निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता २ री ते ५ वी च्या सर्व विद्यार्थ्यांच्या मासिक चाचणी नियोजना बाबत Monthly test planning for all students of class 2nd to 5th under Nipun Maharashtra Abhiyan

Monthly test planning for all students of class 2nd to 5th under Nipun Maharashtra Abhiyan

Monthly test planning for all students of class 2nd to 5th under Nipun Maharashtra Abhiyan

Regarding the monthly test planning for all students of class 2nd to 5th under the Nipun Maharashtra Abhiyan….

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Join Now

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

दि./१२/२०२५

जा.क्र. राशैसंप्रप/मभावि/निपुण/२०२५-२६

विषय – निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता २ री ते ५ वी च्या सर्व विद्यार्थ्यांच्या मासिक चाचणी नियोजना बाबत….

संदर्भ- १) राष्ट्रीय शिक्षण धोरण – २०२०

२) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०२१/प्र.क्र.१७९/ एसडीई-६, दिनांक २७ ऑक्टोबर २०२१ ३) शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांचेकडील पत्र दि.२० ऑगस्ट २०२४ (निपुण भारत उपक्रम सुधारित लक्ष्ये)

४) प्रस्तुत कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/निपुण भारत अभियान / २०२४-२५/०५२२५ दि. २५ ऑक्टोबर २०२४

५) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०२१/प्र.क्र.१७९//एसडीई-६, दिनांक ०५ मार्च, २०२५ ६) प्रस्तुत कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/निपुण भारत अभियान/२०२५-२६/दि.२० ऑगस्ट २०२५

निपुण गुणवत्ता विकास अभियान कर्तव्यात कसुर जिल्हा परिषद सेवेतून शिक्षक निलंबित वाचा या ओळीला स्पर्श करून

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये, भारत सरकार यांच्या निपुण भारत अभियानांतर्गत इयत्ता २ री पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सन २०२६-२७ पर्यंत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्ये प्राप्त करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सद्यस्थितीत प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आल्याने इयत्ता दुसरी ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी निपुण महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत असून या अंतर्गत मार्च २०२५ ते जून २०२५ दरम्यान राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांची अध्ययनस्तर चाचणी घेऊन त्याची माहिती VSK chatbot वर भरलेली आहे.

Monthly test planning for all students of class 2nd to 5th under Nipun Maharashtra Abhiyan
Monthly test planning for all students of class 2nd to 5th under Nipun Maharashtra Abhiyan

तसेच ऑगस्ट २०२५ ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान “निपुण महाराष्ट्र (एससीईआरटीएम) अॅप मध्ये पर्यवेक्षीय यंत्रणेतर्फे पुनर्चाचणी नोंदी करण्यात आलेल्या आहेत. सदर पुनर्चाचणीचा अहवाल दिनांक १७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रस्तुत कार्यालयात मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र तसेच प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व) यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आलेला आहे.

सदर अभियानाचा पुढील टप्पा (मासिक मूल्यमापन) सुरु होत असून, त्याची सुनियोजित अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. यासाठी शालेय शिक्षण विभागांतर्गत असलेल्या सर्व शासकीय, शासकीय अनुदान प्राप्त शाळांचा समावेश केलेला आहे. यासाठी आवश्यक पूर्वतयारीच्या अनुषंगाने सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांचा समावेश अॅपमध्ये शालार्थ पोर्टलद्वारे करण्यात आलेला आहे. तथापि चाचणी व मूल्यमापन प्रक्रियेचे अधिक सुलभीकरण होण्यासाठी यातील संबंधितांचा शालार्थ प्रणालीतील नोंदणीकृत संपर्क क्रमांक हाच त्यांचा लॉगिन आयडी असेल. शालार्थ पोर्टल मधील बदलानुसार आता शिक्षक व मुख्याध्यापक याची शाळा व इतर माहिती अॅपमध्ये दिसणार आहे. कार्यक्रमाचे नियोजन पुढील प्रमाणे असेल,

निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता २ री ते ५ वी च्या सर्व विद्यार्थ्यांच्या मासिक चाचणी नियोजना बाबत Monthly test planning for all students of class 2nd to 5th under Nipun Maharashtra Abhiyan
निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता २ री ते ५ वी च्या सर्व विद्यार्थ्यांच्या मासिक चाचणी नियोजना बाबत Monthly test planning for all students of class 2nd to 5th under Nipun Maharashtra Abhiyan

वरील नमूद कालावधी व तारखेनंतर “निपुण महाराष्ट्र (एससीईआरटीएम) अॅपमध्ये” चाचणी घेण्याची सुविधा बंद केली जाईल व त्यानंतर शिक्षकांना चाचणी घेता येणार नाही, ठराविक कालावधीतच चाचणी व नोंदणी पूर्ण होईल याची खात्री करावी. डिसेंबर व्यतिरिक्त या शैक्षणिक वर्षात अध्ययनस्तर चाचणी व नोंदणी प्रक्रिया पुढील वेळापत्रकाप्रमाणे पूर्ण करण्यात यावी.

