Organizing PLC Training For Teachers Online Blended Course Under STARS Project
Organizing PLC Training For Teachers Online Blended Course Under STARS Project
Regarding organizing PLC training for teachers who have done Online Blended Mode Course under STARS Project…
जा.क्र. राशेसंप्रपम/संशोधन / ब्लेडेड मोड प्रशिक्षण/२०२४-२५/००६११
दि.२९/०१/२०२५
प्रति,
१) उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई.
२) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (सर्व)
विषय :- स्टार्स प्रकल्प अंतर्गत ऑनलाईन ब्लेंडेड कोर्स केलेल्या शिक्षकांसाठी PLC प्रशिक्षण आयोजित करणे बाबत…
संदर्भ : १. स्टार्स प्रकल्प अंतर्गत संशोधन विभागाचे वार्षिक अंदाजपत्रक व कार्य योजना २०२४-२५
२. स्टार्स प्रकल्प PAB मंजूर मिनिट्स सन २०२४-२५
३. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र क्र.जा.क्र. राशैसंवप्रपम/संशोधन/ब्लेंडेड मोड प्रशिक्षण/२०२३-२४/०१४९८ दि.२१/०३/२०२४
४. स्टार्स प्रकल्प अंबलबजावणी बैठकीतील मा. संचालकांचे निर्देश दि.०३/०५/२०२४
५. प्रस्तुत कार्यालयाचे प्रश्न निर्मिती पत्र क्र.जा.क्र.राशैसंवप्रपम/संशोधन/ब्लेंडेड मोड प्रशिक्षण/२०२४-२५/०२४६१ दि.१५/०५/२०२४
६. प्रस्तुत कार्यालयाचे प्रश्न निर्मिती पत्र क्र.जा.क्र.राशैसंवप्रपम/संशोधन/ब्लेंडेड मोड प्रशिक्षण/२०२४-२५/०४८४५ दि.०९/१०/२०२४
उपरोक्त संदर्भीय विषयानुसार कळविण्यात येते की, सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात स्टार्स प्रकल्पांतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या गरजाधिष्टीत प्रशिक्षणासाठी एकूण २० विषयांबर Online /Blended कोर्स विकसित करण्यात आलेले आहेत. सन २०२४-२५ मध्ये स्टार्स प्रकल्पांतर्गत विभागाच्या वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक मधील मंजूर उपक्रमात सदर उपक्रमाचा समावेश आहे. स्टार्स प्रकल्पातील SIG ३ मधील तरतुदींची पूर्तता होणेसाठी राज्यातील २० जिल्ह्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्या सहकार्याने सदर कोर्स विकसित करण्यात आलेले आहेत.
प्रस्तुत उपक्रमाच्या पूर्ततेसाठी संदर्भ क्र.६ नुसार दि.११.१०.२०२४ ते १०.१२.२०२४ या कालावधीत राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी दीक्षा पोर्टलवर ऑनलाईन कोर्स उपलब्ध करून देण्यात आलेले होते. कोर्सच्या अटीप्रमाणे ऑनलाईन कोर्स केलेल्या पात्र शिक्षकांचे PLC प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. ब्लेंडेड ऑनलाईन कोर्स केलेल्या शिक्षकांची जिल्हानिहाय संख्या सोबत जोडलेल्या तक्त्यात देण्यात आली असून शिक्षक संख्येप्रमाणे निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सोबत दिलेल्या यादीतील शिक्षकांचे PLC प्रशिक्षण माहिती पत्रकात दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे पूर्ण करून घेण्यात यावे.
राज्यस्तरीय प्रशिक्षकांच्या माध्यमातून राज्यस्तरावर प्रत्येक जिल्ह्यासाठी प्राथमिक व माध्यमिक दोन्ही स्तरासाठी मराठी १, गणित १, इंग्रजी १, विज्ञान १ व सामाजिक शास्र १ असे ३६ जिल्ह्यासाठी प्रत्येकी ५ तज्ञ तयार करण्यात आलेले आहेत. याप्रमाणेच प्रत्येक BRC/URC स्तरावर PLC प्रशिक्षण घेण्यासाठी प्रत्येकी ५ तज्ञ तयार करण्यात आलेले आहेत.
प्रस्तुत PLC साठी प्रतिव्यक्ती प्रतिदिन ७५ रु. प्रमाणे मर्यादेत वित्तीय नियमानुसार खर्च करण्यात यावा. PLC प्रशिक्षणात झालेल्या खर्चाची पूर्तता प्रस्तुत कार्यालयाकडून करण्यात येईल.
