पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपध्दतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत Necessary improvements in process of teacher recruitment Pavitra portal

Necessary improvements in process of teacher recruitment Pavitra portal

Necessary improvements in process of teacher recruitment Pavitra portal

Necessary improvements in process of teacher recruitment through Pavitra portal.

Regarding necessary improvements in the process of teacher recruitment through the Pavitra portal.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Join Now

पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपध्दतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण- २०२५/प्र.क्र. ९३३ (१)/टीएनटी-१

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-४०००३२

दिनांक: २० जानेवारी, २०२६.

वाचा :

१. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. पीआरई-१७१३/(८६/१३)/प्राशि-५, दि. १९.०६.२०१३.

२. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. सीईटी-२०१५/प्र.क्र. १४९/टीएनटी-१, दि. ०७.०२.२०१९.

३. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. संकीर्ण-२०२२/प्र.क्र. १०६/टीएनटी-१, दि. १०.११.२०२२.

४. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र. ५०९/टीएनटी-१, दि. १३.१०.२०२३.

प्रस्तावना :

पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीची कार्यपध्दती संदर्भ क्र. १ ते ४ येथील शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेली आहे. यातील बहुतांशी तरतूदी पदभरतीची प्रक्रिया अधिकाधिक सुलभ व पारदर्शक पध्दतीने पार पाडावी या हेतूने करण्यात आल्या होत्या. तथापि, काही तरतुदींमुळे पदभरतीच्या प्रक्रियेत अनावश्यक गुंतागुंत निर्माण झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब विचारात घेऊन संबंधित काही तरतूदी अधिक्रमित करुन सुधारित तरतूदी लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :

खालील तक्त्यात दर्शविण्यात आल्याप्रमाणे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपध्दतीशी संबंधित तरतूदी अधिक्रमित करण्यास व त्याऐवजी सुधारित तरतूदी लागू करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

अ.क्र.

संबंधित निर्णय

शासन

अधिक्रमित विद्यमान तरतूद

करावयाची लागू करावयाची सुधारित तरतूद

१. शासन निर्णय, दि. १३.१०.२०२३ मधील परिच्छेद क्र.२

विविध टप्प्यांमध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी

उमेदवाराचे चालू चाचणी परीक्षेतील गुण मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी मिळून केवळ एक वेळ निवडीच्या शिफारशीसाठीच लागू राहतील. उमेदवारास निवड प्रक्रियेत पुन्हा सहभागी व्हावयाचे असल्यास त्यास नव्याने चाचणी परीक्षा यावी लागेल..

याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदांसाठी पात्र राहील. उमेदवारास पुर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करावयाचा झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल.

२. शासन निर्णय, दि. ०७.०२.२०१९ मधील परिच्छेद ५.७ १०.११.२०२२ निर्णय, ३. शासन दि मधील परिच्छेद ३.१

व इच्छुक अर्हताप्राप्त उमेदवार जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून आपल्या अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणीमध्ये पात्र गुणांसह पवित्र प्रणालीवर ऑनलाईन सात दिवसाच्या आत अर्ज करतील, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थामधील व खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदासाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम देतील. उमेदवार अर्जामध्ये प्रवर्ग व विषय यांचा विचार करुन प्राधान्यक्रम देऊ शकतील. उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील असलेल्या सर्व रिक्त जागासाठी उपलब्ध रिक्त जागांसाठी पात्रतेनुसार प्राधान्यक्रम देता येतील.

व्यवस्थापनाने शिक्षक पदभरतीसाठी प्रसिध्द जाहिरातीच्या असलेले केलेल्या दिनांकास

इच्छुक व अहंताप्राप्त उमेदवार जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून आपल्या अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणीमध्ये पात्र गुणांसह पवित्र प्रणालीवर सुविधा दिलेल्या कालावधीत अर्ज करतील. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थामधील व खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदासाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम देतील. उमेदवार अर्जामध्ये प्रवर्ग व विषय यांचा विचार करुन प्राधान्यक्रम देऊ शकतील.

