Raje Yashwantrao Holkar Education Scheme राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण योजना

Raje Yashwantrao Holkar Education Scheme

IMG 20250517 100446
Raje Yashwantrao Holkar Education Scheme

Raje Yashwantrao Holkar Education Scheme

Raje Yashwantrao Holkar English Medium Residential Education Scheme

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण योजना

Other Backward Bahujan Welfare Department
Regarding renaming the scheme To provide education to the students of Dhangar community belonging to Nomadic Tribes-C Category in reputed English medium residential schools as Raje Yashwantrao Holkar English Medium Residential Education Scheme.

“भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विदयार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे” या योजनेचे नाव “राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण योजना” असे करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
इतर मागास बहुजन कल्याण विभाग,
शासन निर्णय क्रमांकः धइंशा-२०२५/प्र.क्र.८५/योजना-२,
मंत्रालय, मुंबई

दिनांक:- १६ मे, २०२५

वाचा :-

१) शासन निर्णय, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग, क्रं. धईशाप्र-२०१९/प्र.क्र.७२/शिक्षण, दि.०४/०९/२०१९.

२) शासन निर्णय, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, क्र. धइशा-२०२१/प्र.क्र.९५/ योजना-२ दि.५/३/२०२४

प्रस्तावना :-

संदर्भाधिन शासन निर्णयांस अनुसरुन ‘भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विदयार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे’ ही योजना राबविण्यात येत आहे.

सद्यःस्थितीत, सदरहू योजनेस “धनगर नामांकित शाळा योजना” या नावाने संबोधण्यात येत आहे. राजे यशवंतराव होळकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत शैक्षणिक प्रगतीसाठी अनेक काम केली. त्यांनी सर्वसमावेशक आणि बहुभाषिक शिक्षणाला प्रोत्साहन दिले. गुरुकुल सारख्या पारंपारिक शिक्षण संस्थांना आर्थिक सहाय्य करत ज्ञानप्रसाराला चालना दिली. लष्करी शिक्षणात शिस्त, नीती आणि नेतृत्वगुणांचा समावेश केला. शिक्षण फक्त उच्च वर्गापुरते मर्यादित न ठेवता सर्वांसाठी खुले करणाऱ्या व आपल्या राजवाड्यात मुलींसाठी शिक्षण सुरु करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या शुर, कुशल, मुत्सद्दी, प्रजाहित दक्ष राजाच्या कार्याचा गौरव व्हावा याकरीता तसेच, सदरहू योजनेंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, ही बाब विचारात घेऊन सदरहू योजनेचे नाव “राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण योजना” असे करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

       शासन निर्णय

“भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विदयार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे” या योजनेचे नाव “राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण योजना” असे करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०५१६१५३००४८७३४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सदर शासन निर्णय पीडीएफ मध्ये हवा असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा

उप सचिव, महाराष्ट्र शासन

IMG 20250517 095542
Raje Yashwantrao Holkar Education Scheme

Leave a Comment

error: Content is protected !!