दिनांक २६ जानेवारी, २०२६ या देशाच्या प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन कार्यक्रम घेण्याबाबत परिपत्रक Republic Day Programs Activities

Republic Day Programs Activities

Republic Day Programs Activities

Republic Day 26 January 20260Programs Activities in School for students

Regarding conducting a mass drill march program on patriotic songs for students on the Republic Day of the country, dated January 26, 2026.

क्र.शिसं/संकीर्ण/ए-२/विद्याशाखा/ ०५५०७

दि.०४/१२/२०२५

विषय :- दिनांक २६ जानेवारी, २०२६ या देशाच्या प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन कार्यक्रम घेण्याबाबत.

संदर्भ :- १. शासनाचे परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२४/प्र.क्र.३६४/एसडी-४, दिनांक ३१ डिसेंबर २०२४.

२. शासनाचे परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२४/प्र.क्र.३६४/एसडी-४, दिनांक १९ जुलै, २०२५.

३. शिक्षण आयुक्तालयाचे पत्र जा.क्र. आस्था-क/प्राथ१०६/स्वदि-प्रदि/२०२५/१३३९७५० दिनांक २३/०७/२०२५

४. संचालनालयाचे पत्र जा.क्र. शिसंमा/स्वादि-प्रदि/ए-२/विद्याशाखा/२०२४-२५/३९०४ दिनांक २५/०७/२०२५.

५. शासनाचे पत्र क्रमांक संकीर्ण-२०२४/प्र.क्र.३६४/एसडी-४, दिनांक २६ नोव्हेंबर, २०२५.

राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये २६ जानेवारी, २०२५ पासून प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांसह साजरा करणेबाबत संदर्भाधीन क्रमांक १ येथील परिपत्रकान्वये सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

प्रजासत्ताक दिन प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त करा भाषण निबंध सर्व स्पर्धा परीक्षा करिता उपयुक्त या ओळीला स्पर्श करून

२) देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी दिनांक १५ ऑगस्ट, २०२५ रोजी कवायत संचलन कार्यक्रम घेण्याचे आयोजन करण्याबाबत संदर्भ क्रमाकं २ येथील पत्रान्वये कळविण्यात आले होते व याकरिता कवायतीच्या मार्गदर्शक व्हिडीओची लिंक उपलब्ध करून देण्यात आली होतो.

३) दिनांक २६ जानेवारी २०२६ या प्रजासत्ताकदिनी संदर्भ क्रमांक १ येथील शासन परिपत्रकान्वये सूचित करण्यात आलेले उपक्रम शाळांमध्ये घेण्यात यावे. त्याचप्रमाणे संदर्भ क्रमांक २ येथील पत्रानुसार दिनांक १५ ऑगस्ट, २०२५ रोजी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आल्याप्रमाणे देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलनाचा कार्यक्रमदेखील प्रजासत्ताकदिनी घेण्यात यावा.

४) राज्याचा शासकीय झेंडा वंदन व केंद्र शासनाचा शासकीय झेंडा वंदन कार्यक्रमानंतर शाळांमध्ये सामूहिक कवायत संचलन कार्यक्रमाचे आयोजन व्हावे. कवायत संचलनाचा कार्यक्रम साधारणतः वीस मिनिटे इतक्या कालावधीचा असावा.

५) देशभक्तीपर गीतांवरील कवायतीचा मार्गदर्शक व्हिडीओ तयार करण्यात आला असून, त्याची लिंक

https://drive.google.com/file/d/१tm०७J३x६३९XT-१८uyWuKILT५१WrMTRZY/view

याप्रमाणे आहे.

दिनांक २६ जानेवारी २०२६ प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन कार्यक्रम महत्वाच्या सूचना-

१. आपणांस उपरोक्त मुद्दा क्रमांक ५ नुसार पुरविलेल्या नमुना मार्गदर्शक व्हिडीओ (१४.४० मिनिटांचा) नुसार कवायत संचलन आयोजित करावे.

शाळेमध्ये झेंडावंदन कोणी करावे परिपत्रक वाचा या ओळीला स्पर्श करून

२. प्रस्तुत कार्यक्रमाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त, आरोग्य जागृती, शारीरिक दृष्ट्या कसरत/व्यायाम करण्यासाठी प्रेरित करणे हा आहे.

३. प्रस्तुत कार्यक्रम राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये आयोजित करण्यात यावा.

४. सामुहिक कवायत संचलन असल्यामुळे गावातील, शहरातील मैदानाच्या क्षमतेनुसार विद्यार्थी एका मैदानावर एकत्र करून कार्यक्रम आयोजित करावा.

