PAVITRA Portal For Visible To All Teachers Recruitment
PAVITRA Portal For Visible To All Teachers Recruitment
Regarding prescribing a transparent method for the selection of teachers in residential ashram schools for the children of private aided primary/secondary/higher secondary/sugarcane workers of the Vijabhaj category in the state as well as Vidyaniketan ashram schools through the computerized system PAVITRA (Portal For Visible To All Teachers Recruitment)
पवित्र (PAVITRA- Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे राज्यातील विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित प्राथमिक/माध्यमिक/ उच्च माध्यमिक/ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठीच्या निवासी आश्रमशाळा तसेच विद्यानिकेतन आश्रमशाळांमधील शिक्षक निवडीसाठी पारदर्शक पद्धती विहित करण्याबाबत…
महाराष्ट्र शासन
इतर मागास बहुजन कल्याण विभाग, शासन निर्णय, क्र. विभशा-२०२५/प्र.क्र.७३/विजाभज-१.
मंत्रालय विस्तार भवन, मुंबई-४०००३२.
दिनांकः ०३ डिसेंबर, २०२५,
वाचा:-
१. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक-सीईटी-२०१५/प्र.क्र.१४९ /टीएनटी-१, दिनांक २३/६/२०१७
२. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक-सीईटी २०१५/प्र.क्र.१४९ /टीएनटी-१, दिनांक २०/६/२०१८
३. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक सीईटी २०१५/प्र.क्र.१४९ /टीएनटी-१, दिनांक ०७/०२/२०१९
४. शासन निर्णय, विजाभज, इमाव, विमाप्र कल्याण विभाग, क्रमांक-विभशा-२०१९/प्र.क. २०४/विजाभज-२, दिनांक १५/०५/२०१९.
५. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक-संकीर्ण-२०२२/प्र.क्र.१०६ /टीएनटी-१, दिनांक १०/११/२०२२
६. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक-संकीर्ण-२०२३/प्र.क्र.५०९/टीएनटी-१, दिनांक १३/१०/२०२३
७. शासन अधिसूचना, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संकीर्ण-२०२३/प्र.क्र. ३०२/टीएनटी-१, दि.१२/२/२०२५
प्रस्तावना :-
शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, दि.०७.०२.२०१९ अन्वये, राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करतांना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवक भरती “अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी उच्चतम गुण प्राप्त उमेदवारांमधून “पवित्र” (PAVITRA- Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे निवड करण्याबाबतची कार्यपध्दती विहित करण्यात आली असून सदर संगणकीय प्रणाली बंधनकारक करण्यात आली आहे.
२. या विभागांतर्गत येणाऱ्या राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक/ ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठीच्या निवासी आश्रमशाळा तसेच विद्यानिकेतन आश्रमशाळांमधील शिक्षक निवड करतांना सर्व पात्र उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक
उमेदवाराची निवड होऊन त्यानुषंगाने विजाभजच्या आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यादृष्टीने शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, दिनांक २३ जून, २०१७ आणि शासन निर्णय दिनांक ०७.०२.२०१९ अन्वये लागू करण्यात आलेली ‘पवित्र’ (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे राज्यातील विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक / ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठीच्या निवासी आश्रमशाळा तसेच विद्यानिकेतन विजाभज आश्रमशाळांमधील शिक्षक निवडीसाठी पारदर्शक पद्धती विहित करण्याची वाव या विभागाने दिनांक १५/५/२०१९ च्या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आली असून सदर शासन निर्णयानुसार पवित्र (PAVITRA- Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीमध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत वेळोवेळी जी सुधारणा करण्यात येईल ती या विभागास योग्य फेरफारासह लागू राहील असे नमूद करण्यात आले आहे.
३. उपरोक्त शासन निर्णयांतील तरतूदी तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संदर्भाधिन शासन निर्णयाच्या धर्तीवर विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक/ ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठीच्या निवासी आश्रमशाळा तसेच विद्यानिकेतन विजाभज आश्रमशाळांमधील शिक्षक निवडीसाठी ‘पवित्र’ (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीची अंमलबजावणी करणे / सदर प्रणाली राबविण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना / पारदर्शक कार्यपध्दती विहीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.
शासन निर्णय :-
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संदर्भाधिन शासन निर्णयांच्या धर्तीवर विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित प्राथमिक/ माध्यमिक/उच्च माध्यमिक ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठीच्या निवासी आश्रमशाळा तसेच विद्यानिकेतन विजाभज आश्रमशाळांमधील शिक्षक निवडीसाठी पवित्र (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीची अंमलबजावणी करणे, तसेच सदर प्रणाली राबविण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना/ पारदर्शक कार्यपद्धती खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे:-
२. शिक्षण सेवक भरती कार्यपध्दतीः-
शिक्षण सेवक रिक्त पदावर भरती अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारावर
करताना अनुसरावयाची कार्यपध्दती पुढीलप्रमाणे राहील:-
२.१ सरल (Systematic Administrative Reforms for Achievement in Learning by Students) या संगणकीय प्रणालीवर नोंदणीकृत विद्यार्थी संख्येच्या आधारे राज्यातील सर्व विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक/ ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठीच्या निवासी आश्रमशाळा तसेच विद्यानिकेतन विजाभज आश्रमशाळांची संचमान्यता करण्यात येईल. संचमान्यतेनंतर अतिरिक्त झालेल्या सर्व शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतर रिक्त पदांची माहिती प्रसिध्द करण्यात येईल.
२.२ सर्व व्यवस्थापनांच्या आश्रमशाळांतील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदांच्या भरती करीता व्यावसायिक व किमान शैक्षणिक अर्हतेसह विषर्यानहाय, माध्यमनिहाय, प्रवर्गनिहाय व बिंदू नामावलीनुसार रिक्त पदांचा तपशील संबंधित शैक्षणिक संस्था “पवित्र” या संगणकीय प्रणालीमध्ये भरेल. त्यानुसार संबंधित शैक्षणिक संस्था ही संबंधित प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांचेकडे जाहिरात परवानगीचा प्रस्ताव पदभरतीपूर्वी सादर करेल. संबंधित शैक्षणिक संस्था तसेच सक्षम प्राधिकाऱ्यांनी करावयाची कार्यवाही याबाबतचे वेळापत्रक वेळोवेळी निश्चित करण्यात येईल. बिंदुनामावली प्रचलीत कार्यपध्दतीनुसार तपासणे आवश्यक राहील.
२.३ प्रत्येक शैक्षणिक संस्थेस, संबधित सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग तसेच संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, म.रा., पुणे यांना स्वतंत्र Login (User name, Password) उपलब्ध करुन दिला जाईल. प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या Login वर माहिती प्राप्त झाल्यानंतर सात कार्यालयीन दिवसांत, जाहिरातीतील माहिती बरोबर असल्याची खात्री करतील व सदरची माहिती बरोबर असल्यास मान्य करतील, माहिती अपूर्ण किंवा चुकीची असल्यास कारणासह अमान्य करतील,
२.४ प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण यांनी सात कार्यालयोन दिवसांच्या विहित कालमर्यादेत कार्यवाही न केल्यास त्याबाबतची सद्यःस्थिती संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, म.रा., पुणे यांच्या Login वर दर्शविली जाईल. संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, म.रा., पुणे यांच्या Login वर प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुषंगाने तीन कार्यालयीन दिवसांच्या आत संबंधित प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण यांना कार्यवाही करण्याबाबत कळवतील.
संबंधित प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण यांनी विहित मुदतीत जाहिरात परवानगी प्रस्तावावर निर्णय न घेतल्यास त्यांच्या गोपनीय अहवालात याबाबतची नोंद घेण्याबाबत संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे हे कार्यवाही करतील.