या ओळीला स्पर्श करून परिपत्रक पीडीएफ मध्ये प्राप्त करा
03/02/25
(राहूल रेखा बार भाप्रसे)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र ७०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे
PLC प्रशिक्षण आयोजानाबत करावयाची कार्यवाहीगटसाधन केंद्र/शहरसाधन केंद्र (BRC /URC) स्तरावरील समन्वयकांची भूमिका व जबाबदारी :
1. राज्यस्तर/ जिल्हास्तरवरून प्राप्त झालेल्या ब्लेंडेड कोर्ससंदर्भातील पत्रांनुसार कार्यवाही करणे.
2. ब्लेंडेड कोर्ससाठी नोंदणी केलेल्या शिक्षकांचे विषयनिहाय यादी तयार करून कोर्सबाबत वेळोवेळी मार्गदर्शन, आढावा व सनियंत्रण करणे.
3. PLC वेळापत्रकाप्रमाणे संबंधित विषयाच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची PLC प्रशिक्षण पूर्ण करणे.
4. सदर ब्लेंडेड कोर्स संदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित झालेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे.
ब्लेंडेड कोर्स अंमलबजावणीमध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेची भूमिकाः
1. ब्लेंडेड कोर्स PLC प्रशिक्षणाचे जिल्ह्याने BRC चे नियोजन करावे. आणि संदर्भातील माहिती जिल्हास्तरावरून व्हाट्सअप, पत्र, ई-मेलद्वारे शिक्षकांपर्यंत प्रसारित करणे.
2. ब्लेंडेड कोर्स अंमलबजावणीसाठी वरिष्ठ अधिव्याख्याता/ अधिव्याख्याता यामधून एक अधिकारी समन्वयकम्हणून नेमून त्यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी सोपविणे.
3. ब्लेंडेड कोर्ससंदर्भातील राज्यस्तरावरून प्राप्त होणाऱ्या मार्गदर्शक सूचना, नियोजन BRC/URC पर्यंतपोहोचवणे.
4. ब्लेंडेड कोर्ससंदर्भात जिल्हास्तरीय आढावा मार्गदर्शन व सनियंत्रण करणे.
5. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमधील तालुका संपर्क अधिकारी यांच्यामार्फत प्रत्येक तालुक्यात पीएलसीचे नियोजन व आयोजन करणे.
6. तालुकास्तरीय पीएलसी भेटीसाठी नियोजन करणे.उक्त नमूद सर्व बाबीच्या अधीन राहून प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी राज्यस्तरावरून पुरवण्यात आलेल्या शिक्षकांच्या याद्या नुसार आपल्या जिल्ह्यातील शिक्षकांना PLC पूर्ण करणेसाठी योग्य समन्वय साधावा.
7. BRC/URC स्तरावर विषयनिहाय (मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र) प्रति १ याप्रमाणे एकूण ५ सुलभक तयार करण्यात आले आहेत.
8. प्रति विषय १ दिवस PLC प्रशिक्षण आयोजन करावे. पात्र शिक्षकांना PLC प्रशिक्षणासाठी आदेशित करण्यात यावे.
उक्त देण्यात आलेल्या संभाव्य वेळापत्रकात आपल्या स्थानिक परिस्थितीनुसार आवश्यक तो बदल करण्यात यावा.
तालुकास्तरावर PLC घेण्यासाठी प्रति व्यक्ती ७५ रुपये प्रमाणे निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामध्ये खालीलप्रमाणे खर्च करणे अपेक्षित आहे.
१) प्रमाणपत्र – राज्यस्तरावरून पुरवण्यात आलेल्या सॉफ्ट कॉपी प्रमाणपत्राची प्रिंट करून ऑनलाईन ब्लेंडेड कोर्स व PLC प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांना देण्यात यावे.
२) एक दिवशीय PLC प्रशिक्षण आयोजनाचा खर्च स्टेशनरी, प्रशिक्षणार्थी यांचा चहा व अल्पोपहार.
३) सदरची यादी व शिक्षक संख्या राज्याला पाठवण्यात यावी. प्रशिक्षण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तात्काळ समायोजन करून उपयोगिता प्रमाणपत्र researchdept@maa.ac.in या मेल आयडीवर मेल करण्यात यावे.