Procedure To Change Appointment Date DOB Name Gender On Shalarth Portal
Procedure To Change Appointment Date DOB Name Gender On Shalarth Portal Circular
Procedure For Change Joining Date DOB Name Gender On Shalarth portal GR
Procedure to change appointment date/date of birth/name/gender on Shalarth portal
Action to be taken regarding change in appointment date/date of birth/name gender on Shalarth portal Education Commissioner Guidelines
Shalarth Pranali niyukti dinank janm tarikh janm dinank Navat badal aadesh Aaukt Shikshan orders
shalarth pranali abhilekh durusti
क्र. शिसंमा / बदल २०२५-२६/टि-६बी
दिनांकः-३०/०४/२०२६
विषय: शालार्थ पोर्टलवरील नियुक्ती दिनांक/जन्म दिनांक/नावात जेंडर मध्ये बदल करणे बाबत करावयाची कार्यवाही,
संदर्भ प्रस्तुत विषया संदर्भात संचालनालयास प्राप्त शिफारशी पत्र, आवक.क्र. ७२९५२६०/७२१५०४३/७२९५००१/२८०७०००.दि.२९.०४.२०२५६.
उपरोक्त विषयासंदर्भात शालार्थ प्रणालीवर पुढील प्रमाणे कार्यप्रणाली निश्चित करण्यात येत
शालार्थ पोर्टलवरील नियुक्ती दिनांक/जन्म दिनांक/नावात जेंडर मध्ये बदल करणे-
ज्या कर्मचाऱ्यांचे शालार्थ पोर्टलवर नोंदविण्यात आलेल्या नियुक्ती दिनांक/जन्म दिनांक/नावात बदल/जेंडर बदल करणे बाबतचे प्रस्ताव अधिक्षक (वेतन पथक) शिक्षणाधिकारी कार्यालयास प्राप्त झालेले आहेत, त्या संदर्भात प्रकरणनिहाय असे प्रस्ताव मुळ अभिलेखे आधारे पडताळणी करुन शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे सादर करावेत.
प्रकरणनिहाय पुढील अभिलेख्यांची पडताळणी करुनच असे प्रस्ताव शिफारशीसह विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करण्यात यावेत.
अ.क्र शालार्थ प्रणालीवर बदल करावयाचा पडताळणी करावयाचे अभिलेखे
तपशील
नियुक्ती दिनांक
संस्था नियुक्ती आदेश, रुजू अहवाल आणि वैयक्तिक मान्यता आदेश.
जन्म दिनांक
विहित प्राधिकारी यांचे जन्म प्रमाणपत्र अथवा एस.एस.सी. प्रमाणपत्र
नावात बदल
राज्य शासनाचे रानपत्र अथवा एस.एस.सी. प्रमाणपत्र अथवा आधार कार्ड अथवा विवाह प्रमाणपत्र
जंडर बदल
जन्म प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचा दाखला अथवा आधार कार्ड, ई
उपरोक्त प्रमाणे अभिलेख्यांची पडताळणी करुन असे परिपूर्ण प्रस्ताव शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे सादर करावेत. विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी पुनःश्च अभिलेख्यांची (मुळ प्रत अथवा शालार्थ डिजीटलायझेशन मधील उपलब्ध माहिती आधारे) पडताळणी करुन शालार्थ प्रणालीवर त्यांचे लॉगीनला उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सुविधेचा वापर करुन उपरोक्त प्रकरणो शालार्थ पोर्टलवरील नोंदी दुरुस्त कराव्यात.
Digitally signed by PALKAR MAHESH MADHUKAR Date: 04-087 महेश पालकर)
शिक्षणसंचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-०५
प्रत: माहितीसाठी सविनय सादर
१. मा. आयुक्त (शिक्षण) शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे-०१
प्रत कार्यवाहीस्तवः-
श्री. पवन जोशी, बिझनेस अॅनालिस्ट, (शालार्थ सिस्टीम) महाआयटी, मुंबई यांना देऊन कळविण्यात येते की उपरोक्त नुसार कार्यवाही करण्याची सुविधा शालार्थ प्रणालीवर उपलब्ध होण्यासाठी आवश्यक ते तांत्रीक बदल करण्यात यावेत. ज्या वेळी कोणत्याही माहिती दुरुस्त करावयाची असल्यास नव्याने समाविष्ठ होणारी माहिती व त्यापूर्वीची माहिती प्रणालीवर संग्रही ठेवण्यात यावी, बदल केलेली व बदलापूर्वीची माहिती कोणत्याही परिस्थितीत प्रणालीवरुन हटविण्यात/काढून टाकण्यात येऊ नये.
प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग
२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद सर्व,
३) शिक्षणाधिकारी वृन्हमंबई महानगरपालिका.
४) प्रशासन अधिकारी, पणे महानगरपालिका,
५) शिक्षण निरीक्षक मंबई (उत्तर/दक्षिण/पश्चिम)
६) प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा.सर्व.
७) वेतन पथक अधिक्षक (प्राथ/माध्य) सर्व.
