Independence Day Programs Activities
Independence Day Programs Activities
Independence Day Programs Activities 2025
Organizing Programs For School Students On Occasion of Independence Day and implementing various activities in schools on Republic Day
Regarding conducting a drill march program for school students on the occasion of Independence Day on August 15, 2025 and implementing various activities in schools on Republic Day.
जा. क्र.आस्था-क/प्राथ १०६/स्वदि- प्रदि/२०२५/1339750
दि. 23.07.2025
विषय: दिनांक १५ ऑगस्ट, २०२५ रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी कवायत संचलन कार्यक्रम घेणे व प्रजासत्ताक दिनी शाळांमध्ये विविध उपक्रम राबविणेबाबत
संदर्भ :- १. शासन परिपत्रक क्र. संकिर्ण-२०२४/प्र.क्र.३६४/एस.डी-४, दि.३१.१२.२०२४ २. शासन पत्र क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र.३६४/एस.डी.४, दि.१९.०७.२०२५ (प्रत संलग्न)
शासन परिपत्रक दि.३१ डिसेंबर, २०२४ अन्वये राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये प्रजासत्ताक दिन विविध (प्रभात फेरी, भाषण / निबंध / कविता स्पर्धा, खेळ, प्रदर्शनी) उपक्रमांसह साजरा करण्याचे निर्देश आहेत.
संदर्भाधीन शासन पत्र दि.१९ जुलै, २०२५ अन्वये आपल्या देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने दि.१५ ऑगस्ट, २०२५ रोजी सर्व शाळांमध्ये कवायात कार्यक्रमाचे (साधारणतः वीस मिनिटे कालावधी) आयोजन करण्याचे निर्देश प्राप्त आहेत. सदर कवायतींचा मार्गदर्शक व्हिडीओची लिंक या पत्रासोबत देण्यात येत आहे.
हे ही वाचाल –
१. वेगवेगळ्या वयोगटासाठी आणि सर्व विद्यार्थ्यांचा समावेश असेल अशा विविध कवायती शाळांमध्ये आयोजित करण्यात याव्यात.
२. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्याविषयी विद्यार्थ्यांनामध्ये जागरुकता निर्माण करणे, देशभक्तीची प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य चळवळींवर आधारित या संचलन प्रकारांमध्ये समावेश असावा.
३. यासाठी समर्पक पेहराव व देशभक्तीपर पार्श्वसंगीताचा वापर करुन हे सादरीकरण अधिक प्रभावी करता येतील. तसेच, आवश्यक सराव करुन कवायात प्रकार यशस्वीरित्या सादर होतील याची खात्री करावी.
विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय अभिमान निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिन राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये उत्साहात साजरा करण्यासाठी आपल्यास्तरावरुन पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. आपण केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.
(सोबत : मार्गदर्शक व्हिडीओची लिंक)
आयुक्त (शिक्षण),
म.रा., पुणे
प्रति,
१. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) संचालनालय, म.रा., पुणे
२. शिक्षण संचालक (प्राथमिक) संचालनालय, म.रा., पुणे
महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय
महाराष्ट्र राज्य, मध्यवती इमारत, डॉ. अॅनी बेझंट मार्ग, पुणे ४११००१
दूरध्वनी क्र.: ०२०-२६१२०१४१
ई-मेल: educom-mah@mah.gov.in
क्रमांक :- संकीर्ण-२०२४/प्र.क्र.३६४/एसडी-४
दिनांक : १९ जुलै, २०२५
विषय :- दिनांक १५ ऑगस्ट या देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी कवायत संचलन कार्यक्रम घेण्याबाबत..
संदर्भ :- शासनाचे समक्रमांकाचे परिपत्रक, दिनांक ३१ डिसेंबर, २०२४
महोदय,
राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये २६ जानेवारी, २०२५ पासून प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांसह साजरा करणेबाबत संदर्भाधीन परिपत्रकान्वये सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
२. दिनांक १५ ऑगस्ट या देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी दिनांक १५ ऑगस्ट, २०२५ रोजी कवायत संचलन कार्यक्रम घेण्याचे आयोजन करण्यात यावे.
३. राज्याचा शासकीय झेंडा वंदन व केंद्र शासनाचा शासकीय झेंडा वंदन कार्यक्रमानंतर शाळांमध्ये कवायत कार्यक्रमाचे आयोजन व्हावे. कवायत संचलनाचा कार्यक्रम साधारणतः वीस मिनिटे इतक्या कालावधीचा असावा.
४. कवायतीचा मार्गदर्शक व्हिडीओ तयार करण्यात आला असून, त्याची लिंक या पत्रासोबत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
५. दिनांक १५ ऑगस्ट, २०२५ रोजीच्या स्वातंत्र्यदिनी करावयाच्या कवायत संचलनाच्या वर नमूद केल्याप्रमाणे व अतिरिक्त सूचना आपल्या स्तरावरून सर्व संबंधितांना देण्यात याव्यात, ही विनंती.
आपला,
सोबत : वरीलप्रमाणे.
उपसचिव, महाराष्ट्र शासन
प्रति.
आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय (विस्तार), दालन क्र. ४१५, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२.
E-mail id: sd4.sesd-mh@gov.in
दूरध्वनी क्र. २२०२४७४५