Mukhymantri Bal Aashirwad Yojana
Mukhymantri Bal Aashirwad Yojana
Mukhymantri Bal Aashirwad Yojana sampurn mahiti
mukhymantri Bal Seva Yojana
Mukhymantri Bal Aashirwad Yojana
मुख्यमंत्री बाल आशिर्वाद योजना बाल सेवा योजनेअंतर्गत प्रत्येकी ४००० दरमहा मिळणार आहेत हा मेसेज खोटा आहे
मार्च २०२० नंतर ज्या मुलांचे दोन्ही पालक किंवा दोघांपैकी एक पालक मयत झाला, त्या कुटुंबातील १८ वर्षांखालील मुलास मुख्यमंत्री बाल आशिर्वाद योजनेअंतर्गत दरमहा चार हजार रुपये मिळणार आहेत. त्याचे अर्ज प्रत्येक तहसील कार्यालयात उपलब्ध असल्याचा मेसेज मागील आठ दिवसांपासून सोशल मिडियावर प्रसारित केला जात आहे. मात्र, अशी कोणतीही शासनाची योजना नसून कोणीही त्या अफवेला बळी पडू नये, असे आवाहन महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी केले आहे.
राज्य सरकारने ज्या मुलांचे (१८ वर्षांखालील) दोन्ही पालक किंवा घरातील कर्ता पालक मयत झाला आहे, त्यांच्यासाठी बालसंगोपन योजना सुरु केली आहे. त्यातून त्या मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत दरमहा दोन हजार २५० रुपये दिले जातात. त्यासाठी कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची अट अडीच लाखांपर्यंत आहे. या योजनेसाठीच शासनाकडून वेळेत व पुरेसा निधी मिळत नाही, अशी वस्तुस्थिती आहे. त्यात पुन्हा नवीन योजना शक्य नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे बालसंगोपनाशिवाय शासनाची कोणतीही योजना अद्याप जाहीर झालेली नाही, चुकीच्या खोट्या मेसेजवर भरोसा ठेवून कोणीही स्वत:ची फसवणूक करुन घेऊ नये, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
काय आहे तो खोटा मेसेज…
१ मार्च २०२० नंतर ज्यांचे दोन्ही पालक किंवा त्यांच्या पालकांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे आणि मुलांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील दोन मुलांना मुख्यमंत्री बाल सेवा योजनेअंतर्गत दरमहा प्रत्येकी चार हजार रुपये मिळणार आहेत. फॉर्म भरून जिल्हा बाल संरक्षण युनिट किंवा जिल्हा परिविक्षा अधिकाऱ्यांकडे जमा करावा. सर्व लोकांना विनंती आहे की, हा फॉर्म कमीत कमी दहा जणांना पाठवावा, जेणेकरुन प्रत्येक बालकाला फायदा होईल. त्यासाठी मुलगा-आईचे एकत्र बॅंक खाते, शिधापत्रिका, आधार कार्ड, शाळेचे ओळखपत्र किंवा मुख्याध्यापकांचे बोनाफाईड, वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र, उत्पन्नाचा पुरावा (वार्षिक उत्पन्न साडेसात लाखांपर्यंत) आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसील मध्ये व प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी फॉर्म उपलब्ध आहेत.
बालसंगोपन योजने शिवाय दुसरी योजनाच नाही अधिक जाणून घ्या बाल संगोपन योजनेबद्दल या ओळीला स्पर्श करून
महाराष्ट्र शासनाची बालसंगोपन योजनेशिवाय कोणतीही योजना सुरू नाही. सोशल मिडियावरील खोट्या मेसेजवर कोणीही विश्वास ठेवू नये, कोणत्याही मेसेजची खात्री केल्याशिवाय पुढे प्रसारित करु नये.
🌈मुख्यमंत्री बाल आशिर्वाद योजना खोटी योजना आहे 👇
आपणा सर्वांना विनंती आहे की 01 मार्च 2020 नंतर ज्यांचे दोन्ही पालक किंवा त्यांच्या पालकांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे आणि मुलांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील दोन मुलांना मुख्यमंत्री बाल सेवा योजनेअंतर्गत प्रत्येकी 4000/= दरमहा मिळणार आहेत. हा लाभ जास्तीत जास्त लोकांना द्या.
फॉर्म भरून जिल्हा बाल संरक्षण युनिट/जिल्हा परिविक्षा अधिकारी यांच्याकडे जमा करावा
कार्यालय
सुचना :- सर्व लोकांना विनंती आहे की हा फॉर्म कमीत कमी 10 जणांना पाठवावा जेणेकरुन प्रत्येक बालकाला याची माहिती देऊन फायदा होईल
कागदपत्रे –
1. बाळ आणि आई एकत्र खातात
2. शिधापत्रिका
3. आधार कार्ड (आई आणि मुलासाठी)
4. शाळेचे ओळखपत्र/ मुख्याध्यापकांनी लिहिलेले
5. वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र
6. उत्पन्नाचा पुरावा (72000/75000)
टीप – जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसील आणि जिल्ह्यांमधील तालुके मध्ये फॉर्म उपलब्ध आहेत
ही सूचना शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना द्या🙏🌹
🖕 अशा मथळ्याखाली वरील आशयाचा प्रसारित मेसेज संपूर्णतः खोटा आहे