Required Certificates for Admission to Technical Vocational Courses

Required Certificates for Admission to Technical Vocational Courses

image 2
Required Certificates for Admission to Technical Vocational Courses

Required Certificates for Admission to Technical Vocational Courses

तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य ३. महापालिका मार्ग, पत्र पेटी क्र.१९६७, मुंबई ४०० ००१.

दूरध्वनी क्र. ०२२-६८५९७४१०/४३०/४६५/४९२ ई-मेल-desk10@dtemaharashtra.gov.in देवसाईट: https://dre maharashtra.gov.in

संकेतस्थळावर – प्रवेशासंबंधी महत्वाची सूचना

क्रमांक: १०/एडीएम/प्रमाणपत्रे/२०२४/१८०

दिनांक 26 APR 2024

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी लागणारी आवश्यक प्रमाणपत्रे

Required Certificates for Admission to Technical Vocational Courses

तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पोस्ट एस.एस.सी. अभियांत्रिकी/ तंत्रशास्त्र, प्रथम वर्ष वास्तुकला, प्रथम वर्ष पोस्ट एच.एस.सी. औषधनिर्माणशाख, एचएमसीटी, सरफेस कोटींग टेक्नॉलॉजी पदविका अभ्यासक्रम (Diploma) तसेच प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी/ तंत्रशास्र, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरींग टेक्नॉलॉजी पदवी, प्रथम वर्ष फार्म.डी., वास्तुशास्र, बी. प्लॅनिंग, बी. डिझाइन, बीबीए / बीएमएस बीबीएम, बीसीए हे पदवी अभ्यासक्रम (Under Graduate) आणि प्रथम वर्ष एम.ई./एम.टेक., एम.फार्म., फार्म. डी. (PostBaccalaureate), एम. आर्किटेक्चर, एम. प्लॅनिंग, एम. एचएमसीटी, एमबीए/एमएमएस, एमसीए हे पदव्युत्तर पदवी (Post Graduate) त्याचप्रमाणे प्रथम वर्ष एम.ई./एम.टेक., एम. प्लॅनिंग एम. एचएमसीटी, एमबीए /एमएमएस, एमसीए हे एकात्मिक पदवी अभ्यासक्रम (Integrated) व ज्या अभ्यासक्रमांत थेट व्दितीय वर्षांत प्रवेश दिला जातो, त्या अभ्यासक्रमांसाठीच्या कार्यरत व्यावसायिकांची (Working Professionals) स्वतंत्र तुकडी अशा अभ्यासक्रमांचे प्रवेश केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमधून करण्यात येतात. त्यासाठी अर्ज करतांना संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेश नियमावलीत नमूद केलेल्या आवश्यक त्या प्रकरणी लागू असणारी खालील प्रमाणपत्रे सक्षम प्राधिकाऱ्यांकडून प्राप्त करुन घेऊन ती तयार ठेवण्याबाबत प्रवेशोच्छुक उमेदवारांना याद्वारे सूचित करण्यात येत आहे.

१) जात / जमात प्रमाणपत्र (Canter / Tribe Certificate) (महाराष्ट्रातील सक्षम प्राधिकारी यांनी विहीत प्रपत्रात निर्गमित केलेले)

२) जात / जमात वैधता प्रमाणपत्र (Caste / Tribe Validity Certificate) (महाराष्ट्रातील सक्षम प्राधिकारी यांनी विहीत प्रपत्रात निर्गमित केलेले). टिप :

अ) इ.१० वी व १२ वी नंतरच्या पदविका प्रवेशासाठी जात/जमात वैधता प्रमाणपत्र आवश्यक नाही. (मात्र प्रथम वर्ष पदविका किंवा द्वितीय वर्षातील पदविका अभ्यासक्रमाच्या राखीव जागेवर प्रवेश मिळालेल्या मागासवर्गीय उमेदवाराने प्रवेश मिळाल्यापासून १ महिन्याच्या आत जात/जमात प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी संबंधित जात / जमात पडताळणी समितीकडे योग्य भरलेला अर्ज सादर करावा लागेल.)

ब) पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या मागासवर्गीयांसाठीच्या राखीव जागेवर प्रवेशासाठी मागासवर्गीय उमेदवाराने जात/जमात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

३) अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती व्यतिरिक्त उर्वरीत सर्व मागासवर्गीय उमेदवारांसाठी दिनांक ३१ मार्च २०२५ पर्यंत वैध असलेले नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र (Non- Creamy Layer Certificate), राज्याबाहेरील मागासवर्गीय उमेदवारांचा अधिवास महाराष्ट्र राज्यात असला तरी महाराष्ट्र राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या आरक्षणाचे धोरण त्यांना लागू नाही.

४) राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (Nationality Certificate) व अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)- प्रवेश नियमावलीत नमूद केलेल्या प्रकरणी आवश्यकतेनुसार.

