Police Recruitment Corrigendum
Police Recruitment Corrigendum
Maharashtra Police Constable and Jail Constable Recruitment Process Corrigendum
Regarding approval of the recruitment process being implemented to fill the vacant posts of Police Constable in the Maharashtra Police Force and Prison Constable in the Prison Department
महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणा-या भरती प्रक्रियेस मान्यता देणेबाबत..
दिनांक :- १० सप्टेंबर २०२५
वाचा :-
१) गृह विभाग, शासन निर्णय समक्रमांक, दि.२०.०८.२०२५
२) विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र क्रमांक अपोमसं/ प्रशि/पोशि भरती २०२४-२५/२२/२०२५, दि.०१.०९.२०२५
शासन शुद्धिपत्रक
महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दि.०१.०१.२०२४ ते दि.३१.१२.२०२४ या कालावधीत रिक्त झालेली व दि.०१.०१.२०२५ ते दि.३१.१२.२०२५ या कालावधीत रिक्त होणारी एकूण १५,६३१ पदे भरतीसाठी राबविण्यात येणा-या भरती प्रक्रियेस संदर्भ क्र. १
येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्र. ४
“४. सन २०२२ व सन २०२३ मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरीता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात येत आहे.”
या ऐवजी
“४. सन २०२२, २०२३, २०२४ व २०२५ मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरीता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात येत आहे.” असा वाचण्यात यावा.
२. सदर शासन शुद्धिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२५०९१०१९०००४९२२९ असा आहे. हे शासन शुद्धिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
शासन शुद्धिपत्रक पीडीएफ प्रत लिंक
उप सचिव,
महाराष्ट्र शासन
गृह विभाग
शासन शुद्धिपत्रक क्रमांकः पोलीस-११२५/प्र.क.१७३/पोल-५अ, मुंबई
