नवीन अभ्यासक्रमानुसार सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी मूल्यमापन कार्यपद्धती बाबत Navin Abhyaskram Mulyamapan

Navin Abhyaskram Mulyamapan

Navin Abhyaskram Mulyamapan

Navin Abhyaskram Shaikshanik Mulyamapan Karyapaddhati

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

navin abhyaskramanusar san 2026-27 ya shaikshanik varshasathi mulyamapan karyapaddhatee babat.

जा.क्र. E:/मूल्यमापन/२०२६/

दिनांक- स्वाक्षरीमध्ये नमुद

    परिपत्रक

विषय- नवीन अभ्यासक्रमानुसार सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी मूल्यमापन कार्यपद्धती बाबत.

संदर्भ-

१. शासन निर्णय क्रमांक: पीआरई/२०१०/(१३६/१०)/प्राशि-५ दिनांकः २०/०८/२०१०

२. शासन निर्णय आरटीई-२०२२/प्र.क्र. २७६/एस.डी-१ दिनांक- ०७/१२/२०२३.

३. या कार्यालयाकडील परिपत्रक जा.क्र. राशैसंप्रपम/अविवि/FS/१२९२६९९/२०२५ दि. ०२/०७/२०२५

४. शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण- २०२५/प्र.क्र.९४/एस.डी.-४ दि.१४/०७/२०२५

५. या कार्यालयाकडील परिपत्रक जा.क्र. E:१९३७८७३/अविवि/SE/२०२६ दिनांक- १२/०६/२०२६

उपरोक्त संदर्भ क्र.४ नुसार सन २०२५-२६ पासून राज्यात नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. त्यानुसार सन २०२५-२६ पासून इ.१ली आणि सन २०२६-२७ पासून इ.२री, श्री, ४थी व इ.६वी इयत्तांसाठी नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात आलेला आहे. संदर्भ क्र.३ व ५ येथील परिपत्रकांद्वारे राज्यातील इ.१ ली ते ८वी शाळांसाठी विषय निहाय तासिका विभागणी व शालेय वेळेचे नियोजन विहित करुन देण्यात आलेले आहे.

नवीन अभ्यासक्रमानुसार विषय निहाय पाठ्यपुस्तके बालभारती मार्फत पुरविण्यात आलेली आहेत. इ.१ली, २री कलाशिक्षण, आरोग्य व शारीरिक शिक्षण, कार्यशिक्षण या विषयांसाठी “खेळू करु शिकू” शिक्षक हस्तपुस्तिका SCERT मार्फत पुरविण्यात आलेली आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार काही विषय नव्याने सुरु झालले आहेत तसेच काही विषयांच्या नावांमध्ये बदल झालेला आहे.

संदर्भ क्र.१ अन्वये सन २०१०-११ या शैक्षणिक वर्षापासून इ. १ली ते ८वी साठी सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन (CCE) कार्यपद्धती लागू करण्यात आलेली आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार बदललेल्या विषयरचनेच्या अनुषंगाने सन. २०२६-२७ साठी इ.१ली ते ८वी मूल्यमापनाबाबत पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

१. नवीन अभ्यासक्रमानुसार, नावांमध्ये बदल न झालेल्या तसेच जुना अभ्यासक्रम लागू असलेल्या शालेय विषयांसाठी संदर्भ क्र.१ अन्वये विहित करण्यात आलेली मूल्यमापन पद्धती लागू राहील.

२. नवीन अभ्यासक्रमानुसार काही विषर्याच्या नावात बदल झालेला असला तरी, बदललेल्या नावांसह पूर्वीच्या विषयांस लागू असलेली (आकारिक व संकलित) मूल्यमापन पद्धती संदर्भ क्र.१ अन्वये विहित केल्याप्रमाणे लागू राहील. जसे- परिसर अभ्यास-१ व २ या पूर्वाश्रमीच्या विषयांप्रमाणे, आपल्या सभोवतालचे जग-१ व २ या विषयांसाठी इ. श्री, ४थी साठी- आकारिक ६०% व संकलित ४०% आणि इ.५वी साठी आकारिक ५०% व संकलित ५०% मूल्यमापन पद्धती लागू राहील.

