New Pay Scale For Special Teachers
New Pay Scale For Special Teachers
क्रमांक : संकीर्ण-२०२४/प्र.क्र. ७४७/(ई-१३९८७९४)/टीएनटी-१,
दिनांक : ३० ऑक्टोबर, २०२५.
विषय : विशेष शिक्षकांना लागू करावयाच्या वेतनश्रेणीबाबत.
संदर्भ :
१. आपले पत्र क्र. ६०१/२००५/१३९३३०५, दि. २६.०८.२०२५.
२. आपले पत्र क्र. ६०१/७०६/२०२५, दि. १३.०२.२०२५.
३. शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग, क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र. ७४७/टीएनटी-१, दि. ०८.१०.२०२४
महोदय,
उपरोक्त विषयाबाबतच्या संदर्भ क्र. १ येथील पत्राच्या अनुषंगाने खालील बाबी आपल्या निदर्शनास आणण्यात येत आहेत :-
१. संदर्भ क्र. ३ येथील दि. ०८.१०.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्र. ३ (३) अन्वये अशी तरतूद करण्यात आली आहे की, समायोजन करावयाच्या विशेष शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता विचारात घेऊन समकक्ष प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक), पदवीधर प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक), माध्यमिक शिक्षक या पदांना लागू असलेली वेतनश्रेणी विशेष शिक्षकांना अनुज्ञेय असेल. यांचा अर्थ त्यांनी धारण केलेल्या अर्हता विचारात घेऊन त्यांना संबंधित वेतनश्रेणी अनुज्ञेय करणे क्रमप्राप्त आहे. या तरतूदीस बाधा पोहोचेल अशा प्रकारे वेतनश्रेणी अनुज्ञेय करणे उचित होणार नाही.
२. संदर्भ क्र. १ येथील पत्रान्वये आपण शासन परिपत्रक्र, दि. १३.१०.२०१६ मध्ये इयत्ता ६ वी ते ८ वी या वर्गाना शिकविणाऱ्या शिक्षकांपैकी १/३ शिक्षकांना सेवाज्येष्ठतेप्रमाणे पदवीधर वेतनश्रेणी देण्यात यावी अशी तरतूद केली असल्याच्या बाबीकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. तथापि, ही तरतूद जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी असून समायोजित झालेले विशेष शिक्षक हे एका विशिष्ट शाळेवर कार्यरत नसून त्यांना केंद्रातंर्गत येणाऱ्या सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या १ ली ते १२ वी इयत्तेच्या केंद्रातंर्गत शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांना अध्यापनाचे कार्य करावे लागणार आहे. त्यामुळे दि. १३.१०.२०१६ रोजीच्या परिपत्रकातील तरतूद विशेष शिक्षकांच्या बाबतीत लागू करणे अप्रस्तुत आहे.
३. संदर्भ क्र. २ अन्वये आपण विशेष शिक्षक पदावर समायोजन करण्यासाठीची कार्यपध्दती व विशेष शिक्षक या पदाकरीता सेवाप्रवेश व भरती प्रक्रिया व तदनुषंगिक बाबींचा मसुदा तयार करण्यासाठी नेमण्यात आलेल्या तज्ञ समितीचा अहवाल शासनास सादर केला आहे. या अहवालात पदवीधर प्राथमिक शिक्षक (इयत्ता ६ वी ते १० वी) या पदासाठी रु. ३६८००-१२८८००/- (एस-१४) ही वेतनश्रेणी लागू करण्याची शिफारस केली आहे. सदर शिफारस मान्य केल्याचे आपल्या संदर्भ क्र. २ येथील पत्रावरुन दिसून येत आहे. असे असताना संदर्भ क्र. १ अन्वये पदवीधर शिक्षक (प्राथमिक) पदासाठी एस-१० ही वेतनश्रेणी लागू करण्याची आपली शिफारस मुळ शिफारशीशी विसंगत आहे.
२. उपरोक्तप्रमाणे आपल्या निदर्शनास आणलेल्या बाबी विचारात घेता, समायोजन करण्यात आलेल्या विशेष शिक्षकांना त्यांनी धारण केलेल्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेनुसार खालीलप्रमाणे वेतनश्रेणी अनुज्ञेय करण्याबाबत आपल्या स्तरावरुन सर्व संबंधितांना कळविण्यात यावे.
अ.क्र. शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता वेतनश्रेणी
१. एचएससी+डीएड (स्पेशल)/समकक्ष
८-१० २९२००-९२३००
२. पदवी+डीएड (स्पेशल)/समकक्ष)-
९-१४ ३८६००-१२२८००
३. पदवी+बीएड (स्पेशल)/समकक्ष)-
९-१४ ३८६००-१२२८००
४. पदवी + डीएड (स्पेशल) / समकक्ष + बीएड स्पेशल)/समकक्ष-
९-१४ ३८६००-१२२८००
५. पदव्युत्तर पदवी बीएड (स्पेशल) /समकक्ष-
S-१४ ३८६००-१२२८००
६. पदव्युत्तर पदवी + डीएड (स्पेशल) /समकक्ष + बीएड (स्पेशल)/समकक्ष-
S-१४ ३८६००-१२२८००
आपला,
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
प्रति,
शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
