पोलीस शिपाई / पोलीस शिपाई चालक / बॅण्डस्मन / सशत्र पोलीस शिपाई / कारागृह शिपाई भरती-२०२४-२०२५ करीता उमेदवारांसाठी सुचना व अर्ज ऑनलाईन भरण्याकरीता आवश्यक माहिती ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावयाची लिंक Police Bharti 2025

Police Bharti 2025

Police Bharti 2025

Police Bharti 2025 Online Apply Link

Maha Police Recruitment 2025

Instructions and necessary information for candidates for Police Constable / Police Constable Driver / Bandsman / Armed Police Constable / Jail Constable Recruitment-2024-2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पोलीस शिपाई / पोलीस शिपाई चालक / बॅण्डस्मन / सशत्र पोलीस शिपाई / कारागृह शिपाई भरती-२०२४-२०२५

1) आवेदन अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळः –
जाहिरातीत नमुद अर्हता व अटीची पुर्तता करणारे उमेदवार यांनी खाली दिलेल्या विहित दिनांकाच्या मुदतीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज भरावेत.

१. ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ
दि.०१.११.२०२५ रोजी ००.०० वा. पासुन

२.ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक व वेळ
दि.३०.११.२०२५ रोजी २४.०० वा. पर्यंत

  1. Date and time of submission of online application
    From 00.00 hrs on 01.11.2025
  2. Last date and time of submission of online application
    Upto 24.00 hrs on 30.11.2025

2) परीक्षा शुल्कः – Recruitment Examination Fee
सदर परीक्षेकरीता परीक्षा शुल्क खालीलप्रमाणे लागू राहील.

अ.क्र.पदाचे नावखुला प्रवर्गमागास प्रवर्ग
पोलीस शिपाईरु. ४५०/-रु. ३५०/-
पोलीस शिपाई चालकरु. ४५०/-रु. ३५०/-
सशत्र पोलीस शिपाईरु. ४५०/-रु. ३५०/-
बॅण्डस्मनरु. ४५०/-रु. ३५०/-
कारागृह शिपाईरु. ४५०/-रु. ३५०/-

सदरचे शुल्क ना-परतावा आहे.

Police / Army/ MPSC / Bharti Quiz : पोलीस / सैन्य / सर्व भरती परीक्षा प्रश्नमंजुषा सोडवा या ओळीला स्पर्श करून

3) सर्वसाधारण सुचनाः General Instructions

3.1) पोलीस भरती-२०२५ ही महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील विविध घटकात पोलीस शिपाई / पोलीस शिपाई चालक / बॅण्डस्मन / राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई संवर्गात दिनांक ३१/१२/२०२५ अखेरपर्यंत रिक्त झालेल्या पदांची गणना करुन जाहीर करण्यात आलेली आहे. सदरची रिक्त पदे सामाजिक आरक्षणांतर्गत मागील अनुशेष व बिंदुनामावलीनुसार निश्चित करण्यात आलेली आहेत.
3.2) पोलीस भरती-२०२५ च्या प्रक्रियेत तयार करण्यात आलेल्या निवड यादीतील उमेदवाराची निवड तात्पुरती (Provisional selection) असेल. निवड यादीमध्ये नावाचा समावेश झाला म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजण्यात येवू नये.
3.3) पोलीस शिपाई / पोलीस शिपाई चालक / बॅण्डस्मन / राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई संवर्गात भरती प्रक्रियेत निवड होऊन नियुक्ती झालेल्या उमेदवारास महाराष्ट्र पोलीस नियमावली, १९९९ व पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई व घटक प्रमुखांनी वेळोवेळी विहित केलेली कर्तव्ये पार पाडावी लागतील.

महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणा-या भरती प्रक्रियेस मान्यता देणेबाबत.. दिनांक :- १० सप्टेंबर २०२५ वाचा ओळीला स्पर्श करून


4) आवश्यक कागदपत्रेः


सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे व कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापुर्वी उमेदवारांनी प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे.
4.1) SSC / HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र,
4.2) जन्म दाखला,
4.3) रहिवाशी प्रमाणपत्र,

पोलीस शिपाई / पोलीस शिपाई चालक / बॅण्डस्मन / सशत्र पोलीस शिपाई / कारागृह शिपाई भरती-२०२४-२०२५ करीता उमेदवारांसाठी सुचना व (अर्ज ऑनलाईन भरण्याकरीता आवश्यक माहिती खालील लिंक वर संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावयाची सुविधा फक्त खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!