३. इतर माध्यमातील अनिवार्य मराठी विषयाची मूल्यमापन प्रक्रिया प्रचलित पद्धतीप्रमाणे सुरु राहील.

४. इ.५वी व इ.८ वी साठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती संदर्भ क्र. २ च्या शासन निर्णयानुसार निश्चित केल्याप्रमाणे लागू राहील.

५. कार्यानुभव हा विषय यापुढे कार्यशिक्षण या नावाने ओळखला जाणार असून तो इ.५वी पर्यंत असणार आहे. त्यामुळे संदर्भ क्र.१ अन्वये कार्यानुभव विषयासाठी विहित केलेली (आकारिक १००%) मूल्यमापन पद्धती कार्यशिक्षण विषयासाठी लागू राहील.

६. इ.६वी पासून व्यावसायिक शिक्षण हा विषय नव्याने सुरु करण्यात आला आहे. सदर विषयासाठी संदर्भ क्र.१ अन्वये कार्यानुभव विषयांसाठी विहित केलेली (आकारिक १००%) मूल्यमापन पद्धती व्यावसायिक शिक्षण विषयासाठीही लागू राहील.

७. सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन प्रक्रियेमधील समग्र प्रगती पत्रक (HPC) हा एक भाग असून सद्यस्थितीत पथदर्शी स्वरूपात त्याची अंमलबजावणी राज्यातील काही शाळांमध्ये सुरू आहे. त्या शाळांनीही संदर्भ क्र.१ नुसार मूल्यमापन विषयक कार्यवाही करावी. समग्र प्रगती पत्रक (HPC) च्या सार्वत्रिक अंमलबजावणीबाबत यथावकाश सूचना देण्यात येतील,

८. सदर परिपत्रकातील सूचना शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी देण्यात येत आहेत.

 सोबतः कलाशिक्षण व व्यावसायिक शिक्षण बाबतच्या सूचना.

Digitally signed by Mangesh Hiraman Joshi Date: 26-10-2026 20:09:55 (मंगेश जोशी) संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

कलाशिक्षण मूल्यमापन (२०२६-२७)

कलाशिक्षण मूल्यमापन (२०२६-२७)

कला शिक्षणामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत दृश्यकला आणि प्रायोगिक कला यांच्या एकात्मिक दृष्टिकोनानुसार चार प्रमुख कलागटांचा (दृश्यकला, रंगमंच, संगीत, नृत्य व हालचाल) समावेश आहे.

शैक्षणिक सत्र २०२६-२७ पासून इयत्ता तिसरी, चौथी आणि सहावीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू झाल्यामुळे, कला शिक्षण विषयाच्या आकारिक मूल्यमापनासाठी CCE संदर्भातील २०१० च्या शासन निर्णयातील आठ साधन-तंत्रापैकी किमान पाच साधन तंत्रे वापरण्यात यावी.

कलाशिक्षण विषयाचे मूल्यांकन करताना प्रात्यक्षिकातंर्गत कलेचे ‘सादरीकरण’ या साधन तंत्राचा वापर करण्यात यावा. तसेच लेखी चाचणी’ या साधनाचा वापर करण्यात यावा.

कलाशिक्षण या विषयाचे मूल्यमापन करताना सादरीकरण व लेखी चाचणी या साधनाचा वापर करणे अनिवार्य आहे.

सादरीकरण (Presentation) प्रत्यक्ष कलाविष्कार, अभिव्यक्ती, सादरीकरण कौशल्य, सर्जनशीलता, साधनांचा प्रभावी वापर आणि आत्मविश्वास,

स्पष्टीकरण व मूल्यमापनाचे स्वरूप :

कला शिक्षणात विद्यार्थी केवळ कागदावर चित्र काढण्यापुरता मर्यादित नसून तो विविध कलाकृतींचे व कलागुणांचे प्रत्यक्ष प्रदर्शन किंवा सादरीकरण करतो. विद्यार्थ्यांनी दृश्यकला आणि सादरीकरण कला (रंगमंच, संगीत, नृत्य व हालचाल) या कला गटांतर्गत केलेल्या प्रात्यक्षिक कृर्तीचे आणि कलाविष्काराचे प्रत्यक्ष सादरीकरण. यात विद्यार्थ्यांची कल्पकता, कलाकृती सादर करण्याची पद्धत, साहित्याची योग्य निवड, सादरीकरणातील लय-ताल, आत्मविश्वास, आणि सादरीकरणानंतरच्या चर्चेत सहभाग या निकषांच्या आधारे कौशल्याधारित गुणांकन व श्रेणीदान करणे.

