सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील इयत्ता ६ वी ते १२ वी मधील किशोरवयीन मुलींना मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणेबाबत मार्गदर्शक सूचना Mofat Sanitary Pad

mulinna mofat sanitary pad upalabdha karun denebabat margadarshak suchana

sarv shasakiy v sthanik swarajya sansthanchya shalanteel iyatta 6 vi te 12 vi madhil kishorvayin mulinna mofat sanitary pad upalabdha karun denebabat margadarshak suchana

Guidelines for providing free sanitary pads to adolescent girls from classes 6 to 12 in all government and local government schools

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षा विभाग समग्र शिक्षा
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई

जा.क्र.मप्राशिप/समग्र-पीएमश्री/Sanitary Napkins/२०२६-२७/२५४०

दिनांक: 31 JUL 2026

प्रति,
१) आयुक्त, महानगरपालिका, सर्व.
२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.

   विषय : सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील इयत्ता ६ वी ते १२ वी मधील किशोरवयीन मुलींना मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणेबाबत मार्गदर्शक सूचना

संदर्भ : दि. २०/०५/२०२६ रोजीच्या भारत सरकारच्या प्रकल्प मान्यता मंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त

मा. सर्वोच्च न्यायालयाने दि ३०/०१/२०२६ रोजी दिलेल्या निकालामध्ये “सन्मानजनक मासिकपाळी विषयक आरोग्याचा अधिकार” हा संविधानाचा अनुच्छेद २१ अंतर्गत जीवनाचा व सन्मानाने जगण्याचा मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे.

मुलींचे आरोग्य, शिक्षण, सन्मान आणि सुरक्षित भविष्य यासाठी मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन (Menstrual Hygiene Management) अत्यंत आवश्यक आहे.

मुलींच्या शिक्षणातील सातत्य, शालेय उपस्थिती वाढविणे, आरोग्य संवर्धन यासाठी पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहे.

१. जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय प्रकार – २ व शासकीय शाळांमधील इयत्ता ६ वी ते १२ वीतील किशोरवयीन मुलींना मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्यात यावेत.

२. प्रत्येक विद्यार्थिनीसाठी वार्षिक रु. ३००/- इतका निधी केंद्रशासनाकडून मंजूर करण्यात आला आहे.

३. शाळास्तरावरुन किशोरवयीन मुलींना सॅनिटरी पॅड उपलब्ध करुन देण्यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्यामार्फत शाळा व्यवस्थापन समितीच्या (SMC) खात्यात निधी वर्ग करण्यात येणार आहे.

४. भारतीय मानक ब्युरो (BIS) चे ISI चिन्ह असलेले सॅनिटरी पॅड वापरासाठी सुरक्षित आहेत. सबब, ISI चिन्ह असलेले सॅनिटरी पॅड आवश्यकतेनुसार खरेदी करावेत.

५. प्रत्येक महिन्याला सर्व पात्र विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅडचे नियमित वितरण करुन त्याचा वापर होत असल्याचे सुनिश्चित करावे. शाळा व्यवस्थापन समितीने (SMC) सदर उपक्रमाचे संनियंत्रण करावे

६. वितरणाबाबत स्वतंत्र नोंदवही ठेवून विद्यार्थिनींचे नाव, इयत्ता, वितरण दिनांक, वाटप केलेल्या सॅनिटरी पॅडची संख्या, विद्यार्थीनी स्वाक्षरी व शिल्लक साठा याची माहिती नोंदविण्यात यावी.

७. प्रत्येक शाळेमध्ये मुलीसाठी स्वतंत्र, सुरक्षित व स्वच्छ स्वच्छतागृह तसेच वापरलेल्या सॅनिटरी पॅडच्या विल्हेवाटीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात.

८. आरोग्य विभागाच्या सहकार्याने मासिक पाळी स्वच्छता, आरोग्य व जनजागृती विषयक विनामूल्य कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्यात यावेत.

मोफत सॅनिटरी पॅड योजनेचा उद्देश विद्यार्थिनींची शाळेतील उपस्थिती वाढविणे, मासिक पाळीमुळे होणारी अनुपस्थिती कमी करणे, मुलींचे आरोग्य व स्वच्छता सुधारणे, शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे, मुलींच्या सन्मान, सुरक्षितता व आत्मविश्वासात वाढ करणे तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करणे असा आहे.

सबब मोफत सॅनिटरी पॅड उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी.

संजय यादव (से) 31/7/2026

राज्य प्रकल्प संचालक

म.प्रा.शि.प., मुंबई

प्रत माहितीस्तव :

१) आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

२) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण

संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

३) शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

प्रत पुढील कार्यवाहीस्तव :

१) विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग, मुंबई

२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्व)

३) शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी/शिक्षण प्रमुख, महानगरपालिका (सर्व)

सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील इयत्ता ६ वी ते १२ वी मधील किशोरवयीन मुलींना मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणेबाबत मार्गदर्शक सूचना Mofat Sanitary Pad
सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील इयत्ता ६ वी ते १२ वी मधील किशोरवयीन मुलींना मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणेबाबत मार्गदर्शक सूचना Mofat Sanitary Pad

Leave a Comment

error: Content is protected !!