२.५ प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण यांनी मान्यता दिल्यानंतर संस्थेच्या मागणीनुसार ‘पवित्र’ पोर्टलवर जाहिरात प्रदर्शित होईल व संस्थेच्या Login वर दिसेल. तसेच संस्थेच्या प्रतिनिधीस त्याबाबत SMS (संदेश) प्राप्त होईल, सदर जाहिरात https://mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर प्रदर्शित होईल.
२.६ इच्छुक व अर्हताप्राप्त उमेदवार, जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून आपल्या अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणीमध्ये पात्र गुर्णासह पवित्र प्रणालीवर निश्चित केलेल्या कालावधीच्या आत अर्ज करतील, उमेदवारांना विजाभज आश्रमशाळांच्या खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त जागांसाठी उपलब्ध असलेल्या सर्व रिक्त जागांसाठी पात्रतेनुसार प्राधान्यक्रम देता येतील.
२.७. शासन अधिसूचना, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, दिनांक १२/२/२०२५ नुसार खाजगी अनुदानित विजाभज आश्रमशाळेतील शिक्षकाच्या प्रत्येक रिक्त जागेकरीता मुलाखतीसाठी १:३ या प्रमाणात उमेदवारांची यादी पवित्र पोर्टलमार्फत व्यवस्थापकांना उपलब्ध करुन देण्यात येईल.
संबंधित खाजगी व्यवस्थापन त्यांच्या लॉगिनवर मुलाखतीसाठी उपलब्ध झालेल्या निवडसूचीतील उमेदवारांची मुलाखत घेऊन व त्यांची अध्यापन कौशल्ये तपासून त्या आधारे उच्चतम गुण प्राप्त झालेल्या उमेदवाराची रिक्त पदावर निवड करेल. मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण ३० गुण असतील, मुलाखत व अध्यापन कौशल्याव्दारे संबंधित शैक्षणिक संस्था उमेदवारांचे गुणपत्रक व निकाल पवित्र प्रणालीवर जाहिर करतील. त्याचबरोबर मुलाखतीस उपस्थित राहिलेल्या उमेदवाराला देखील त्यांचा निकाल व्यक्तिशः कळवतील. गुणपत्रकानुसार प्रथम क्रमांकावर असलेल्या उमेदवाराची नियुक्ती ७ कार्यालयीन दिवसात संबंधित शैक्षणिक संस्था करेल. निवड झालेला उमेदवार ७ कार्यालयीन दिवसात हजर न झाल्यास गुणानुक्रमे पुढील उमेदवाराची नियुक्ती संस्था करेल.
२.८. संबंधित शैक्षणिक संस्था यांनी निवडसूचीतील उमेदवारांच्या मुलाखतो दरम्यान संबंधित उमेदवारांचे सर्व मूळ कागदपत्रांची पडताळणी करावी. (शालान्त/उच्च माध्यमिक अभ्यासक्रमाची गुणपत्रिका व प्रमाणपत्र, मान्यताप्राप्त विद्यापीठाची शैक्षणिक व व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ततेची पदवी/पदविका, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकरिता) creamy layer प्रमाणपत्र, शिक्षक पात्रता परीक्षा (इ.१ ली ते ८ वी करीता) अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेमध्ये मिळालेले गुण तसेच समांतर आरक्षण (महिला/दिव्यांग खेळाडू इत्यादी)), त्या-त्या प्रवर्गात आवश्यक असलेले इतर सर्व कागदपत्रांची तपासणी करतील.
२.९. नियुक्ती करीता उमेदवाराने सादर केलेले कागदपत्र खोटे अथवा बनावट असल्याचे त्यांच्या सेवेच्या कालावधीत निदर्शनास आल्यास संबंधित उमेदवार फौजदारी कारवाईस पात्र असेल व त्यांच्या सेवा त्वरित समाप्त करण्यात येतील.
२.१०. नियुक्ती करावयाचे उमेदवार आवश्यक अर्हता धारण करीत नसल्याचे छाननी अंती आढळल्यास नियुक्ती प्राधिकारी अशी नोंद ऑनलाईन पध्दतीने करेल. त्यानुसार उमेदवारास प्रणालीद्वारे माहिती प्राप्त होईल. या संदर्भात उमेदवारास आक्षेप असल्यास सात्त दिवसांच्या आत पवित्र प्रणालीवर तो असा आक्षेप नोंदवू शकेल. सदर आक्षेप शैक्षणिक संस्था/ संबंधित प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांना प्रणालीवर दिसेल. त्यावर संबंधित प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण सात दिवसांच्या आत निर्णय घेतील.
२.११ छाननी अंती मूळ कागदपत्र योग्य असल्याची खात्री झाल्यास नियुक्तीस पात्र उमेदवारांना खाजगी शैक्षणिक संस्था व्यवस्थापन सात दिवसांच्या कालावधीत ई-मेल व्दारे तसेच नोंदणीकृत डाकेने नियुक्ती पत्र पाठवेल.
२.१२ उमेदवाराने नियुक्ती पत्रास सात दिवसांच्या आत स्विकृतो कळविणे बंधनकारक राहिल. अशी स्विकृती दिल्यानंतर संबंधित आश्रमशाळेचा मुख्याध्यापक त्या उमेदवारास शिक्षण सेवक म्हणून “पवित्र संगणकीय प्रणाली व्दारे ऑनलाईन रुजू करुन घेतील, तसा रुजू अहवाल प्रणालीवर भरतील. त्यामुळे सदर शिक्षण सेवकाची माहिती “सरल” संगणक प्रणालीवर आपोआप अद्ययावत होईल व “VJNT-Sevaarth” प्रणालीसाठी उपलब्ध राहील, निवड झालेल्या उमेदवारास संस्थेने रुजू करुन न घेतल्यास अशा संस्थांच्या आश्रमशाळेतील संबंधित पद व्यपगत करण्यात येईल.
प्रत,
२.१३ शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, दि ०७.०२.२०१९ मधील मुद्दा क्र. ५.८ नुसार ‘मुलाखतीशिवाय निवड प्रक्रिया’ या प्रकारासाठी, उमेदवार नियुक्तीसाठी हजर न झाल्यास अथवा अपात्र ठरल्यास रिक्त राहिलेल्या पदासाठी पुन्हा निवड प्रक्रिया राबविण्यात येईल.
तसेच, शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, दि ०७.०२.२०१९ मधील मुद्दा क्र. ५.९ नुसार ‘मुलाखतीसह निवड प्रकारासाठी या प्रकारासाठी, उमेदवार नियुक्तीसाठी हजर न झाल्यामुळे अथवा अपात्र ठरल्यामुळे रिक्त राहिलेल्या शिक्षण सेवकांच्या पदावर प्रतिक्षा यादीवरील पुढील उमेदवाराची निवड करता येईल.
२.१४ उमेदवार शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, वय, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि इतर सर्व आवश्यक प्रमाणपत्र याबाबत अपात्र झाल्यास, संबंधित उमेदवाराची या परीक्षेसाठीची अर्हता संपुष्टात येईल, मात्र आवश्यक अर्हतेच्या पूर्ततेअंती याच किंवा सुधारित गुणाच्या आधारावर अर्ज करण्यास उमेदवार पात्र असतील.
२.१५ या शासन निर्णयानंतर करण्यात येणाऱ्या शिक्षण सेवक नियुक्तीकरिता वैयक्तिक मान्यता तसेच ना-हरकत प्रमाणपत्राची गरज राहणार नाही. त्यामुळे अल्पसंख्याक संस्था संचलित विजाभज आश्रमशाळा आणि अनुकंपा तत्वावर नियुक्त करण्यात आलेली शिक्षण सेवक नियुक्ती वगळून “पवित्र प्रणाली” मार्फत करण्यात येणाऱ्या शिक्षण सेवक नियुक्तीकरिता यापुर्वी असलेल्या तरतूदी लागू राहणार नाहीत.
