Implementation of ePPO eGPO eCPO System Pension Approval Order will be Available Online GR
महालेखापाल (ले. व अ.) २, महाराष्ट्र, नागपूर यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या सर्व १९ जिल्हा कोषागार कार्यालयांसाठी e-PPO, e-GPO, e-CPO प्रणाली कार्यान्वित करणेबाबत…..
Implementation of ePPO eGPO eCPO system
From 1st June, 2024 the pension approval order will be available online
Implementation of ePPO eGPO eCPO System Pension Approval Order will be Available Online GR
महाराष्ट्र शासन वित्त विभाग
शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण २०२४/प्र.क्र.३४/२०२४/कोषा-प्रशा५
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
दिनांक: २२ मे,२०२४
वाचा : १
. वित्त विभाग शासन निर्णय क्र. सेनिवे २०१४/प्र.क्र.३६/सेवा-४, दि.२ जुलै, २०१५
२. वित्त विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण २०१५/प्र.क्र. ८३/कोषा. प्रशा ५, दि.३० डिसेंबर, २०१५
३. वित्त विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२२/प्र.क्र. ८२/कोषा. प्रशा ५, दि.२४.०८.२०२३
४. वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र. रानिप्र०२३/प्र.क्र.५७/सेवा ४, दि. २४.०८.२०२३
प्रस्तावना:-
- महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ व वित्त विभागाकडील संदर्भाधीन शासन निर्णयांन्वये सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी आणि अनुदानित संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची निवृत्तीवेतन प्रकरणे संबंधित कार्यालय प्रमुख यांचेमार्फत “निवृत्तीवेतन वाहिनी” या प्रणालीवर Online पध्दतीने व हस्तलिखित नमुने (Forms) भरून घेऊन सेवापुस्तकासह महालेखापाल (ले. व अ.) कार्यालय, नागपूर यांच्याकडे मंजुरीस्तव सादर करण्यात येतात. अशा निवृत्तीवेतन प्रकरणांच्या तपासण्या झाल्यानंतर महालेखापाल कार्यालयाकडून निवृत्तीवेतन प्रकरण मंजूर होऊन निवृत्तीवेतन प्रदान आदेश (PPO), उपदान प्रदान आदेश (GPO) आणि अंशराशीकरण प्रदान आदेश (CPO) तयार करुन त्यांच्या प्रती संबंधित कार्यालय प्रमुख, संबंधित निवृत्तीवेतनधारक यांना पोष्टाने व संबंधित जिल्हा कोषागार कार्यालयास पोष्टाने किंवा हस्त बटवड्याने पाठविण्यात येतात.
॥. राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्याबाबतीत निवृत्तीवेतन प्रदान आदेश (PPO) आणि
अंशराशीकरण प्रदान आदेश (CPO) जिल्हा कोषागार कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर सहाय्यक अधिदान व लेखा अधिकारी / अपर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन शाखा) यांचेकडून पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाऊन उपदान वगळता अन्य देयके निवृत्तीवेतनवाहिनी आज्ञावलीमध्ये तयार करून संबंधित निवृत्तीवेतन धारकास निवृत्तीवेतनाचे व निवृत्तीवेतनाच्या अंशराशीकृत मूल्याचे प्रदान करण्यात येते. तर उपदानाचे प्रदान मात्र संबंधित व्यक्ती ज्या कार्यालयातून सेवानिवृत्त झाली, त्या कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यामार्फत केले जाते.
III. शालेय शिक्षण विभागांतर्गत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बाबतीत निवृत्तीवेतन प्रदान आदेश (PPO), अंशराशीकरण प्रदान आदेश (CPO) व उपदान प्रदान आदेश (GPO) अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई किंवा संबंधित जिल्हा कोषागार कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर, सहाय्यक अधिदान व लेखा अधिकारी / अपर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन शाखा) यांचेकडून पुढील प्रक्रिया
शासन निर्णय पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी व अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
पेन्शन व पी.एफ.ऑनलाइनच मिळणार ही कर्मचाऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे.