Medical Examines All Officers Employees Between Ages Of 40 To 50 And Age 51 Years Above वय वर्ष ४० ते ५० या वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी व वय वर्ष ५१ व त्यावरील वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची दरवर्षी वैद्यकीय तपासणी

Medical Examines All Officers Employees Between Ages Of 40 To 50 And Age 51 Years Above

Medical Examines All Officers Employees Between Ages Of 40 To 50 And Age 51 Years Above

Regarding the adoption of a medical examination policy by officers and employees working in government service

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मुख्यालय व अधिनस्त कार्यालयातील शासकीय सेवेत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांनी वैद्यकीय तपासणी धोरणाचा अवलंब करण्याबाबत..

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन परिपत्रक क्र. मावज-२०२५/प्र.क्र.८९/ मावज-२(३४-अ), मंत्रालय, मुंबई-४०००३२.

दिनांक:- १७ जुलै, २०२५.

वाचा :- शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग क्र. वैतधो-२०२१/प्र.क्र.३७/ आरोग्य-३, दि.२२ एप्रिल, २०२२

       परिपत्रक

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक २२.०४.२०२२ अन्वये शासकीय सेवेत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांनी वैद्यकीय तपासणी धोरणाचा अवलंब करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनाचे पालन करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयास खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे. :-

अ) संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक २२.०४.२०२२ अन्वये देण्यात आलेल्या सूचनांनुसार माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मुख्यालय व अधिनस्त कार्यालयातील शासकीय सेवेत कार्यरत असलेले वय वर्ष ४० ते ५० या वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा व वय वर्ष ५१ व त्यावरील वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी अनुज्ञेय राहील व वैद्यकीय तपासणीकरीता रु. ५०००/- याप्रमाणे इतक्या रकमेपर्यतच्या खर्चाची प्रतिपूर्ती प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना अदा करण्याबाबत शासन मान्यता देण्यात आली आहे.

शासन परिपत्रक क्रमांकः मावज-२०२५/प्र.क्र.८९/ मावज-२(३४-अ)

ब) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मुख्यालय व अधिनस्त कार्यालयातील शासकीय सेवेत कार्यरत असलेले वय वर्ष ४० पूर्ण केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्याबाबत उपरोक्त शासन निर्णयातील परिच्छेद ३ मधील सूचनांचे काटेकोरपणे पालन करून लाभ घेण्यात आलेल्या अधिकारी/कर्मचारी यांचा वर्षनिहाय अहवाल संबंधित कार्यालय प्रमुखानी / विभाग प्रमुखांनी शासनास सादर करावा.

क) संदर्भाधीन शासन निर्णयाचे काटेकोर पणे पालन करून वैद्यकीय तपासणी झाल्याची नोंद अधिकारी व कर्मचारी यांच्या गोपनीय अहवालात शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे घेण्यात यावी.

२. उक्त संदर्भाधीन शासन निर्णयातील तरतुदीच्या अनुषंगाने महासंचालनालयाच्या मुख्यालयातील व अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या निदर्शनास शासन निर्णयातील तरतुदी आणून त्यांचे काटेकोरपणे पालन होईल, याची खातरजमा करावी.

३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०२५०७१७१६१५००२१०७ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

शासन परिपत्रक पीडीएफ लिंक 

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन


सामान्य प्रशासन विभाग
शासन परिपत्रक क्र. मावज-२०२५/प्र.क्र.८९/ मावज-२(३४-अ), मंत्रालय, मुंबई-४०००३२.

Medical examination of all government officials and employees between the ages of 40 and 50 and Age 51 years above

IMG 20250821 145613
Medical Examines All Officers Employees Between Ages Of 40 To 50 And Age 51 Years Above

Leave a Comment

error: Content is protected !!