NMMS EXAM UPDATE
NMMS EXAM UPDATE
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
राज्य परीक्षा परिषद, पुणे
परीक्षा प्राधान्य ई-मेल
जा.क्र.मरापप/NMMS/२०२६-२७/दि. २४/०८/२०२६
प्रति,
१. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद(सर्व)
२. शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई (दक्षिण/पश्चिम/उत्तर विभाग)
विषयः- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) सन २०२६-२७ E.O / E.I रजिस्ट्रेशन करणेबाबत.
उपरोक्त विषयान्वये सन २०२६-२७ साठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) दि. २० डिसेंबर २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. परिषदेच्या
https://nmmsmsce.in
या संकेतस्थळावर शिक्षणाधिकारी (माध्य.) / शिक्षण निरीक्षक यांना ऑनलाईन E.O / E.I. लॉगीन उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. सदरच्या E.O / E.I. Dashbord वरुन आपल्या जिल्ह्यातील किती शाळांनी नोंदणी केली आहे तसेच किती विद्यार्थ्यांचे आवेदनपत्रे भरले आहेत याची तालुकानिहाय माहिती दिसत आहे. तरी सदर परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्रे सुरु होण्यापूर्वी दि. २७/०८/२०२६ पर्यंत E.O / E.I. रजिस्ट्रेशन ऑनलाईन करुन घेण्यात यावे. (E.O / E.I. Login ID व Password आपल्या कार्यालयाच्या ईमेलवर पाठविण्यात आलेला आहे.)
E.O / E.I. रजिस्ट्रेशन करताना बँक खात्याची माहिती या रकान्यात कार्यालयाचे बँक खात्याची माहिती भरणे अनिवार्य आहे. वैयक्तीक बँकेची माहिती देऊ नये.
Digitally signed by Mahesh Jagannath Chothe
Date: 25-08-2026
11:17:02
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-४.
