Scholarship Exam Class 4th 7th Notification Schedule Online Application Form Link
Scholarship Exam Class 4th 7th Notification Schedule Online Application Form Link
Scholarship Exam Class 4th and 7th Notification Schedule Online Application Form Link
Scholarship Exam Class 4th 7th Notification Time table Online Apply Link
Iytta Chavthi Satvi Shishyvrutti Pariksha Aavedanpatr Adhisuchana
प्रसिध्दीपत्रक
संदर्भ :- 1. शिष्यवृत्ती परीक्षा इ. 4 थी व इ. 7 वी 2026 अधिसुचना जा.क्र. मरापप/शिष्यवृत्ती/2025-26/6321, दि. 30/12/2025.
- या कार्यालयाचे प्रसिध्दीपत्रक दि. 02/02/2026
उपरोक्त संदर्भानुसार परीक्षा परिषदेमार्फत प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) दिनांक 26 एप्रिल, 2026 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर परीक्षेकरीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. 30 डिसेंबर 2025 ते 13 फेब्रुवारी, 2026 या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती. तथापि शाळांना शाळा नोंदणी व नियमित शुल्कासह विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. 28 फेब्रुवारी, 2026 पर्यंत व्दितीय व अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे.
सदर परीक्षेकरीता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी दि. 28 फेब्रुवारी, 2026 अखेरपर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करावी.
ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे सुधारित वेळापत्रक
तपशील शुल्क प्रकार कालावधी शाळा माहिती प्रपत्र, आवेदनपत्र व शुल्क ऑनलाईन भरणे.
नियमित शुल्कासह
(With Regular Fee)
30 डिसेंबर 2025 ते
28 फेब्रुवारी 2026
दि. 28/02/2026 नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरता येणार नाही, याची सर्वानी गांभीर्याने नोंद घ्यावी.
परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक
अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे – 04.
ठिकाण – पुणे
दि. 13/02/2026

ALSO READ 👇
महत्त्वाचे
जा.क्र. मरापप/शिष्यवृत्ती/2026/430
दिनांक :- 02/02/202.6
विषय :- प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) एप्रिल – 2026 च्या प्रसिध्दीपत्रकास प्रसिध्दी मिळणेबाबत….
महोदय,
उपरोक्त विषयानुसार आपणास सविनय सादर करण्यात येते की, प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) दि. 26 एप्रिल, 2026 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेची अधिसूचना दि. 30/12/2025 रोजी परीक्षा परिषदेच्या
या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
सदर परीक्षेकरीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. 30 डिसेंबर, 2025 ते 02 फेब्रुवारी, 2026 या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती. तथापि शाळांना शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. 13 फेब्रुवारी, 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर प्रसिध्दीपत्रक या पत्रासोबत जोडण्यात येत आहे.
सोबत :- प्रसिध्दीपत्रक पीडीएफ प्रत लिंक
आपली विश्वासू,
(अनुराधा ओक)
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
प्रसिध्दीपत्रक
संदर्भ :- शिष्यवृत्ती परीक्षा इ. 4 थी व इ. 7 वी 2026 अधिसुचना जा.क्र.मरापप/शिष्यवृत्ती/2025-26/6321, दि. 30/12/2025.
उपरोक्त संदर्भानुसार परीक्षा परिषदेमार्फत प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) दिनांक 26 एप्रिल, 2026 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर परीक्षेकरीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. 30 डिसेंबर 2025 ते 02 फेब्रुवारी, 2026 या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती. तथापि शाळांना शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. 13 फेब्रुवारी, 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
सदर परीक्षेकरीता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी दि. 13 फेब्रुवारी, 2026 अखेरपर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करावी.
ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे सुधारित वेळापत्रक
तपशील
शाळा माहिती प्रपत्र, आवेदनपत्र व शुल्क ऑनलाईन भरणे.
शुल्क प्रकार
नियमित शुल्कासह (With Regular Fee)
30 डिसेंबर 2025 ते
13 फेब्रुवारी 2026
विलंब शुल्कासह (With Late Fee)
14 फेब्रुवारी 2026 ते
20 फेब्रुवारी 2026
अतिविलंब शुल्कासह (With Super Late Fee)
21 फेब्रुवारी 2026 ते
24 फेब्रुवारी 2026
अति विशेष विलंब शुल्कासह (With Special Super Late Fee)
कालावधी
25 फेब्रुवारी 2026 ते
28 फेब्रुवारी 2026
दि. 28/02/2026 नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा आवेदनपत्र भरता येणार नाही, याची सर्वानी गांभीर्याने नोंद घ्यावी. ऑफलाईन पध्दतीने
(अनुराधा ओक)
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
ठिकाण – पुणे
दि. 02/02/2026

ALSO READ 👇
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) सन 2026 करीता शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदनपत्र भरणेबाबत
Regarding school registration and student application form filling for Primary Scholarship Examination (4th standard) and Upper Primary Scholarship Examination (7th standard) 2026
जा.क्र. मरापप/शिष्यवृत्ती/2026/276
दिनांक :- 28/01/2026
विषयः – प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) सन 2026 करीता शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदनपत्र भरणेबाबत…
संदर्भ :-
- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. प्राउशि/प्र.क्र.23/2025 (ई-1142170)/एसडी-5, दि. 17/10/2025.