लेखी चाचणी कलेचा सैद्धांतिक व वैचारिक आशय, रंग व साधन साहित्याची ओळख, लोककलांची माहिती, उपयोजन आणि रसग्रहण.

स्पष्टीकरण व मूल्यमापन स्वरूप :

कला शिक्षण विषयाची ‘लेखी चाचणी ही विद्यार्थ्यांची कलाविषयक सैद्धांतिक समज, निरीक्षण शक्ती, सौंदर्यदृष्टी आणि बौद्धिक पातळी तपासण्यासाठी घेतली जाणारी चाचणी आहे. यामध्ये चारही कलागटांच्या (दृश्यकला, रंगमंच, संगीत, नृत्य व हालचाल) सैद्धांतिक व वैचारिक आशयाचा अंतर्भाव असावा. विद्यार्थ्यांची कलाविषयक संकल्पनांची समज व लोककलांची माहिती, रंगांची व साधन साहित्याची ओळख इत्यादी मुद्द्यांवर आधारित लेखी चाचणी घेऊन विद्यार्थ्यांच्या कलाविषयक सैद्धांतिक ज्ञानाचे व आकलन क्षमतेचे लिखित स्वरूपात मूल्यमापन करावे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

इयत्ता ६ वी व्यवसायिक शिक्षण: शिक्षकांसाठी मूल्यमापन अंमलबजावणी मार्गदर्शक सूचना

१. प्रस्तावना, उद्देश व मूल्यमापनाची प्रमुख तत्त्वे

व्यावसायिक शिक्षणाचे मूल्यमापन विद्याथ्यांचे ज्ञान, प्रत्यक्ष कौशल्ये, सुरक्षितता, सहकार्य, जबाबदारी, सर्जनशीलता, समस्या सोडवण्याची क्षमता, कामाशी संबंधित मूल्ये आणि श्रमप्रतिष्ठेची जाणीव पांचा सर्वांगीण आढावा घेणारे असावे. केवळ अंतिम उत्पादन नव्हे, तर कामाची प्रक्रिया, प्रपन, निर्णय, निरीक्षणे

आणि सुधारणा यांचेही मूल्यमापन करावे.

प्रत्येक मूल्यमापन कृती अभ्यासक्रमातील अपेक्षित क्षमता, अध्ययन निष्पत्ती आणि अभ्यासक्रम ध्येयांशी जोडलेली असावी

लेखी चाचणीबरोबर उपक्रम पुस्तिका, प्रकल्प, प्रात्यक्षिक, क्षेत्रभेट, मौखिक प्रश्नोत्तरे, सादरीकरण, आणि संचिका पांचा संतुलित वापर करावा. विद्याथ्यनि काम कसे केले, कोणती साधने निवडली, सुरक्षिततेचे नियम पाळले का, अडचणी कशा सोडवल्या आणि अनुभवातून काप शिकले याची नोंद घ्यावी.

गुणांकनाचे निकष/रुब्रिक विद्यार्थ्यांना आधी सांगावेत आणि सर्वांसाठी समान रीतीने वापरावेत.

विद्यार्थ्यांची भाषिक, सामाजिक, आर्थिक, दिव्यांगत्वाशी संबंधित आणि साधनसामग्रीतील भिन्त्रता लक्षात घेऊन समावेशक संधी द्याव्यात, मात्र अपेक्षित

कौशल्याचे निकष स्पष्ट ठेवावेत.

२. मूल्यमापनाची रचना व गुणभारांश

राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार मूल्यमापन करताना प्रात्यक्षिक साठी ७५% व लेखी साठी २५% असा भारांश विचारात घ्यावा, आणि सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनासंबंधी शासन निर्णय दिनांक २० ऑगस्ट २०१० चे अवलोकन करावे.

Leave a Comment

error: Content is protected !!