SC BARTI JEE NEET Entrance Exam Pre Training Apply Link
SC BARTI JEE NEET Entrance Exam Pre Training Apply Link
SC BARTI JEE NEET Entrance Exam Pre-Training Application
जा.क्र./बाटी/योजना/जेईई-नीट/२०२५/४१५२
दिनांक:-२४/०६/२०२५
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या (मातंग व इतर तत्सम मांग, मातंग मिनिमादिग, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारुडी, राधेमांग, मांग गारोडी, मांग गारुडी, मादगी व मादिगा या जाती वगळून) पात्र उमेदवारांसाठी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती व नागपूर या ठिकाणी जेईई (JEE) आणि नीट (NEET) प्रवेश परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज मागविणेबाबत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या पात्र उमेदवारांसाठी जेईई (JIE) आणि नीट (NEET) या प्रवेश परीक्षांचे निःशुल्क अनिवासी ऑफलाईन प्रशिक्षण खाजगी व नामांकित व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांमार्फत राबविण्यात येते. महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील (मातंग व इतर तत्सम मांग, मातंग मिनिमादिग, दखनी मांग, मांग-म्हशी, मदारी, गारुडी, राधेमांग, मांग गारोडी, मांग गारुडी, मादगी व मादिगा या जाती वगळून) जे उमेदवार सन-२०२५ ची इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत अशा उमेदवारांसाठी सन २०२५- मे २०२७ या कालावधीसाठो जेईई (JEE) आणि नीट (NEET) या प्रवेश परीक्षांचे मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती व नागपूर या ठिकाणी ऑफलाईन प्रशिक्षण राबविण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर प्रशिक्षणासाठी इयत्ता १० वीच्या गुणांच्या आधारे व रु.८ लाखापर्यंत उत्पन्न मर्यादा असलेल्या पात्र उमेदवारांची गुणानुक्रमे निवड केली जाईल.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी दि. ०१/०७/२०२५ पासून ३०/०७/२०२५ पर्यंत
या लिंकवरुन ऑनलाईन नोंदणी करावी.
मातंग व इतर तत्सम (मांग, मातंग मिनिमादिग, दखनी मांग, मांग-म्हशी, मदारी, गारुडी, राधेमांग, मांग गारोडी, मांग गारुडो, मादगी व मादिगा) या जातीतील विद्यार्थ्यांनी सदर योजनेबाबत अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) संस्थेच्या https://arti.org.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.
महासंचालक,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे
मुख्यालय : २८ क्वोन्स गार्डन, कॅम्प, पूणे ४११००१
दुरध्वनी क्र. ०२० २६३४३६००/२६३३३३३०/२६३३३३३९
Website: www.bartLin
E-mail: dgtbartLin