशिक्षण अनिवार्य आहे.भविष्यकाळाचा वेध आणि वर्तमानातील बदल अंगीकारण्यासाठी दिशा आणि मार्गदर्शन करण्याचे काम या प्रशिक्षणातून साधले जाणार आहे. सेवेत रुजू होतानाची परिस्थिती आणि त्यानंतर झालेली स्थित्यंतरे यासाठी स्वतःला सिद्ध करणे आवश्यक आहे. प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०, राज्य अभ्यासक्रम आराखडा, शिक्षणप्रक्रियेत नव्याने होत असणारे बदल, ध्येय धोरणे, कायदे, बदलते अध्यापनाविषयीचे दृष्टिकोन, शिक्षण व्यवस्था यांना समजून घेणे आणि तसे बदल आपल्या अध्यापनात करणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन प्रशिक्षणातील घटकांची निवड करण्यात आली आहे.
वरिष्ठ वेतन व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण हे सलग दहा दिवस प्रत्यक्ष स्वरूपात असणार आहे. प्रशिक्षणातून आपली कौशल्ये व क्षमतांचे केले जाणारे मूल्यमापन हे नक्कीच आपल्याला सक्षम बनवेल, या प्रशिक्षणाचे घटक निश्चित करत असताना प्रशिक्षण हे शिक्षकांच्या व्यावसायिक गरजा आणि सदद्यपरिस्थितीतील बदलांचा, नावीन्यांचा विचार करून निवडण्यात आले आहेत. प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन शैक्षणिक कार्यात व शालेय व्यवस्थापनात हे प्रशिक्षण नक्कीच मार्गदर्शक आणि दिशादर्शक असणार आहे.
प्रशिक्षणाची उद्दिष्टे :
१) राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० व राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२४ यानुसार शालेय कामकाज करण्यास सक्षम करणे,
२) बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ व विविध शासकीय योजना प्रभावीपणे शाळेत राबवण्यासाठी प्रोत्साहित करणे.
३) शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) यानुसार शाळांचा गुणवत्तापूर्ण दर्जा सुधारण्यासाठी मार्गदर्शन करणे.
४) अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत २१ व्या शतकासाठीची कौशल्ये, अध्यापन शास्त्रीय दृष्टिकोनाचा वापर वर्ग अध्यापनात करतील.
५) शालेय अभिलेखे या विषयाची अदद्ययावत माहिती देणे.
६) शालेय समस्या सोडवण्यासाठी प्रकल्प, नवोपक्रम, कृती संशोधन याचे महत्त्व विशद करणे.
७) मूल्यमापनाच्या विविध पद्धती वापरून विदधार्थ्यांच्या समग्र मूल्यमापनाची माहिती देणे.
८) शालेय कामकाजात सुलभता व गतिमानता आणण्यासाठी माहिती तंत्रज्ञान व ऑनलाईन स्त्रोतांचीओळख करून देणे.
९) शिक्षकांना स्वतःचा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास साधण्यासाठी प्रोत्साहित करणे,
१०) विषयनिहाय गटचर्चेतून अध्ययन अध्यापनातील समस्यांचे निराकरण करणे.
प्रशिक्षणाचे स्वरूप :
वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण हे सलग दहा दिवस असणार आहे. प्रत्येक दिवसाची सुरुवात ही परिपाठ होईल. त्यानंतर आदर्श शाळेविषयी ध्वनीचित्रफित दाखवून त्यावर आधारित चर्चा आयोजित केली जाईल यामध्ये सर्वांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे. मोठ्या सुट्टीनंतर प्रेरणादायी व मूल्यशिक्षणाक आधारित अशी ध्वनीचित्रफित दाखवली जाईल व त्यावर आधारित चर्चा आयोजित केली जाईल. यात आस्त सक्रिय सहभाग आवश्यक असेल, तसेच प्रत्येक दिवशी पाच सत्रे ही प्रशिक्षणाच्या अध्ययन निष्पत्ततीनुसार विविध विषयांवर आयोजित केली आहेत. त्या सर्वांसाठी उपस्थिती अनिवार्य असेल.
प्रशिक्षण काळात पूर्व चाचणी (बहुपर्यायी व ऑनलाइन) आणि उत्तर चाचणी (लेखी व ऑफलाइन) असणार आहे. लेखी चाचणीचे गुण प्रशिक्षणार्थ्यांच्या मूल्यमापनात समाविष्ट होतील.
बहुपर्यायी ऑनलाइन चाचणी ही तासिकेनंतर घेण्यात येणार आहे. त्यात किमान ५०% गुण संपादन करणे हे प्रशिक्षण समाधानकारकरित्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहे.
प्रत्येक तासिकेनंतर सुलभकाच्या तासिकेतील कामगिरी संदर्भात ऑनलाइन प्रत्याभरण देण्याची सोय आहे. प्राप्त माहिती व विश्लेषण केंद्रसंचालकांना व सुलभकाला उपलब्ध होणार आहे.
प्रशिक्षणार्थीसाठी सूचना :
प्रशिक्षणादरम्यान
१) प्रशिक्षण काळात प्रत्येक दिवशी वेळेत आणि पूर्णवेळ उपस्थित असणे अनिवार्य आहे.
२) प्रत्येक सत्रात सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे.
३) प्रशिक्षणादरम्यान बहुपर्यायी चाचणी, स्वाध्याय असे मूल्यमापन केले जाणार आहे.
४) वेळोवेळी दिलेली कार्ये निर्धारित वेळेत पूर्ण केलेली असावीत.
प्रशिक्षणानंतर :
प्रशिक्षण काळातील स्वाध्यायाव्यतिरिक्त पाच स्वाध्याय व नवोपक्रम/प्रकल्प/कृती संशोधन अहवाल हे प्रशिक्षण संपल्यापासून कमाल ४० दिवसांत पूर्ण करून ते प्रशिक्षण केंद्रावर जमा करणे आवश्यक आहे. निर्धारित वेळेनंतर गृहकार्य स्वीकारले जाणार नाही.
प्रशिक्षणकाळातील मूल्यमापन :
अ) प्रत्येक घटकावर आधारित प्रत्येक तासिकेनंतर वस्तुनिष्ठ स्वरूपात एक चाचणी घेतली जाईल. हे बहुपर्यायी प्रश्न, विषयज्ञान, आकलन, विषयाचे पूर्वज्ञान तासिकेतील विषयावर वाचन साहित्य यावर आधारित असे असतील, त्या चाचणीत १० प्रश्नांचा समावेश असेल. त्या प्रत्येक प्रश्नाला प्रत्येकी १ गुण असेल. अशा स्वरूपाच्या प्रत्येक घटकावर आधारित चाचण्या असणार आहेत. एकूण घेण्यात वेणाऱ्या चाचण्यांमध्ये प्राप्त गुणांचे शंभर गुणात रूपांतर केले जाईल.
(प्रत्येक तासिकेनंतर संबंधित घटकांवर आधारित ऑनलाइन चाचणी घेण्यात येईल. सदर चाचणी बहुपर्यायी प्रश्न प्रकाराची असेल. चाचणी पूर्ण झाल्यानंतरच सबमिट या बटनावर क्लिक करावे. एकदा ऑनलाइन चाचणी सबमिट केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत ती चाचणी पुन्हा सुरू होणार नाही याची नोंद घ्यावी. निर्धारित वेळेत आपण चाचणी दिली नाही तर त्या घटकावर आधारित चाचणी पुन्हा देता येणार नाही.)
ब) प्रशिक्षणकाळात आपणास देण्यात आलेल्या पाच घटकांवर आधारित स्वाध्याय लेखन करणे अनिवार्य राहील. सदरचे पाच स्वाध्याय गटात चर्चा करून प्रशिक्षण काळात (एक दिवसाआड) जमा करावेत, गटनिहाय एकच लेखन केले जावे. ज्याचे गुण गटातील सर्वांना एकसारखे दिले जातील. उर्वरित ५ स्वाध्याय प्रशिक्षणोत्तर काळात वैयक्तिकरित्या लेखन करून पूर्ण करावे लागतील. एकूण दहा स्वाध्याय (पाच स्वाध्याय प्रशिक्षण काळात व पाच प्रशिक्षणोत्तर काळात) पूर्ण करावे लागतील.
क) संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शेवटच्या दिवशी ५० गुणांची लेखी चाचणी घेतली जाईल. लेखी चाचणीचे स्वरूप रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा, एका वाक्यात उत्तरे दया, टिपा लिहा, लघुत्तरी, उपयोजनात्मक आणि मुक्तोत्तरी असे राहील. गटकार्य / स्वाध्याय/प्रात्यक्षिक हे फुलस्केप कागदावर लिहिणे अपेक्षित आहे.