५. कार्यक्रमास आपल्या परिसरातील मा. लोकप्रतिनिधी, अधिकारी, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी, पालक व समाजसेवी गणमान्य प्रतिनीधींना आमंत्रित करण्यात यावे.

६. प्रत्येक शनिवारी विद्यार्थ्यांचा सामुहिक स्वरुपात कवायत संचलन सराव करून घेण्यात यावा.

७. कार्यक्रम आयोजनानंतर शाळांनी आपल्या कार्यक्रमाचा व्हिडिओ शासनाच्या पोर्टलवरील दिलेल्या लिंकवर अपलोड करावयाचा आहे.

८. कार्यक्रमाचे दिवशी मैदान स्वच्छ, पांढऱ्या रंगाने पट्टे आखून, हिरवी चटई टाकलेले, देशभक्तीमय वातावरण असलेले असावेः जेणेकरून विद्यार्थ्यांचा गणवेश खराब होणार नाही.

९. विद्यार्थ्यांना कार्यक्रमापूर्वी व कार्यक्रमानंतर अल्पोपहार (चहा,B बिस्कीट, फळे, पाणी) देण्यात यावीत.

१०. विद्यार्थ्यांची नखे काढलेली, कटिंग, गणवेश स्वच्छता, स्वच्छ बूट व पायमोजे, हाताला वेणीला तिरंगा रंगाची पट्टी, रिबीन असल्यास योग्य असेल.

११. कार्यक्रमाचे वेळी सर्वb मैदानात ध्वनी यंत्रणा, स्पीकर, माईक, स्टेज, बॅनर, ड्रोण, व्हिडिओ व फोटो कॅमेरा याची व्यवस्था करण्यात यावी. एक दिवस अगोदर सर्व सुविधा व्यवस्थित चालत आहेत का ? याची पडताळणी करून घ्यावी.

१२. विद्यार्थी सरावासाठी प्रत्येक १० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक मार्गदर्शनासाठी नेमण्यात यावा.

१३. विद्यार्थ्यांचा दर शुक्रवार व शनिवारी सराव करण्यासाठी आपल्या शाळेतील कवायत निर्देशक (PT शिक्षक, क्रीडा शिक्षक, NCC चे विद्यार्थी किंवा इतर शिक्षकाची) मदत घेण्यात यावी.

१४. सरावानुसार कार्यक्रमाच्या दिवशी मार्गदर्शक व्यक्ती स्टेजवर कवायत नमुना दाखवेल व विद्यार्थी त्याचे मागून कवायत साजरी करतील. १५. कवायत कार्यक्रम आटोपल्यानंतर संबंधित शाळेतील शिक्षकांनी आपले विद्यार्थी सुरक्षित घरी पोहोचल्याची खात्री करावी. विद्यार्थी सुरक्षित घरी पोहोचण्याबाबत जबाबदारी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व वर्गशिक्षक यांची राहील.

१६. गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षण उपनिरीक्षक, विस्तार अधिकारी (शिक्षण) व केंद्र प्रमुख यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांचे योग्य नियोजन करावे. कोणत्या गावातील/शहरातील शाळेतील किती विद्यार्थी, कोणत्या शाळेतील मैदानावर येणार आहेत ? मैदान क्षमता, विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था, पार्किंग सुविधा आदि. बाबीची पडताळणी करावी. कोणाचीही गैरसोय होणार नाही, याची खात्री करण्यात यावी.

१७. आजारी, अशक्त किंवा ज्या विद्यार्थ्यांना कवायत करणे शक्य नसेल अशा विद्यार्थ्यांना शक्यतो कवायतीतून सूट देण्यात यावी, त्यांना कुठलोही सक्ती करू नये.

१८. पावसाळयाचे वातावरण वाटल्यास कवायत संचालनासाठी आंतर सभागृह (Indoor Hall) पर्यायी व्यवस्था म्हणून तयार ठेवावे, तसेच कवायत संचालनावेळी ऐनवेळी वीज पुरवठा खंडित झाल्यास कार्यक्रम सुरळीत पार पडण्यासाठी जनरेटर वा इतर सुविधा पर्यायी व्यवस्था म्हणून उपलब्ध ठेवावी.

१९. प्रस्तुत कार्यक्रम “राष्ट्र प्रथम” संकल्पनेवर आधारित असल्याने राज्यातील १ लाखाचे वर शाळांमध्ये, ७ लाखांपेक्षा जास्त शिक्षकांच्या उपस्थितीत व सुमारे २ कोटीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांव्दारा आयोजित केला जाणार असल्याने यास जागतिक विक्रम (World Record) स्वरुपात प्रसिध्दी देण्यात यावी.

