Haushi Marathi Hindi Sangit Sanskrut Divyanga Balnatya Spardha Niyamavalit Sudharna
Haushi Marathi Hindi Sangit Sanskrut Divyanga Balnatya Spardha Niyamavalit Sudharna
maharashtra rajya haushi marathi, haushi hindi, haushi sangit, haushi sanskrut, balnatya v divyanga balnatya spardha niyamavalit sudharna
Amendments to the Maharashtra State Amateur Marathi, Amateur Hindi, Amateur Music, Amateur Sanskrit, Children’s Drama and Disabled Children’s Drama Competition Rules
महाराष्ट्र राज्य हौशी मराठी, हौशी हिंदी, हौशी संगीत, हौशी संस्कृत, बालनाट्य व दिव्यांग बालनाट्य स्पर्धा नियमावलीत सुधारणा करणेबाबत.
महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण ८२२६/प्र.क्र.३३७(ई.नं.१७७९२६१)/सां.का.४,मंत्रालय, मुंबई
दिनांक: २५ ऑगस्ट, २०२६
वाचा :-
१) समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व पर्यटन विभाग, शासन निर्णय क्र. एनटीएम-१०९२/१९४५/प्र.क्र.११/सां. का.१, दिनांक २६ ऑगस्ट, १९९२.
२) सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. बानास्प-२००२/प्र.क्र.८४/सां.का. १, दिनांक १७ ऑगस्ट, २००२.
३) पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, शासन निर्णय क्र. हौनास्प १९१८/प्र.क्र.२२६/सां.का.४, दिनांक ०२ जानेवारी, २०१९.
४) संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांचे पत्र क्र.सां.का.सं./३१७६, दिनांक २५ जून, २०२५.
प्रस्तावना :-
उपर्निर्दिष्ट क्र. १ येथील शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेची नियमावली करण्यात आली आहे. तसेच उपर्निर्दिष्ट क्र. २ येथील शासन निर्णयान्वये, बालनाट्य स्पर्धेची नियमावली करण्यात आली आहे. उपर्निर्दिष्ट क्र. ३ येथील शासन निर्णयान्वये, दिव्यांग बालनाट्य स्पर्धेची नियमावली करण्यात आली आहे.
राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील नाट्यसंस्थांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, स्थानिक कलाकारांना संधी मिळवून देणे. तसेच, नाट्यकलेचा दर्जा उंचावणे या उद्देशाने तसेच कालानुरूप नाट्य क्षेत्रामध्ये झालेल्या बदलांचा आणि विविध नाट्यसंस्था व कलाकारांकडून प्राप्त झालेल्या सूचनांचा विचार करता काही नियमांमध्ये सुधारणा करण्याची विनंती संचालनालयाने त्यांच्या उक्त पत्रान्वये केली आहे. सबब, सदर नियमावलीत सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
शासनाच्या “राज्य नाट्य महोत्सव” अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या हौशी मराठी, हिंदी, संस्कृत, संगीत, बालनाट्य आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धेतील संदर्भ क्र. १ मधील नियम क्र. १ (ड) मध्ये खालील प्रमाणे सुधारणा करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे –
नियम क्र. १ (ड) :
“महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेसाठी सुचविण्यात आलेल्या नाटकात काम करणारे सर्व कलाकार हौशी असले पाहिजेत व ते सर्व त्या संस्थेचे अधिकृत सभासद असले पाहिजेत. स्पर्धेत सहभागी होणारे सर्व कलाकार संबंधित जिल्ह्याचे स्थानिक
रहिवासी असावेत. त्यासाठी आधार कार्ड किंवा शासनमान्य निवासी पुरावा अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील. जर एखादा कलाकार संबंधित जिल्ह्याचा कायमस्वरूपी रहिवासी नसेल, परंतु तो त्या जिल्ह्यात नोकरी किंवा शिक्षणाच्या निमित्ताने वास्तव्यास असेल, तरच त्यास स्थानिक कलाकार म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. अशा परिस्थितीत संबंधित नोकरी किंवा शिक्षणाचा अधिकृत व सबळ पुरावा अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील.”
०२. सदर शासन निर्णयान्वये करण्यात आलेली सुधारणा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षापासून लागू करण्यात येत आहे.
०३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२६०८२५१७०८४८१९४३ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन