सार्वत्रिक बदल्या २०२६ च्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत परिपत्रक Sarvatrik Badlya Karyvahi

Sarvatrik Badlya Karyvahi

Sarvatrik Badlya Karyvahi

Sarvatrik Badlya Karyvahi GR

Regarding action taken in accordance with Universal Transfer 2026 Circular

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Join Now

RNI No. MAHBIL/2009/35530
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार
वर्ष १२, अंक १५]
बुधवार, मे २७, २०२६/ज्येष्ठ ६, शके १९४८
असाधारण क्रमांक २८
[पृष्ठे ३, किंमत : रुपये २३.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.
अनुक्रमणिका
सन २०२६ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ५. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश
सामान्य प्रशासन विभाग
मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक २७ मे २०२६.

MAHARASHTRA ORDINANCE No. V OF 2026.
AN ORDINANCE
FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA GOVERNMENT SERV-ANTS REGULATION OF TRANSFERS AND PREVENTION OF DELAY IN DISCHARGE OF OFFICIAL DUTIES ACT, 2005.

सन २०२६ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ५.

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश.
ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही;
२००६ चा महा.

आणि ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे २१. विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ यात आणखी सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे;

भाग चार-२८-१ (१)

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, मे २७, २०२६/ ज्येष्ठ ६, शके १९४८
त्याअर्थी, आता, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ च्या खंड (१) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे, पुढील अध्यादेश प्रख्यापित करीत आहेत :-
संक्षिप्त नाव व
१. (१) या अध्यादेशास, महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय प्रारंभ. कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध (सुधारणा) अध्यादेश, २०२६, असे म्हणावे.
(२) तो, तात्काळ अंमलात येईल. सन २००६ चा

२. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना महाराष्ट्र होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ याच्या कलम ४ मध्ये, –
२००६ चा अधिनियम क्रमांक २१ याच्या कलम
(क) पोट-कलम (४) मधील, – महा. २१.

४ ची सुधारणा.
(एक) विद्यमान परंतुकापूर्वी, पुढील परंतुक समाविष्ट करण्यात येईलः-
“परंतु, जनगणना, २०२७ शी संबंधित काम सुरू असल्यामुळे, सन २०२६ मध्ये करण्यात येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या दिनांक ३० जून २०२६ रोजी
किंवा त्यापूर्वी करण्यात येतीलः”;
(दोन) विद्यमान परंतुकातील, “परंतु” या मजकुराऐवजी, “परंतु आणखी असे की” हा मजकूर दाखल करण्यात येईल;
(ख) पोट-कलम (४क) वगळण्यात येईल.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, मे २७, २०२६/ज्येष्ठ ६, शके १९४८

निवेदन

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ (२००६ चा महा. २१), हा शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन करण्यासाठी आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध करण्यासाठी तरतूद करण्याकरिता अधिनियमित करण्यात आला आहे. उक्त अधिनियमाच्या कलम ४ अन्वये, शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या, सामान्यपणे, वर्षातून एकदाच एप्रिल किंवा मे महिन्यात करण्यात येतील अशी तरतूद आहे.

२. संपूर्ण भारतात जनगणना २०२७ करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यात जनगणना २०२७ चा पहिला टप्पा म्हणजेच, घरांची यादी व गृह गणना दिनांक १६ मे २०२६ पासून १४ जून २०२६ पर्यंत करण्यात येत आहे. भारत सरकारने सर्व राज्यांना व संघ राज्यक्षेत्रांना, जनगणना २०२७ साठी नियुक्त केलेल्या जनगणना कार्याधिकाऱ्यांच्या बदल्या न करण्याची विनंती केली आहे. म्हणून, जनगणना २०२७चा पहिला टप्पा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी, सन २०२६ या वर्षामध्ये करावयाच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या, दिनांक ३० जून, २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी केल्या जातील, अशी तरतूद करण्याकरिता उक्त अधिनियमाच्या कलम ४ मध्ये सुयोग्य सुधारणा करणे इष्ट आहे, असे वाटते.

३. राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चाल चालू नाही आणि उपरोक्त प्रयोजनांसाठी, महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ यात आणखी सुधारणा करण्याकरिता, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे, म्हणून, हा, अध्यादेश प्रख्यापित करण्यात येत आहे.

जिष्णु देव वर्मा,
मुंबई,
दिनांक २७ मे २०२६.
महाराष्ट्राचे राज्यपाल.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
व्ही. राधा,
शासनाच्या अपर मुख्य सचिव.

सार्वत्रिक बदल्या २०२६ च्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत परिपत्रक Sarvatrik Badlya Karyvahi
सार्वत्रिक बदल्या २०२६ च्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत परिपत्रक Sarvatrik Badlya Karyvahi

क्रमांक : संकीर्ण २०२५/प्र.क्र. १७५/प्रशा-१

सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दि. ०६ फेब्रुवारी, २०२६

विषयः सार्वत्रिक बदल्या २०२६ च्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत

प्रिय,

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ अधिसूचित करण्यात आलेला आहे. या नियमातील नियम ३ व ४ नुसार, सर्व विभागातील ६ वर्षे पूर्ण झालेल्या सह सचिव, उप सचिव, अवर सचिव, कक्ष अधिकारी, सहायक कक्ष अधिकारी, लिपिक-टंकलेखक व लघुलेखक संवर्गातील अधिकारी / कर्मचारी यांच्या बदल्या करण्याबाबतची कार्यवाही एप्रिल-मे २०२६ मध्ये करण्यात येणार आहे.

२. मागील अनेक वर्षापासून असे निदर्शनास आले आहे की, अधिकारी कर्मचाऱ्यांची बदली केल्यानंतर त्यांच्या बदलीस मुदतवाढ देण्याची मागणी/बदली रद्द करण्याची मागणी संबंधित प्रशासकीय विभाग करतात. त्यामुळे बदली झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना बदली झालेल्या विभागाने रुजू होण्यासाठी कार्यमुक्त न केल्याने प्रशासकीय अडचणी निर्माण होतात.

३. बदली अधिनियमानुसार बदल्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यामुळे सन २०२६ च्या सार्वत्रिक बदल्यांमध्ये आपल्या विभागातील जे अधिकारी / कर्मचारी बदलीस पात्र आहेत, त्यांची यादी करून त्यांच्या जागी पर्यायी अधिकारी/कर्मचारी यांची व्यवस्था करण्याची कार्यवाही आतापासूनच सुरू करण्यात यावी, जेणेकरून बदली झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केल्यानंतर आपल्या विभागातील कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यास अडचण निर्माण होणार नाही.

    परिपत्रक पीडीएफ लिंक

सस्नेह,

आपली स्नेहांकित

(व्ही. राधा)

सर्व अ.मु.स./प्र.स/सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

सार्वत्रिक बदल्या २०२६ च्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत परिपत्रक Sarvatrik Badlya Karyvahi
सार्वत्रिक बदल्या २०२६ च्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत परिपत्रक Sarvatrik Badlya Karyvahi

Leave a Comment

error: Content is protected !!