उपरोक्त सूचनांप्रमाणे आपल्या अधिनस्त शाळांकडून प्रत्येक वर्षाचा प्रजासत्ताक दिन साजरा होईल यासंदर्भात संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), शिक्षण निरीक्षक यांनी दक्षता घ्यावी. उपरोक्त संदर्भीय पत्रांच्या प्रती सोबत जोडल्या आहेत.

त्यानुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय अभियान निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिन राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये उत्साहात साजरा करण्यासाठी आपल्या स्तरावरुन पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करावा.

परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक

शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य, पुणे

शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य, पुणे
महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे

प्रत: माहितीस्तव सविनय सादर.

१. मा.आयुक्त (शिक्षण) शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

२. अनिरुध्द कुलकर्णी, अवर सचिव, (एसडी-४) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.

Republic Day Programs Activities
दिनांक २६ जानेवारी, २०२६ या देशाच्या प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन कार्यक्रम घेण्याबाबत
Republic Day Programs Activities दिनांक २६ जानेवारी, २०२६ या देशाच्या प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन कार्यक्रम घेण्याबाबत

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,
मंत्रालय (विस्तार), मंत्रालय, मुंबई

क्रमांक :- संकीर्ण २०२४/प्र.क्र.३६४/एस.डी. ४

दिनांक : २६ नोव्हेंबर, २०२५

विषय :- दिनांक २६ जानेवारी, २०२६ या देशाच्या प्रजासत्ताकदिनी विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन कार्यक्रम घेण्याबाबत..

संदर्भ :-

१) शासनाचे समक्रमांकाचे परिपत्रक, दिनांक ३१ डिसेंबर, २०२४

२) शासनाचे समक्रमांकाचे पत्र, दिनांक १९ जुलै, २०२५

महोदय,

राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये २६ जानेवारी, २०२५ पासून प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांसह साजरा करणेबाबत संदर्भाधीन क्र. १ येथील परिपत्रकान्वये सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

२. देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी कवायत संचलन कार्यक्रम घेण्याचे आयोजन करण्याबाबत संदर्भ क्र. २ येथील पत्रान्वये कळविण्यात आले होते व याकरिता कवायतीच्या मार्गदर्शक व्हिडीओची लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती.

३. दिनांक २६ जानेवारी, २०२६ या प्रजासत्ताकदिनी संदर्भ क्र. १ येथील शासन परिपत्रकान्वये सूचित करण्यात आलेले उपक्रम शाळांमध्ये घेण्यात यावे. त्याचप्रमाणे संदर्भ क्र. २ येथील पत्रानुसार दिनांक १५ऑगस्ट, २०२५ रोजी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आल्याप्रमाणे देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलनाचा कार्यक्रमदेखील प्रजासत्ताकदिनी घेण्यात यावा.

४. राज्याचा शासकीय झेंडा वंदन व केंद्र शासनाचा शासकीय झेंडा वंदन कार्यक्रमानंतर शाळांमध्ये सामूहिक कवायत संचलन कार्यक्रमाचे आयोजन व्हावे. कवायत संचलनाचा कार्यक्रम साधारणतः वीस मिनिटे इतक्या कालावधीचा असावा.

५. देशभक्तीपर गीतांवरील कवायतीचा मार्गदर्शक व्हिडीओ तयार करण्यात आला असून, त्याची लिक या पत्रासोबत उपलब्ध करुन दण्यात येत आहे.

६. दिनांक २६ जानेवारी, २०२६ रोजीच्या प्रजासत्ताकदिनी करावयाच्या सामूहिक कवायत संचलनाच्या वर नमूद केल्याप्रमाणे व अतिरिक्त सूचना आपल्या स्तरावरून सर्व संबंधितांना देण्यात याव्यात, ही विनंती.

७. प्रजासत्ताकदिनाच्या सामूहिक कवायत संचलन कार्यक्रमाबाबतचा व्यावसायिक माहितीपट (Professional Documentary) तसेच डिजिटल अहवाल शासनास तात्काळ सादर करण्यात यावा, ही विनंती.

सोबत : वरीलप्रमाणे.

आपला,

परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

Republic Day Programs Activities
दिनांक २६ जानेवारी, २०२६ या देशाच्या प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन कार्यक्रम घेण्याबाबत
Republic Day Programs Activities दिनांक २६ जानेवारी, २०२६ या देशाच्या प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन कार्यक्रम घेण्याबाबत

प्रत :-

१) मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.

२) शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

३) शिक्षण संचालक (माध्य. व उच्च माध्य.), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

४) निवडनस्ती (एस. डी. ४)

Leave a Comment

error: Content is protected !!