Recruitment process in District Central Cooperative Banks through online mode
Recruitment process in District Central Cooperative Banks through online mode
Regarding implementing the recruitment process in District Central Cooperative Banks online to make it transparent and undisputed in the public interest.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरती प्रक्रिया लोकहितार्थ निर्विवाद व पारदर्शक होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन पध्दतीने राबविणेबाबत.
दिनांक:- ३१.१०.२०२५
संदर्भ:- १. शासन आदेश क्र. जिमस. ०४१८/६९४/प्र.क्र.६९/२-स. दि.१५.०६.२०१८
प्रस्तावना:-
२. शासन निर्णय क्र. जिमस.०४१८/६९४/प्र.क्र.६९/२-स, दि. २३.०६.२०२२
३. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांचा आदेश दि. १२.०३.२०२४
४. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांचे आदेश दि. ०३.०९.२०२४
५. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांचे दि. ३०.०९.२०२५ चे पत्र.
राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरती प्रक्रिया लोकहितार्थ निर्विवाद व पारदर्शक होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन पध्दतीने राबविण्याबाबत संदर्भ क्र. १ मधील शासन आदेश तसेच संदर्भ क्र.२ मधील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी त्यांची नोकरभरती प्रक्रिया केवळ संगणकीय ऑनलाईन पध्दतीने करणेबाबत संदर्भ क्र. १ व २ अन्वये बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच अशी ऑनलाईन नोकरभरती प्रक्रिया करण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांना अधिकृत संस्था / एजन्सी यांची राज्यस्तरीय तालिका / पॅनल तयार करण्याबाबत संदर्भ क्र.२ मधील शासन निर्णयाव्दारे निर्देश देण्यात आले आहेत. सदर निर्देशानुसार सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांनी विहित प्रक्रीयेचा अवलंब करुन संदर्भ क्र. ३ व ४ मधील आदेशान्वये संस्थांची तालीका / पॅनल तयार केले आहे. सद्यस्थितीत या तालिकेत ७ संस्थांचा समावेश करण्यात आला आहे.
राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांच्या स्तरावरील तालीकेमधील संस्थेची निवड करुन नोकरभरती प्रक्रिया सुरु केली आहे. तथापि, अशाप्रकारे सुरु केलेल्या नोकरभरती प्रक्रियेतील काही संस्थांबाबत संबंधित जिल्ह्यातील मा. लोकप्रतिनिधी / उमेदवार /नागरीकांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सदर तक्रारीच्या अनुषंगाने सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांनी संदर्भ क्र. ५ येथील दिनांक ३०.०९.२०२५ रोजीच्या पत्रान्वये शासनास प्रस्ताव सादर केला आहे. सदर प्रस्ताव विचारात घेऊन सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांनी तयार केलेली तालिका रद्द करुन यापुढे राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरती प्रक्रिया IBPS (इंस्टीट्यूट ऑफ बँकींग पर्सोनेल सिलेक्शन), TCS-आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) व MKCL (महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशन लि.) यापैकी कोणत्याही संस्थेमार्फत राबविण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय-
राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरती बाबत सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांच्या स्तरावर संदर्भ क्र. ३ व ४ मधील आदेशान्वये तयार केलेली संस्थांची तालिका / पॅनल रह करण्यात येत आहे. या बँकांची नोकरभरती प्रक्रिया पारदर्शीपणे होण्यासाठी यापुढे IBPS (इंस्टीट्यूट ऑफ बँकींग पर्सोनेल सिलेक्शन), TCS-आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) व MKCL (महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशन लि.) यापैकी कोणत्याही एका संस्थेमार्फत ऑनलाईन पध्दतीने घेण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. बँकेने नोकरभरतीसाठी निवड केलेल्या संस्थेस नोकरभरतीचे काम अन्य संस्थेस प्राधिकृत करता येणार नाही.
२. पदभरती करताना स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याच्या अनुषंगाने खालील कार्यपध्दती अवलंबावी-
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे कार्यक्षेत्र त्या-त्या जिल्ह्यापुरते मर्यादीत आहे. तसेच या बँकांचे सर्व सभासद त्या जिल्ह्यातील असतात. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिल्यास असे कर्मचारी बँकेचे ग्राहक सभासद ठेवीदार यांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकतील. त्यादृष्टीने खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत-
१. संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र असलेल्या जिल्ह्यातील मूळ रहिवासी (Domicile Certificate / अधिवास प्रमाणपत्र) असलेल्या उमेदवारांना ७० टक्के जागा राखीव ठेवाव्यात.
२. उर्वरीत ३० टक्के जागा जिल्ह्याबाहेरील उमेदवारांसाठी खुल्या असतील. तथापि, जिल्ह्याबाहेरील उमेदवार पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्यास या जागा स्थानिक उमेदवारांमधुन भरता येतील.
३. सदर शासन निर्णय ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी पदभरतीची जाहिरात या शासन निर्णयाच्या
दिनांकापूर्वी प्रसिध्द केली आहे त्या बँकांनाही लागू राहील.
४. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरती संदर्भात अधिकृत संस्थांची तालिका / पॅनल तयार करण्याबाबत दिलेले निर्देश वगळून शासन आदेश दि. १५.०६.२०१८ व शासन निर्णय दि. २३.०६,२०२२ मधील अन्य तरतूदी पूर्वीप्रमाणे लागू राहतील.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५१०३१२३४८०६०५०२ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने
अपर निबंधक तथा सह सचिव,
महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग शासन निर्णय क्र. जिमस.०४१८/६९४/प्र.क्र.६९/२-स मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