त्यांच्या उमेदवारांना अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या दोन्हीं प्रकारासाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. तथापि, उमेदवारास त्याच्या सोईनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण ५० प्राधान्यक्रम लॉक करता येतील. सदर मर्यादा निवडीच्या दोन्ही

प्रकारांसाठी स्वतंत्रपणे असेल. पदभरती ज्या शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी मधील प्राप्त गुणांच्या आधारे करण्यात येत आहे, त्या चाचणीसाठी अर्ज करण्याच्या उमेदवाराचे वय विचारात घेण्यात येईल. तथापि, सन २०२२ मध्ये होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणीनुसार येणाऱ्या जाहिरातीसाठी उमेदवारांचे वय कोविड-१९ ध्या पार्श्वभूमीवर २ वर्षासाठी शिथिलक्षम करण्यात येत आहे.

शेवटच्या दिनांकास उमेदवाराच्या वयाची परिगणना करण्यात येईल.

४. शासन निर्णय, दि. १९.०६.२०१३ मधील परिच्छेद १ (३) बालकांचा मोफत व सक्तीच्या बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षकांकरीता (इ. १ ली ते ८ वी) शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक-आरटीई-२०१०/प्र.क्र. ५७२/प्राशि-१, दि. १३ फेब्रुवारी, २०१३ मधील तरतुदीनुसारच सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पध्दती अवलंबिणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील.

शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षकांकरीता (इ. १ ली ते ८ वी) शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक- आरटीई २०१०/प्र.क्र. ५७२/प्राशि-१. दि. १३ फेब्रुवारी, २०१३ मधील तरतुदीनुसारच सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पध्दती अवलंबिणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील. तसेच, संबंधित शाळेकरीता मंजूर शिक्षकांपैकी किमान एक शिक्षक इंग्रजी माध्यमातून शिक्षणशास्त्रातील पदविका (डी.टी.एड.) धारक असणे

इयत्ता १ ली ते ५ वी, इयत्ता ६ वी ८ वी व इयत्ता ९ वी १० वी या गटांसाठी त्या त्या माध्यमांच्या जसे की, मराठी, पूर्व, कन्नड इत्यादी विचारात घेऊन उमेदवारांनी शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली शाळांकरीता शिक्षक उपलब्ध करुन देतांना व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमांसह त्या त्या शाळांचे माध्यम आहे त्या माध्यमाच्या शाळेसाठी त्याची उमेदवारी विचारात घेण्यात यावी,आवश्यक राहील,
इयत्ता १ ली ते ५ वी या गटासाठी सेमी इंग्रजी विषयांकरीता व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्हता निश्चित करण्यात आली आहे. त्या त्या सामाजिक प्रवर्गासाठी असे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अशा रिक्त राहणाऱ्या पर्दासाठी नव्याने जाहिराती देऊन या उमेदवारासह ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केली नाही, मात्र १२ वी विज्ञान किंवा बी.ए./एम.ए. इंग्रजी किंवा बी. एस्सी/एम.एस्सी अशी अर्हता धारण केली आहे अशा उमेदवारांना पात्र समजण्यास मुभा देण्यात येत आहे.

२. उपरोक्त बदल है शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी-२०२५ नुसार करावयाच्या पदभरतीसंदर्भातील स्विकारण्यात येणाऱ्या सर्व टप्प्यातील जाहिरातींसाठी, तसेच त्यानंतर होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी नुसार करावयाच्या पदभरतीसाठी लागू राहतील.

  1. संदर्भ क्र. १ ते ४ येथील शासन निर्णयातील तरतूदी तसेच या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आलेल्या सुधारित तरतूदी ह्या पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरती करु इच्छिणाऱ्या अन्य प्रशासकीय विभागांच्या पदभरतीसाठी देखील लागू राहतील.

W. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर

उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेत्ताक २०२६०१२०१२३९०२९५२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

प्रत,

महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

शासन निर्णय पीडीएफ प्रत लिंक

उप सचिव, महाराष्ट्र शासन

पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपध्दतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत Necessary improvements in process of teacher recruitment Pavitra portal
पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपध्दतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत Necessary improvements in process of teacher recruitment Pavitra portal

पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपध्दतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण-२०२५/प्र.क्र. ९३३ (२)/टीएनटी-१ हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-४०००३२

दिनांक : २० जानेवारी, २०२६.

  शासन निर्णय :

खालील तक्त्यात दर्शविण्यात आल्याप्रमाणे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपध्दतीशी संबंधित काही अडचणी शासनाच्या निदर्शनास आल्या आहेत. या अडचणीच्या निवारणार्थ सुधारित तरतूदी लागू करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

अ.क्र. निदर्शनास आलेल्या अडचणी

१. मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारात संबंधित संस्थेकडे उमेदवारांची शिफारस केल्यानंतर उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी व पर्यायाने पुढील निवड प्रक्रियेसाठी जात नाहीत. परिणामी त्या संस्थेची पदे रिक्त राहत आहेत. काही नामांकित संस्थांच्या बाबतीत देखील असे प्रकार निदर्शनास आले आहेत.

सुधारित तरतूदी

।. मुलाखतीसह निवड प्रक्रियेत व्यवस्थापनांना १:३ या प्रमाणात उमेदवार उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यानुसार उमेदवारांची देखील त्यांनी लॉक केलेल्या प्राधान्यक्रमांपैकी गुणवत्तेनुसार जास्तीत जास्त ३ प्राधान्यक्रमावर शिफारस होईल.

iii. एखादया संस्थेस मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारात रिक्त जागांच्या प्रमाणात पर्याप्त उमेदवार उपलब्ध करुन दिल्यानंतर सदर निवड प्रक्रिया संबंधित संस्थेने शिफारस यादी प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून ४५ दिवसाच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे.

उपरोक्त प्रमाणे निवड प्रक्रिया राबविल्यानंतरही उपलब्ध उमेदवारांमधून पद भरणे शक्य नसल्यास अशी रिक्त पदे. त्या पदांचा गट, विषय, आरक्षण व अन्य तपशिलांसह पोर्टलवर सुविधा उपलब्ध झाल्यानंतर विहित केलेल्या कालावधीत नोंदविणे आवश्यक राहील.

iv. अशा रिक्त पदांसाठी ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम दिला आहे व ज्यांची कोणत्याही प्रकारात नियुक्तीसाठी निवड झालेली नाही

नियुक्ती नाकारण्याचे अथवा नियुक्ती प्रदिर्घ काळापर्यंत प्रलंबित ठेवण्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारात संस्थेने उमेदवाराची निवड केल्यानंतर संस्थांकडून उमेदवारास अशा उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार व विहित केलेल्या प्रमाणात पोर्टलमार्फत मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस करण्यात येईल.

२. उमेदवारास नियुक्ती नाकारण्याचे अथवा नियुक्ती प्रलंबित ठेवण्याचे प्रकार निदर्शनास आल्यास यथास्थिती संबंधित शिक्षणाधिकारी अथवा विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सदर पद दोन शैक्षणिक वर्षांसाठी व्यपगत करण्याची कार्यवाही करावी. मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारात संस्थेने उमेदवाराची निवड केल्यानंतर संस्थांकडून

२. उपरोक्त बदल है शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी-२०२५ नुसार करावयाच्या पदभरतीसंदर्भातील स्विकारण्यात येणाऱ्या सर्व टप्प्यातील जाहिरातींसाठी तसेच त्यानंतर होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी नुसार करावयाच्या पदभरतीसाठी लागू राहतील.

३ या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आलेल्या सुधारित तरतूदी ह्या पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरती करु इच्छिणाऱ्या अन्य प्रशासकीय विभागांच्या पदभरतीसाठी देखील लागू राहतील.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६०१२०१२४१४०८७२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

शासन निर्णय पीडीएफ प्रत लिंक

उप सचिव, महाराष्ट्र शासन

Leave a Comment

error: Content is protected !!