प्रशिक्षणोत्तर मूल्यमापन :
अ) प्रशिक्षणानंतर संपूर्ण मूल्यमापन प्रक्रियेसंदर्भातील स्वाध्याय व अहवाल ४० दिवसांत पूर्ण करणे आवश्यक आहे. ३) उर्वरील पाच स्वाध्यायांचे वैयक्तिक लेखन करून प्रशिक्षणानंतर ४० दिवसांनी जमा करावेत.
प्रशिक्षणोत्तर काळात एकूण ५ स्वाध्याय पूर्ण करावे लागतील. त्या प्रत्येक स्वाध्यायास १० पैकी गुण देऊन गुणांकन केले जाईल.
क) नवोपक्रम/प्रकल्प/कृती संशोधन अहवाल मूल्यमापनासाठी आपणास पूर्ण करावे लागतील. (यापैकी कोणताही एक) त्यासाठी ५० गुण असणार आहेत.
गुणदान योजना
(अ) चाचणी १००
(4) स्वध्याय १००
(क) लेखी चाचणी ५०
(3) अहवाल लेखन ५०
एकूण गुण ३००
उत्तीर्णतेचा निकष :
प्रशिक्षणादरम्यान व प्रशिक्षणोत्तर अशा दोन्ही मूल्यमापन प्रक्रियेत किमान ५०% गुण मिळवणे बंधनकारक असेल, मूल्यमापनात निकषाप्रमाणे गुण प्राप्त न केल्यास आपणास सदरचे प्रशिक्षण भविष्यात शासन जेव्हा निर्धारित करेल तेव्हा पुन्हा नोंदणी व शुल्क भरून पूर्ण करणे अपेक्षित असेल.
Also Read
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
महाराष्ट्र शासन
दरपत्रक सूचना क्र.१
वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी ऑनलाइन पोर्टल विकसित करणे सन २०२४-२०२५
वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणी ऑफलाइन प्रशिक्षणासाठी सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थीची शिक्षकांचे प्रशिक्षण (नोंदणी, शुल्क, प्रमाणपत्र व इतर सहाय्य) करिता ऑनलाइन पोर्टल विकसित करावयाचे आहे. त्या अनुषंगाने अधिकृत संगणक एजन्सी कडून खालील नमूद बाबींच्या समावेशासह वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या संदर्भाने नवीन ऑनलाइन पोर्टल विकसित करणे करिता दरपत्रक मागवण्यात येत आहे.
अ. क्र पोर्टलमध्ये समावेशित करावयाच्या आवश्यक बाबी मधील
प्रशिक्षणार्थीना / शिक्षकांना माहिती नोंदणी करण्यासाठी विहित नमुन्यात पोर्टल विकसित करणे.
प्रशिक्षण शुल्क ऑनलाईन (payment gateway) जमा करून पावती देणे. व सर्व व्यवहारांचे विहित नमुन्यात अहवाल देणे
नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थीना SMS किंवा E- MAIL द्वारे CONFIRMATION देणे. याविषयीची विहित प्रक्रिया करणे.
प्रशिक्षणार्थीना नोंदणी क्रमांक विकसन (password मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून देणे.)
जिल्हास्तरावर प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) यांना Login ID देणे. व सूचनेप्रमाणे माहिती उपलब्ध करून देणे तसेच प्रशासकीय पद्धती राबवणे उदा. हजेरीचा फोटो अपलोड करणे इ.
६ जिल्हास्तरावर प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (36 DIET) यांना नोंदणी (शिक्षक माहिती, बॅच, गट, प्रशिक्षण प्रकार, शुल्क परतावा इ.) मध्ये दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देणे.
७ निवडलेल्या प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षणादरम्यान आवश्यक मार्गदर्शक सूचना व जिल्हानिहाय जिल्हासमन्वयकांची नावे व संपर्क क्रमांक विहित नमुन्यात प्रसिद्ध करणे.
८प्रशिक्षणाची Progress ची Day to Day माहिती उपलब्ध होणे. उदा. हजेरी, सुलभक । प्रशिक्षणार्थी online survey (feedback) इ.
९ तज्ञ प्रशिक्षकांची/ मार्गदर्शकांची ऑनलाइन नोंदणी करणे. (दैनिक भत्ता मानधन, प्रवास भत्ता इ.)