३ शिक्षण सेवकाच्या नियुक्तीचा कालावधीः विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक/ ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठीच्या निवासी आश्रमशाळा तसेच विद्यानिकेतन विजाभज आश्रमशाळांमधील नियुक्त शिक्षण सेवकांचा परिविक्षाधीन कालावधी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संदर्भाधिन दिनांक २७.०२.२००३ तसेच दिनांक १३.१०.२००० च्या शासन निर्णयातील तरतुदींनुसार सर्वसाधारणपणे तीन वर्ष राहील.
४ नियुक्तीचे माध्यम : शिक्षण सेवक पदासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेनुसार उमेदवाराने ज्या माध्यमासाठी अर्ज केला असेल, त्या माध्यमासाठीच्याच पदावर नियुक्ती देण्यात येईल.
५. शिक्षण सेवकाची वयोमर्यादा शिक्षण सेवक पदी किमान वयोमर्यादा १८ वर्ष व कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरीता ३८ वर्ष व मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता ४३ वर्ष राहील, समांतर आरक्षण व दिव्यांग उमेदवारांना शासनाने विहित केलेली वयोमर्यादा लागू राहील. वयोमर्यादेबाबत शासन वेळोवेळी विहित करील अशी वयोमर्यादा शिक्षण सेवकांना लागू होईल,
६. शिक्षण सेवक भरती “पवित्र” प्रणालीव्दारे न करणाऱ्या शैक्षणिक संस्थांना शाळांना संबंधित रिक्त पदांचे वेतन किवा वेतनेतर अनुदान अनुज्ञेय होणार नाही.
७. अल्पसंख्याक संस्था संचलित आश्रमशाळांमधील शिक्षण सेवक भरती आणि अनुकंपा तत्वावर नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षण सेवक भरतीस “पवित्र” प्रणालीमार्फत नियुक्ती प्रक्रिया लागू राहणार नाही.
८. विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक/ ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठीच्या निवासी आश्रमशाळा तसेच विद्यानिकेतन विजाभज आश्रमशाळांमधील शिक्षक निवडीसाठी पवित्र (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) ही संगणकीय प्रणाली
राबविण्याच्या अनुषंगाने संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे हे “नोडल अधिकारी” म्हणून काम पहातील व त्यानुषंगाने ते शिक्षण आयुक्त / शिक्षण संचालक, पुणे यांच्याशी समन्वय साधून यासंदर्भातील सर्व कामकाज पाहतील. त्यानुषंगाने संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांनी राज्यातील सर्व संबंधित विजाभज आश्रमशाळा/संस्था, सर्व सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण व सर्व प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण (प्रादेशिक) विभाग यांना आवश्यकतेनुसार स्वतंत्र Login (User) name, Password) देणेबाबत कार्यवाही करावी.
९. विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक/ ऊसतोड कामगारांच्या मुलामुलीसाठीच्या निवासी आश्रमशाळा तसेच विद्यानिकेतन विजाभज आश्रमशाळांमधील शिक्षक निवडीसाठी पवित्र (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीची अंमलबजावणी करणे. तसेच, सदर प्रणाली राबविण्याच्या अनुषंगाने वरील मार्गदर्शक सूचना/ पारदर्शक कार्यपध्दतीप्रमाणे संबंधित क्षेत्रिय कार्यालयांनी कार्यवाही करावी.
१०. शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत शिक्षक निवडीसाठी ‘पवित्र’ (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीसंदर्भात, भविष्यात वेळोवेळी निर्गमित करण्यात येणारे शासन निर्णय/तरतुदी/सुधारणा या विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक/ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठीच्या निवासी आश्रमशाळा तसेच विद्यानिकेतन विजाभज आश्रमशाळांमधील शिक्षक निवडीसाठी लागू राहतील.
सदरहू शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून प्राप्त अभिप्राय/सहमतीस अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.
११. सदरहू शासन निर्णय, महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेताक २०२५१२०३१८०९१७८७३४ असा आहे. सदर शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल याच्या आदेशानुसार व नावाने,
सह सचिव, महाराष्ट्र शासन
