प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतंर्गत सर्व साधारण घटकांतर्गत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या मानधनाकरीता राज्य शासनाचा अतिरीक्त निधी वितरणाबाबत सन २०२५-२६ PM POSHAN Distribution Of Remuneration Fund Cooks Helpers

PM POSHAN Distribution Of Remuneration Fund Cooks Helpers

PM POSHAN Distribution Of Remuneration Fund Cooks And Helpers

PM-POSHAN Scheme Cooks and Helpers Honorarium Fund Distribution

Regarding the distribution of additional funds by the State Government for the remuneration of cooks and helpers under all general components under the Pradhan Mantri Poshan Shakti Nirman (PM-POSHAN) Scheme… (Year 2025-26)

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN) योजनेतंर्गत सर्व साधारण घटकांतर्गत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या मानधनाकरीता राज्य शासनाचा अतिरीक्त निधी वितरणाबाबत… (सन २०२५-२६)

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन निर्णय क्रमांकः शापोआ-२०२५/प्र.क्र.२०१/एस.डी.३ मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२

दिनांकः १२ फेब्रुवारी, २०२६

वाचा :

१) केंद्र शासनाचे आदेश क्र. प्र. क्र.३-४/२०२५- PMP-५ दि.२९ जानेवारी, २०२६.

२) वित्त विभागाचे परिपत्रक क्र. अर्थसं २०२५/प्र.क्र.४४/अर्थ-३, दि.०७ एप्रिल, २०२५.

३) शिक्षण संचालक (प्राथ.), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. प्राशिसं/पीएम पोषण/२०२५-२६/०४४४९, दि.२९.०१.२०२६

४) शासन निर्णय क्र. शापोआ २०२५/प्र.क्र.१९७/एसडी-३, दि.०३.०२.२०२६

५) शासन समक्रमांकाचे दि.१५.१०.२०२५ व दि.२६.११.२०२५ रोजीचे शासन निर्णय,

प्रस्तावना :

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत केंद्र शासनाने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील मंजूर केंद्र हिस्स्याच्या निधीमधील तिसऱ्या हप्त्याचा रु.३११९२.०४ लक्ष इतका निधी संदर्भाधिन दि.२९ जानेवारी, २०२६ रोजीच्या आदेशान्वये राज्य शासनास उपलब्ध करुन दिला आहे. सदर निधीची विगतवारी सर्वसाधारण, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या घटकांतर्गत केली आहे. प्रस्तुत योजनेकरीता केंद्र व राज्य हिस्स्याच्या खर्चाचे प्रमाण ६०:४० आहे. उपरोक्त केंद्र हिस्स्याच्या निधीपैकी सर्वसाधारण घटकांतर्गत केंद्र हिस्स्याचा ६० टक्के प्रमाणे रु.२२६८९.२९ लक्ष इतका निधी आहे (स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या रु.२५००/- प्रतिमाह मानधनामध्ये रु.६००/- केंद्र हिस्साचा समावेश आहे.) त्यास समरुप राज्य हिस्याचा ४० टक्के प्रमाणे रु. १५१२६.१९ लक्ष (स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या रु.२५००/- प्रतिमाह मानधनामध्ये रु.४००/- राज्य हिस्सा समावेश आहे.) असा एकूण रु. ३७८१५.४८ लक्ष इतका निधी दि.०३.०२.२०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये वितरीत केला आहे. उपरोक्त शासन निर्णयान्वये स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या रु.२५००/- प्रतिमाह मानधनामध्ये रु.६००/- केंद्र हिस्सा व रु.४००/- राज्य हिस्सा असा एकूण रु.६००+४००=१०००/- इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या मानधनासाठी राज्य हिस्यातून अतिरिक्त रु.१५००/- याप्रमाणे वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय क्रमांकः शापोआ-२०२५/प्र.क्र.२०१/एस.डी.३

शासन निर्णयः-

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेसाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय तरतूदीमधून सर्वसाधारण घटकांतर्गत स्वयंपाकी तथा मदतनीस यांना राज्य हिस्यातून अतिरिक्त रु.१५००/- याप्रमाणे रु. ५०,६०,२८,०००/- (रुपये पंन्नास कोटी साठ लक्ष अठ्ठावीस हजार फक्त) इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

लेखाशिर्ष

सन २०२५-२६ मधील अर्थसंकल्पिय तरतूद

या शासन निर्णयान्वये वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत असलेला निधी

मागणी क्रमांक ई-२, २२०२, सर्वसाधारण शिक्षण, ११२- प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य (०१) (०४) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (पीएम-पोषण) (सर्वसाधारण) (आवर्ती-राज्य हिस्यापेक्षा अधिकचा खर्च) (कार्यक्रम) ३१, सहायक अनुदाने (वेतनेत्तर) (२२०२८०१२)

रु,१८०००,०० लक्ष

रु.५०६०.२८ लक्ष

२. सदर शासन निर्णय वित्त विभाग यांचा अनौपचारीक संदर्भ क्र. अनौस ७२/व्यय-५, दिनांक ०५.०२.२०२६ अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

३. शालेय शिक्षण विभागाचे शासन परिपत्रक क्र. संकीर्ण २३२५/(७०/२५)/अर्थसंकल्प, दि.१७.१०.२०२५ अन्वये शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडून वितरीत केल्या जाणाऱ्या अनुदानाचे आहरण व संवितरण करण्याकरिता नियंत्रक अधिकारी आणि आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्यात आले असून त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी.

४. सदर निधी केंद्र व राज्य शासनाने वेळोवळी दिलेले निर्देश / आदेश / शासन निर्णय / परिपत्रक / सूचना यांना अनुसरुन विहित कालावधीत खर्च करण्याची दक्षता शिक्षण संचालक (प्राथ.) महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी घेण्यात यावी. तसेच, सदर निधी खर्च केल्यानंतर याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करावे.

५. प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६०२१२१२०३४९५१२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

  शासन निर्णय पीडीएफ प्रत लिंक 

उप सचिव, महाराष्ट्र शासन

PM POSHAN Distribution Of Remuneration Fund Cooks Helpers

Leave a Comment

error: Content is protected !!