Navniyukt Shikshak Preran Prashikshan
Navniyukt Shikshak Preran Prashikshan
Navniyukt Shikshak Preran Karykram
Induction training for newly appointed teachers
Organizing an induction program for newly appointed teachers
Newly appointed teacher induction program TOT training
Samaveshan Prashikshan
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
जा.क्र. राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (SBTE) / २०२४-२५/दिनांक: ०३/१०/२०२५
प्रति,
उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व
विषय:- नवनियुक्त शिक्षकांचा समावेशन कार्यक्रम TOT
उपरोक्त विषयात नमूद केल्यानुसार नवनियुक्त शिक्षकांसाठी जिल्हास्तरावर ०७ दिवस (५० तासांचे प्रशिक्षण दिनांक २५.१०.२०२५ ते ३१.१०.२०२५ या कालावधीत आयोजित करावयाचे आहे
प्रशिक्षणासाठी मार्गदर्शक पुस्तिका विकसित करण्यात आली असून त्यासाठीचे TOT (ट्रेनिंग ऑफ टीचर्स करणे आवश्यक आहे. त्यासाठी एक दिवसीय online प्रशिक्षणाचे नियोजन दि.०८.१०.२०२५ रोजी करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यातून प्राचार्य, जे. अधिव्याख्याता अधिव्याख्याता तसेच तज्ञ व्यक्तींना पुढील वेळापत्रकानुसार पीपीटीच्या सहाय्याने माहिती सादरीकरणातून प्रशिक्षण दिले जाणार आहे. सदर प्रशिक्षणाची online link प्रशिक्षणाच्या आधी एक तास दिली जाईल,
प्रशिक्षण वेळापत्रक पीडीएफ प्रत लिंक
सहसंचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
नवनियुक्त शिक्षकांसाठी प्रेरण कार्यक्रमाचे आयोजन
नवनियुक्त शिक्षक प्रशिक्षण
SBTE
- नवनियुक्त शिक्षक सुलभक प्रशिक्षण
राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020 मधील मुद्दा क्रमांक 5.15 ते 5.21 मध्ये नवनियुक्त शिक्षकांसाठी प्रेरण कार्यक्रमाचे आयोजन करणे अपेक्षित आहे. सर्व जिल्हयातील नवनियुक्त शिक्षकांसाठी जिल्हास्तरावर 07 दिवस (50 तासांचे) प्रशिक्षण दिवाळीच्या सुट्टीच्या कालावधीत दिनांक 25.10.2025 ते 31.10.2025 या कालावधीत सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.30 या वेळेत येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
राज्यस्तर ऑनलाईन TOT साठी सकाळी 10.00 ते 5.30 वाजेपर्यंत Online प्रशिक्षण
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
जा.क्र. राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (SBTE)/२०२४-२५/
दिनांक : ०३/१०/२०२५
विषय :- नवनियुक्त शिक्षकांसाठी समावेशन कार्यक्रम ( Induction Program) अंतर्गत प्रशिक्षणाबाबत…
१) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र राप्रधो४२१५/ (३८/१५)/ प्रशिक्षण दिनांक २४ जुलै २०१७
संदर्भ:
२) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्रमांक राप्रघो४२१५/ (३८/१५)/ प्रशिक्षण दिनांक २४ ऑगस्ट २०१७
उपरोक्त विषयांन्वये आपल्या जिल्ह्यातील नवनियुक्त शिक्षकांसाठी जिल्हास्तरावर ०७ दिवस (५० तासांचे) प्रशिक्षण दिनांक २५.१०.२०२५ ते ३१.१०.२०२५ या कालावधीत आयोजित करावयाचे आहे.
जिल्हास्तरावरील सूचना पुढीलप्रमाणे
१) इयत्ता १ली ते ८वी व इयत्ता ९ वी ते १२ वी साठी नवनियुक्त शिक्षकांचे ०७ दिवसांचे प्रशिक्षण सोबत दिलेल्या वेळापत्रक व प्रशिक्षण घटकसंचाप्रमाणे आयोजित करण्यात यावे.
२) पहिले ६ दिवस इयत्ता १ ते ८ व इयत्ता ९ ते १२ वी ला शिकविणा-या शिक्षकांचे समान घटकांचे एकत्रित प्रशिक्षण घ्यावयाचे
आहे. सातवा दिवस हा स्वतंत्र घटकांसाठी असेल.
३) वेळापत्रकांची Soft Copy या पत्रासोबत पाठविण्यात येत आहे.
४) प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शक पुस्तिका उपलब्ध करून देण्यात यावी, त्याचप्रमाणे प्रशिक्षणाचे नियोजन करावे.
५) आपल्या स्तरावर वर्ग संख्येनुसार आवश्यक सुलभकांची निवड करावी व त्यांना प्रशिक्षण घटकसंचातील समाविष्ट घटकांची माहिती करून द्यावी,
६) सुलभकांना संदर्भ साहित्याचे वाचन करण्यास सांगावे.
७) सदर प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपात द्यावयाचे असून सलग ०७ दिवसांचे राहील, प्रशिक्षण कालावधीत कोणत्याही प्रकारची रजा अनुज्ञेय राहणार नाही.
८) राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्था शाळांतील सर्व नवनियुक्त शिक्षकांना हे प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य राहील,
९) आपल्या जिल्ह्यातील आपण कळविलेल्या नवनियुक्त शिक्षकांच्या संख्येनुसार १००% नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण होईल याची जबाबदारी संबंधित जिल्ह्यातील प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांची राहील. त्याअनुषंगाने आवश्यक ते समन्वय ठेवून यादी प्राप्त करून घ्यावी.
१०) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राचार्य यांच्याकडून नवनियुक्त शिक्षकांची मागणी वेळोवेळी घेण्यात आलेली आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राचार्य यांनी कळविलेल्या नवनियुक्त शिक्षकांच्या संख्येच्या मागणीप्रमाणे मार्गदर्शक पुस्तिका SCERT मार्फत संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतील.
११) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दिनांक २४ जुलै २०१७ व दिनांक २४ ऑगस्ट २०१७ अन्वये शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील राज्यस्तर ते तालुकास्तर प्रशिक्षणासाठी सुलभकांचे मानधन खर्च करावा.
१२) सदर प्रशिक्षणासाठी होणाऱ्या खर्चात दोन वेळचा चहा, कर्तव्य भोजन याचा समावेश करता येईल. सदरचा खर्च समग्र TE
Program Activity या लेखाशीर्षांखाली भागविण्यात यावा.
१३) प्रशिक्षणार्थ्यांसाठी पुढीलप्रमाणे खर्च करावा.
- एकदाच एक नोट पॅड व पेन ३०/-
- कर्तव्य भोजन १००/-
- दोन वेळेचा चहा २०/-
- सुलभक मानधन ५०००३ १५००/- (प्रती वर्ग ३ सुलभक) संलग्न – वेळापत्रक वेळापत्रक पीडीएफ लिंक
परिपत्रक वेळापत्रक पीडीएफ प्रत लिंक
सहसंचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण
परिषद, महाराष्ट्र, पुणे