अ.क्र. महिना कालावधी

१ जानेवारी

१९ जानेवारी ते २४ जानेवारी २०२६

२ फेब्रुवारी

२३ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२६

३ मार्च

२३ मार्च २८ मार्च २०२६

शिक्षक, मुख्याध्यापक व पर्यवेक्षकीय यंत्रणा यांना झालेल्या कामाचे/नोंदीचे अहवाल व विश्लेषण “निपुण महाराष्ट्र (एससीईआरटीएम) अॅपमध्येच” तात्काळ उपलब्ध होतात. जिल्हा पातळीवरील सर्व यंत्रणेस स्वतंत्र डॅशबोर्ड उपलब्ध होणार असल्याने याचा वापर, पाठपुरावा व कृती आराखड्यासाठी करता येईल. पर्यवेक्षकीय यंत्रणेची विश्लेषणाच्या कामकाजासाठी लागणाऱ्या वेळेचीही बचत होईल. अॅपमध्ये वरीलप्रमाणे सर्व माहिती अद्ययावत केल्यानंतर शिक्षकांना व मुख्याध्यापकांनाही पर्यवेक्षक पुनर्चाचणीचा शाळानिहाय (ऑगस्ट २०२५) अहवाल देखील पाहता येणार आहे.

राज्यातील सर्व शाळांची निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत अध्ययनस्तर चाचणी व नोंदणी सुरु होत असल्याने वरीलप्रमाणे कार्यवाही होणे आवश्यक आहे. सदरील प्रक्रिया पूर्ण असलेल्या शाळेच्या शिक्षक व मुख्याध्यापकांनाच निपुण महाराष्ट्र (एससीईआरटीएम) या अॅपचा वापर सुयोग्य रीतीने करता येईल याची नोंद घ्यावी. पर्यवेक्षकीय यंत्रणेने आपल्या अधिनस्त शाळांची वरीलप्रमाणे कार्यवाही होईल याची खात्री करावी.

सोबत _ प्रपत्र १: संपूर्ण प्रक्रिया (क्रमशः) तक्ता.

प्रपत्र २: शालार्थ २.० मध्ये संपर्क नोंदणीसाठी मुख्याध्यापकांना मार्गदर्शनपर डेमो व्हिडीओ.

Date: 09-12-2025
22:49:59 (राहूल रेखावार भा.प्र.से.)

संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,
महाराष्ट्र, पुणे.

निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता २ री ते ५ वी च्या सर्व विद्यार्थ्यांच्या मासिक चाचणी नियोजना बाबत Monthly test planning for all students of class 2nd to 5th under Nipun Maharashtra Abhiyan
निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता २ री ते ५ वी च्या सर्व विद्यार्थ्यांच्या मासिक चाचणी नियोजना बाबत Monthly test planning for all students of class 2nd to 5th under Nipun Maharashtra Abhiyan

Nipun Maharashtra SCERTM App Link

निपुण महाराष्ट्र (एससीईआरटीएम)
अॅप लिंकः

https://play.google.com/store/apps/details?id=com.nipun

प्रपत्र २

शालार्थ २.० येथे मुख्याध्यापकांनी करावयाची कृती

१. मुख्याध्यापकांनी स्वतःचे शालार्थ आयडी वापरून शालार्थ पोर्टल मध्ये लॉगिन करावे.

२. शालार्थ २.० हा पर्याय निवडावा.

३. येथे स्वतःचा योग्य संपर्क क्रमांक नोंदवावा. (या क्रमांकानेच आपल्याला निपुण महाराष्ट्र (एससीईआरटीएम) अॅप वापरता येणार आहे)

४. शाळेत कार्यरत सर्व शिक्षक शालार्थ पोर्टल मध्ये आपल्याच यु-डायस मध्ये नोंदणीकृत असल्याची खात्री करावी.

५. माहितीच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर डीडीओ-२ यांची मान्यता (approval) घ्यावी.

६. यानंतर २४ तासानी मुख्याध्यापक व शिक्षक निपुण महाराष्ट्र (एससीईआरटीएम) अॅपमध्ये लॉगिन करू शकतील.

पुढील डेमो व्हिडीओ पाहून आपण वरीलप्रमाणे कृती करू शकाल

डेमो व्हिडीओ लिंक (मुख्याध्यापक माहिती अद्ययावत करणे)

https://www.youtube.com/watch?v=j۹۷UJRYCalg

डेमो व्हिडीओ QR Code –

निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता पडताळणीच्या नोंदी करणेबाबत… वाचा या ओळीला स्पर्श करून

निपुण महाराष्ट्र ऍप डाऊनलोड करणेबाबत..( NIPUN MAHARASTRA APP)
विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविणेबाबत.वाचा या ओळीला स्पर्श करून

निपुण महाराष्ट्र SCERTM मोबाईल ऑप्लिकेशन मध्ये आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचे संपर्क क्रमांक अद्यावत करणे बाबत.वाचा या ओळीला स्पर्श करून

Leave a Comment

error: Content is protected !!