५) उत्पनाचे प्रमाणपत्र (Incoron Certificate) – TFWS योजनेअंतर्गत पवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सहाग प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले.

६) आर्थिकदृष्ट्या दुर्वल घटक प्रवर्गासाठी (EWS प्रमाणपत्र: महाराष्ट्र राज्याच्या शासन निर्णयास अनुसरून विहीत केलेल्या प्रपत्रात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता वैध असलेले, सक्षम प्राधिकान्यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र.

७) दिव्यांगावाबतचे प्रमाणपत्र (Person with Disability) आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिकारी यांनी विहीत प्रपत्रात निर्गमित केलेले.

८) सैन्य दलातील (Defence) संवर्गातून प्रदेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या प्रवेशासाठी माहिती पुस्तिकेत दिलेले सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र,

२) आधार क्रमांक व संलग्नित बैंक खाते शिष्यवृत्ती, शुल्क प्रतिपूर्ती इ. योजनांची रक्कम थेट लाभार्थीच्या खात्यात जमा होण्यासाठी आवश्यक.

१०) वर्किंग प्रोफेशनल्सकरीता अनुभव प्रमाणपत्र व ना-हरकत प्रमाणपत्र –
५) उत्त्पन्नाचे प्रमाणपत्र (Incorne Certificate) TFWS योजनेअंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले.

६) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गासाठी (EWS) प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्याच्या शासन निर्णयास अनुसरून विहीत केलेल्या प्रपत्रात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता वैध असलेले, सक्षम प्राधिकाऱ्याऱ्यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र.

७) दिव्यांगावावतचे प्रमाणपत्र (Person with Disability) आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिकारी यांनी विहीत प्रपत्रात निर्गमित केलेले.

८) सैन्य दलातील (Defence) संवर्गातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या प्रवेशासाठी माहिती पुस्तिकेत दिलेले सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र.

९) आधार क्रमांक व संलग्नित बैंक खाते शिष्यवृत्ती, शुल्क प्रतिपूर्ती इ. योजनांची रक्कम थेट लाभार्थीच्या खात्यात जमा होण्यासाठी आवश्यक.

१०) वर्किंग प्रोफेशनल्सकरीता अनुभव प्रमाणपत्र व ना-हरकत प्रमाणपत्र –

क) Working Professionals योजनेअंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी नोंदणीकृत उद्योग / आस्थापना (केंद्र / राज्य) / खाजगी / सार्वजनिक मर्यादित कंपनी / एमएसएमई अशा ठिकाणी नियमितपणे १ वर्ष काम करीत असल्याबाबतचे अनुभव प्रमाणपत्र.

ख) सदरील अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी संबंधित आस्थापनेचे ना-हरकत प्रमाणपत्र.

इशारा : शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये काही उमेदवारांनी प्रवेश प्रक्रियेदरम्यान काही प्रमाणपत्रे जसे जात / जमात

प्रमाणपत्रे / जात वैधता प्रमाणपत्रे / अपंगत्वाचे प्रमाणपत्र / नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्रे ही, सक्षम प्राधिकाऱ्यांकडून प्राप्त करून न घेता बनावट प्रकारची प्रमाणपत्रे सादर केल्याचे पडताळणीअंती आढळून आले होते, अशा उमेदवारांचा प्रवेश रद्द करून त्यांचेविरूध्द फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. प्रवेशोच्छुक उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी सक्षम प्राधिकाऱ्यांकडूनच प्रमाणपत्रे प्राप्त करून घ्यावीत. बनावट अथवा खोटी प्रमाणपत्रे प्रवेशासाठी सादर केल्याचे आढळल्यास अशा उमेदवारांचे प्रवेश रद्द करून त्यांचे विरुध्द फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

वेगवेगळ्या वर्गवारी अंतर्गत प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या प्रमाणपत्रांची तपशीलवार माहिती प्रवेश पुस्तिकेत अंतर्भुत असते. त्याचा तपशील संचालनालयाच्या

👇

वेबसाईटला जोडले जाण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

व 👇

वेबसाईटला जोडले जाण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्या या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

(डॉ. विनोद मोहितकर)

संचालक,

तंत्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई

प्रत : माहितीसाठी सादर -

१. मा. प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई ४०० ०३२.

२. मा. आयुक्त, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

३. मा. सचिव, प्रवेश नियामक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

प्रत : माहिती व आवश्यक त्या पुढील कार्यवाहीसाठी -

१. सर्व सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर- त्यांना कळविण्यात येते की, वरील सूचना आपल्या संकेतस्थळावर प्रदर्शित करावी. तसेच आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या संस्थांना याबाबत कळविण्यात यावे.

२. कार्यासन क्रमांक ३, मुख्य कार्यालय, मुंबई यांना माहितीसाठी व संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यासाठी.

Leave a Comment

error: Content is protected !!