- शिष्यवृत्ती परीक्षा इ. 4 थी व इ. 7 वी सन 2026 ची अधिसूचना दि. 30/12/2025.
- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेली आढावा बैठक दि. 21/01/2026.
उपरोक्त विषयानुसार राज्यातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्याची योजना महाराष्ट्र राज्य शासनाने सन 1954-55 या शैक्षणिक वर्षापासून सुरू केली आहे. विद्यार्थी दशेतच स्पर्धा परीक्षेची पायाभरणी करणारी ही परीक्षा असून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होत असल्याने शालेय स्तरावरच या परीक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थी स्थानिक स्वराज्य संस्थेतील शाळेमध्ये प्रवेश घेतात, शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यास अशा महाराष्ट्र राज्यातील गरीब, होतेकरू, हुशार व प्रज्ञावान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळत असल्याने सदर विद्यार्थ्यांचा आदर्श घेऊन इतर विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागते. या मुख्य
उद्देशाने ही परीक्षा घेण्यात येते.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा इ. 1 ली पासूनच विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नशील राहून तयारी करून घेत असल्याने विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी असणाऱ्या भाषा व गणित या कठीण वाटणाऱ्या विषयांमध्ये तरबेज होऊन त्याची स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने पायाभरणी होते, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील शाळांमधील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना परीक्षेस प्रविष्ठ होऊन आपली गुणवत्ता सिध्द करण्याची संधीही मिळते.
वरील सर्व बाबींचा साकल्याने विचार होऊन सन 2025-26 पासून घेण्यात येणाऱ्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) सन 2026 साठी जास्तीत जास्त विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविणेसाठी जिल्हा स्तरावरून विशेष प्रयत्न होणे अत्यावश्यक आहे.
संदर्भ क्र. 1 च्या शासन निर्णयास अनुसरून संदर्भ क्र. 2 नुसार सदर परीक्षेचे वेळापत्रक / अधिसूचना दि. 30/12/2025 रोजी प्रसिध्द करण्यात आली असून शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदनपत्र भरणेसाठी संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. नियमित शुल्कासह आवेदनपत्र भरणेसाठी दि. 02/02/2026 ही मुदत देण्यात आली आहे.
तथापि परीक्षा परिषदस्तरावरून सदर परीक्षेसाठी विद्यार्थी सहभाग आवेदनपत्र नोंदणीबाबतचा आढावा घेतला असता अनेक जिल्ह्यांमध्ये स्थिती उदासीन असल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले आहे. सरलनुसार जिल्ह्यातील नोंद असलेल्या शाळांपैकी अनेक शाळांनी सदर परीक्षेकरीता नोंदणी केलेली नाही किंवा विद्यार्थी आवेदनपत्रही भरलेले नाही. या अर्थी दि. 17/10/2025 च्या शासन निर्णयास अनुसरून शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदनपत्र भरणेच्या दृष्टीने शाळांचे उद्बोधन झालेले नाही.
शासन निर्णय दि. 17/10/2025 यातील मुद्दा क्र. 6 व 7 कडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे, त्यानुसार सदरची शिष्यवृत्ती परीक्षा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना बंधनकारक करण्यात आली असून सदर परीक्षेच्या आधारे सर्व शासकीय शाळांतील शिक्षकांच्या कार्याचे मुल्यांकन करण्यात येऊन त्याची नोंद शिक्षकांच्या सेवा पुस्तकात / गोपनीय अहवालात करण्यात येणार असल्याचेही नमूद आहे. कृपया शासन धोरणाच्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी यांचा सहभाग वाढविण्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना निर्गमित व्हावेत, जेणेकरून संदर्भ क्र. 1 च्या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करता येईल. याकरीता आपले स्तरावरून सहकार्य व्हावे अशी विनंती आहे.
महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
शिष्यवृत्ती परीक्षा दि. २६ एप्रिल, २०२६
अधिसूचना
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ४ थी)
उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ७ वी)
(PRIMARY SCHOLARSHIP EXAMINATION)
(UPPER PRIMARY SCHOLARSHIP EXAMINATION)
अधिसूचना
परीक्षा प्राधान्य
जा.क्र.मरापप/शिष्यवृत्ती/२०२५-२६/६३२१ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, भांबुर्डा, शिवाजीनगर, पुणे ०४. दिनांक :- ३०/१२/२०२५
विषय :- प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) दि. २६ एप्रिल, २०२६ रोजी आयोजित करणेबाबतची अधिसूचना…
TIME’ TABLE इयत्ता चौथी व इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक
शासनमान्य शाळांमधून सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ४ थी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता ७ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्रविष्ट होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या
व
या संकेतस्थळावर दि. ३०/१२/२०२५ रोजी पासून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
उपरोक्त परीक्षा दि. २६ एप्रिल, २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी घेण्यात येईल. परीक्षेचे वेळापत्रक व परीक्षेची सविस्तर माहिती सोबतच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे. प्रत्येक सूचना वाचूनच कार्यवाही करण्याची दक्षता सर्वांनी घ्यावी.
सोबत :- अधिसूचना वाचा या ओळीला स्पर्श करून
(अनुराचा ओक) आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे – ०४
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे झिरो बॅलन्स बचत खाते उघडण्याबाबत……वाचा या ओळीला स्पर्श करून
Notification regarding holding of Primary Scholarship Examination 4th and Upper Primary Scholarship Examination 7th on 26th April, 2026