१० प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर जिल्हा स्तरावर online पद्धतीने अटी शर्तीना अधीन राहून प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे. (उदा. एकही सेशन गैरहजर असेल तर प्रमाणपत्र तयार होऊ नये इ.)
उपरोक्त विवरणामध्ये उल्लेखित कामे करण्यासाठी लागणारे साहित्य व सेवा याबाबतचे दर पत्रक वरील नमुन्यात या कार्यालयास उपलब्ध करून द्यावे.
अटी व शर्ती –
वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणा बद्दल अधिक जाणून घ्या त्यासाठी या ओळीला स्पर्श करा
- दरपत्रक (सर्व करांसहित) सीलबंद लखोट्यात संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, ७०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे ४११०३० या नावे दिनांक १०.१२.२०२४ अखेर सायंकाळी ०५ वाजेपर्यंत सादर करण्यात यावे. सादर करण्यात येणाऱ्या सीलबंद लखोट्यावर वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी ऑफलाइन प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी करिता पोर्टल विकसित करण्यासाठी दरपत्रक असा स्पष्ट उल्लेख असावा.
- कोणत्याही परिस्थितीत अग्रीम स्वरूपात रक्कम दिली जाणार नाही.
- विहित मुदतीनंतर आलेली दरपत्रके विचारात घेतली जाणार नाहीत.
- दर अक्षरी व अंकी बाबनिहाय नमूद करावेत, त्यामध्ये खाडाखोड असू नये.
- नमूद केलेले दर हे सर्व करासहित आकारलेले असावेत. याव्यतिरिक्त कोणतीही रक्कम कोणत्याही परिस्थितीत दिली जाणार नाही.
- एकूण रकमेवर नियमानुसार टी.डी. एस. आकारला जाईल.
- दर पत्रकासोबत शॉप अॅक्ट रजिस्ट्रेशन, पॅन कार्ड व जी.एस.टी. एजन्सी चे तत्सम प्राधिकरणाकडील नोंदणी प्रमाणपत्राची छायांकित प्रत सादर करावी.
- निवड झालेल्या संगणक एजन्सी धारकास उपरोक्त अटी व शर्ती मान्य असल्याचे लेखी हमीपत्र रुपये 500/- च्या स्टॅम्पपेपर वर द्यावे लागेल..
- या कार्यालयाच्या आवश्यकतेनुसार वेळोवेळी उपस्थित राहून तांत्रिक बाबींचे सर्व अहवाल या कार्यालयास वेळेत व त्या वेळेच्या आवश्यकतेनुसार तात्काळ सादर करावे लागतील.
- आपले देयक आपण पुरवलेल्या सेवा। वस्तू यांचे या कार्यालयाकडून गुणवत्तापूर्ण असल्याबाबत खात्री केल्यानंतरच अदा केले जाईल.
- या कामासाठी योग्य संगणक प्रणाली विकसित करणे एजन्सीकडे सर्व data online ठेवण्यासाठी आवश्यक क्षमतेचे servers उपलब्ध असणे आवश्यक आहे.
- SMS द्वारे प्रशिक्षणार्थ्यांना सूचना देण्यासाठी येणारा खर्च; सेवा पुरवण्यासाठी पात्र होणाऱ्या संस्थेने करावा.
- उपरोक्त्यानुसार वेळोवेळी आवश्यक सेवा, दुरुस्त्या, सुधारणा व इतर तांत्रिक बाबी अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी संबंधित एजन्सीची असेल.
- या कार्यालयास आपणाकडून प्राप्त होणाऱ्या उपरोक्तानुसार अपेक्षित सेवेत तत्परता व आवश्यक गुणवत्ता आढळून न आल्यास, काम असमाधानकारक आढळल्यास प्रस्तुत सेवा करार आदेश रद्द करण्यात येईल.
- उपरोक्त कामातील अटी व शर्ती शिथिल करण्याचा तसेच कोणतेही दर पत्रक कोणतेही कारण न देता नाकारण्याचा अधिकार संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण, परिषद, महाराष्ट्र यांनी राखून ठेवलेला आहे.
- या संदर्भात यापूर्वी निर्गमित झालेले किंवा होणारे शासन आदेश परिपत्रक इत्यादी मधील तरतुदी व अटी / शर्ती बंधनकारक राहतील.
- प्रस्तुत कामाची मुदत आदेश दिल्यापासून एक वर्ष असेल.
- वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी ऑफलाईन प्रशिक्षणासाठी सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांच्या ऑनलाइन नोंदणीसाठी विकसित करण्यात येणाऱ्या पोर्टलवर संपूर्ण मालकी हक्क राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचा राहील.
राहूल रेखाबार (भा.प्र.से.) संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
प्रतः – प्रसिद्धीसाठी सूचनाफलकावर तातडीने लावण्यासाठी सादर
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,
पुणे
क्र. राशेसंप्रषम/सेवापूर्व शिक्षण एम. बी. टी.ई/२०२४/२७०५ दिनांक ०३/०६/२०२४.
प्रति.
सर्व प्राचार्य जिल्ला शिक्षण व प्रशिक्षण संस्था
विषय :- वरिष्ठ व निवडश्रेणी ऑफलाईन पध्दतीने जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थांमध्ये आयोजित करणेबाबत.
संदर्भ:
१) शासन निर्णय क्र. शिप्रधो २०१९/प्र.क्र.४३/प्रशिक्षण दि.२३/१०/२०१७.
२) शासन निर्णय क्र. शिप्रथो २०१९/प्र.क्र.४३/प्रशिक्षण दि.२०/०७/२०२१.
३) महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी (डायट) संघटना यांचे दि.२१/०२/२०२४ चे निवेदन
४) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) जळगांव यांचे पत्र क्र. जिशिप्रसं/जळगाव/ व.नि.श्रेणी प्र./२०२३-२४/६६.दि.२३/०२/२०२४.
५) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) धुळे यांचे पत्र क्र. जिशिवप्प्रसंधू/वनिश्रेप/२०८, दि.२३/०२/२०२४.
६) विभागीय शिक्षण उपसंचालक, अमरावती यांचे पत्र क्र.जा.क्र.जिशिपर्स/अम/ ववेश्रेवनिश्रे प्रशिक्षण/१५३/२४, दि.०१/०३/२०२४.
उपरोक्त विषयानुसार संदर्भ क्र.१ अन्वये वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाची जबाबदारी राज्य शासनाकडून परिषदेस सोपविण्यात आली आहे. संदर्भ क्र.२ नुसार किमान १० दिवसांचे किंवा ५० घडयाळी तासांचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक करण्यात आले. यापूर्वी कोचिड १९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीमुळे सदर प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरुपात घेण्यात आले होते. वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन पध्दतीने घेणेबाबत संदर्भ पत्र क्र.३ अन्वये महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी (डायट) संघटना यांचेकडून तसेच संदर्भ पत्र क्र.४ ते ६ अन्वये वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन पध्दतीने घेणेचाबत क्षेत्रिय कार्यालयांकडून विनंती करण्यात आली आहे.
Also Read – VARISHTHA V NIVAD SHRENI PRASHIKSHAN 2024-2025 UPDATE INFORMATION
वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणा बद्दल अधिक जाणून घ्या त्यासाठी या ओळीला स्पर्श करा
प्रत्यक्ष वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रशिक्षण प्रभावीपणे दिले जाऊन, प्रशिक्षणांतर्गत तज्ञांचे मार्गदर्शन व प्रशिक्षणाथीचे परस्परामधील संभाषणात्मक शैलीतून अनुभव व विचारांची देवाण-घेवाण सहजगत्या व्हावी तसेच सदर प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा उपयोग शैक्षणिक संवत होऊन शिक्षक अधिक सक्षम व्हावा या उद्देशाने वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे आयोजन सन २०२४-२५ पासून ऑफलाईन पध्दतीने जिल्हास्तरावर (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमध्ये) घेण्याचे नियोजित आहे. याकरिता सर्व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी ५ तज्ञ अभ्यासक/तज्ञ मार्गदर्शक यांची नावे परिषदेस दि.५ जून २०२४ पर्यंत Email- LINK या ई-मेल आयडीवर सादर करावी. यामध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतोल वरिष्ठ आंधव्याख्याता/अधिव्याख्याता इत्यादी ३ तसेच याव्यतिरिक्त आपल्या जिल्हयातील इतर २ तज्ञ मार्गदर्शकांचे नावांचा समावेश असावा.
(डॉ. माधुरी सावरकर)
उपसंचालक
(सेवापूर्व शिक्षण)
राज्य शैक्षणिक संशाधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,
पुणे
Good Information
When is senior or selection grade traing year 24-25 going to be held?
निवड श्रेणी नोंदणी