Nipun Utsav Karyakram
Nipun Utsav Karyakram
Nipun Utsav Karyakram 2024 Link
Implementation of Nipun Utsav
Implementation of Nipun Utsav by visiting mother parent groups from 26th December 2024 to 11th January 2025 under Nipun Maharashtra Program
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,
दिनांक :- २४/१२/२०२४
विषयः निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत दिनांक 26 डिसेंबर 2024 ते 11 जानेवारी 2025 दरम्यान माता पालक गटांना भेटी देऊन निपुण उत्सव राबविणे बाबत
निपुण भारत अभियान अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी माता पालक गटांची स्थापना करणे व सहभागी करून घेणे याबाबत यापूर्वी आदेशित करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्येही पुणे जिल्ह्यातील प्रत्येक शाळा अंतर्गत, गाव पातळीवर, वाडी, वस्तीवर माता पालक गटाची बांधणी झालेली आहे. राज्यस्तरावरून पाठवण्यात येत असलेल्या आयडिया व्हिडिओच्या मदतीने माता गटाचे कार्य सुरू आहे असे शाळांनी भरलेल्या माता पालक गटाच्या प्राप्त माहिती द्वारा दिसून येते. निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील 26 डिसेंबर 2024 ते 11 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये राज्यभर निपुण उत्सव राबवण्यात येणार आहे.
१) निपुण उत्सव राबवण्याकरिता 26 डिसेंबर 2024 ते 11 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये आपण स्वतः व आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व पर्यवेक्षीय अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख गट साधन व विशेष साधन व्यक्ती, विशेष शिक्षक सर्व साधन व्यक्ती यांनी किमान १० शाळा भेटी कराव्यात.
२) मुख्याध्यापक, शिक्षक समवेत गावात माता पालक गटांना भेटी द्यावेत प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी किमान तीन गावातील सर्व माता पालक गटांना भेट द्यावी. यात माता गटांना भेटून प्रोत्साहन द्यावयाचे आहे आणि त्या करत असलेल्या उल्लेखनीय कामासाठी त्यांचे कौतुक करायचे आहे. निपुणचे लक्ष्य साध्य करण्यासाठी मुलांच्या शिक्षणात माता पालक गटाचा नियमित सहभाग निरंतर राहील यासाठी प्रयत्न करावे.
३) उर्वरित गावात माता पालक गटात, लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, यांच्या समावेत मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका यांनी आपल्या उपलब्ध वेळेनुसार सदर कालावधीमध्ये भेटी द्याव्यात.
४) काही जिल्ह्यात व तालुक्यामध्ये प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे प्रतिनिधी कार्यरत आहेत त्यांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयासोबत संपर्क साधून संयुक्त भेट करावी.
५) माता पालक गटांना भेटी देत असताना माता पालक गटाच्या सदस्या सोबत साप्ताहिक मीटिंग, माता गटांची शालेय मासिक कार्यशाळा, आयडिया व्हिडिओ इत्यादी विषयावर चर्चा करावी.
Nipun Maharashtra Program 2024
सोबत दिलेली प्रश्नावली चर्चा घडवून आणण्याकरिता उपयोगी ठरेल.
(a) प्रत्येक गावात वाडी, वस्तीनिहाय माता पालक गट तयार झाले आहे क? या वर्षांमध्ये झालेल्या गटांचे पुनर्बाधणी मध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या माता या गटांमध्ये सहभागी झाले आहे का?
(b) प्रत्येक माता पालक गटाला प्रत्येक आठवड्यात आयडी व्हिडिओ मिळतात का ?
(c) गावातील सर्व माता पालक गट आठवड्यातून किमान एकदा भेटून आयडिया व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे काम करतात का?
(d) आपल्या मुलांनी निपुण व्हावे याबद्दल मातांना नेमके काय वाटते?
(e) माता पालक गटांसोबत भेटी देणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांनी मातांना आयडिया व्हिडिओ मधील काही टास्क करून दाखवावा.
(f) शिक्षक व इतर मंडळी या माता पालक गटांना कसे सहकार्य करत आहेत याबाबत चर्चा करावी.
(g) प्रत्येक शाळेत निपुण प्रतिज्ञा व निपुणची उद्दिष्ट दर्शनी ठिकाणी लावण्यात आले आहे का हे पाहणे व माता पालक गटासंबंधी शाळेमध्ये माहितीसाठी स्वतंत्र रजिस्टर केले आहे का हे पाहणे.
(h) माता गटात काय काय गमती जमती होतात हे चर्चेतून समजून घेणे.
(i) गटभेटीदरम्यान गटाचे काम दाखवणारे निवडक फोटो व्हिडिओ मातांच्या परवानगीने घेण्याचा प्रयत्न करणे.
(j) वरील सर्व मुद्द्यांचे गावातील माता पालक भेटीदरम्यान चर्चा करावी व या भेटीदरम्यानची आपली चर्चा व निरीक्षणे याबाबत संकलन माहितीचे नोंदणी राज्यस्तरावर दिलेल्या लिंक द्वारे अनिवार्यपणे नोंदवावी.
(k) निपुण उत्सव 2024-25 माहिती संकलन लिंक –
६) माता पालक गटाच्या भेटीच्या संकलित अहवालावर जिल्हा व तालुकास्तरावर चर्चा करण्यात यावी.
संदर्भः १) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय संकीर्ण-2021/प्र.क्र/१७९/ एस.डी. सहा/दिनांक 29/6/22
२) दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता विभाग स्तरावर आयोजित केलेली ऑनलाइन बैठक मध्ये दिल्या गेलेल्या सूचना