दिनांक ०८ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व शाळामध्ये मातांचा सन्मान सोहळा आयोजित करणे बाबत Matancha Sanman sohla

Matancha Sanman sohla

Matancha Sanman sohla

Jagtik mahila Din Sarv Shala Madhye Matancha Sanman sohla aayojan mpsp guideline

Organizing a ceremony to honor mothers in all schools

Regarding organizing a ceremony to honor mothers in all schools on the occasion of International Women’s Day on March 8, 2026.

WhatsApp Channel Follow Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now

समग्र शिक्षा
निपुण भारत
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई

तात्काळ/महत्त्वाचे/प्राधान्याने.

जा.क्र. मप्राशिप/सशि/FLN/कास/२०२५-२६/७८९ दि.
6 MAR 2026

प्रति,

१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग

२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, सर्व.

३) प्रशासन अधिकारी/शिक्षणाधिकारी महानगरपालिका सर्व.

विषय : दिनांक ०८ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व शाळामध्ये मातांचा सन्मान सोहळा आयोजित करणे बाबत.

संदर्भ

: १) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय, क्र. संकीर्ण- २०२१/ प्र.क्र.१७९/एसडी-६, दि. २९ जून २०२२.

२)या कार्यालयाचे पत्र जा.क्र. मप्रशिप/सशि/FLN/कास/२०२५-२६/२०५६, दिनांक १४ जुलै २०२५.

यांना दिला जातो ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार अधिक वाचा या ओळीला स्पर्श करून

निपुण महाराष्ट्र कार्यक्रमातंर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाच्या अनुषंगाने मुलांच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये मातांचा सहभाग केल्यामुळे राज्यात निपुण माता-पालक गट कार्यक्रम यशस्वीरित्या सुरु आहे. मुलांच्या शिक्षणात मातांचा सहभागाने शाळा, माता गट व ग्रामस्थ या मुख्य घटकांच्या पुढाकाराने गावात शैक्षणिक वातावरण तयार झाल्याचे दिसून येत आहे. या करीता प्रत्येक शाळेने इयत्ता १ ली ते ३ री च्या विद्यार्थ्यांच्या मातांचे वाडी-वस्ती निहाय माता-पालक गट बांधणी करून शिक्षणात सक्रीय सहभाग होण्यास सदर गटांचे कार्य सुरु आहे.

🤵‍♀️ जागतिक महिला दिन प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक📃प्रमाणपत्र तात्काळ📥डाऊनलोड करा या ओळीला स्पर्श करून

सदर कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणी करीता प्रत्येक शाळेअंतर्गत वाडी-वस्ती निहाय असलेल्या निपुण माता गटाचा अधिक सक्रीय सहभाग होण्यासाठी सर्व शाळांमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शाळा स्तरावर माता गटांना एकत्र करून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव ग्रामस्थांसमोर करावयाचा आहे. माता गटांना सन्मानित करून त्यांच्या कल्पना व त्यांनी मुलांच्या शिक्षणात वाढविलेल्या सक्रीय सहभागाबद्दल गावातील नागरिकांना माहिती देणे, जेणेकरून प्रत्येक मूल निपुण होण्यासाठी मदत होईल, महाराष्ट्रातील प्रत्येक मूल निपुण करण्यास महिला दिनानिमित्त माता-पालक गटाच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन प्रत्येक शाळा स्तरावर करावे.

😀 काय सांगता, जागतिक पुरुष दिन केव्हा असतो माहित आहे ? मग जाणून घ्या या ओळीला स्पर्श करून

शाळा स्तरावर जागतिक महिला दिनानिमित्त मातांचा सन्मान सोहळा व उपक्रमाचे आयोजन पुढील प्रमाणे करावे.

१. गावातील सर्व मातांना व ग्रामस्थांना शाळा स्तरावर निमंत्रित करावे,

२. सदर कार्यक्रमात प्रत्येक गटाच्या लीडर मातांना आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी देण्यात यावी.

३. आदर्श माता-पालक गट संकल्पना व्हिडिओ दाखवणे व आदर्श गटा बाबत गटचर्चा करणे,

४. शाळेत शिक्षक/मुख्याध्यापक माता-पालक गटांना, जागतिक महिला दिनानिमित्त थोर महिलांच्या कार्याची यशोगाथा सांगतील. (उदा. राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले इ.)

५. मुलांच्या शिक्षणात मातांचा महत्वपूर्ण सहभाग याबाबत मार्गदर्शन करणे.

६. भाषण – निवडक विद्यार्थ्यांकडून आई बद्दल कृतज्ञता व्यक्त करणे,

७. यशोगाथा – गावातील मातांच्या सहभागामुळे मुलांच्या शिक्षणात झालेले बदल याबाबत एका मातेची यशोगाथा सादर करणे व लिहून पाठवणे.

८. निपुण सखी प्रमाणपत्र निपुण कार्यक्रमात मातांचा उत्कृष्ट सहभागा बद्दल मातांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात यावे.

✍️ जागतिक महिला दिन
निबंधासाठी,भाषणासाठी,स्पर्धा परीक्षांसाठी, सर्व इयत्तांसाठी,माहितीपूर्ण लेख,प्रश्नमंजुषा त्यासाठी या ओळीला स्पर्श करा

सदर कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणीसाठी आपल्या स्तरावर विभाग/जिल्हा/तालुका स्तरावर सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे ऑनलाईन बैठकीचे आयोजन करावे व दिनांक ८ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त शाळास्तरावर माता गटांना निमंत्रित करून शाळा स्तरावर माता-पालक गट सन्मान सोहळ्याचे आयोजन करणेबाबत सूचना देण्यात याव्या. तसेच माता पालक सन्मान सोहळ्याची माहिती निवडक बोलक्या फोटोसहीत व सन्मान सोहळा संबंधित अहवाल या कार्यलयास सादर करावा. कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी निवडक बोलके फोटो व लिखित अनुभव या कार्यालयाच्या सोशल मिडिया हँडलला Tag करून प्रसारित करण्यात यावे.

(गोविंद कांबळे) 6/3/2026

परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक

राज्य प्रकल्प समन्वयक मप्राशिप मुंबई

माहितीस्तव सविनय सादर

१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.

२. मा. आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे.

३. मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे.

Matancha Sanman sohla
Matancha Sanman sohla

Leave a Comment

error: Content is protected !!