लेक वाचवा लेक शिकवा अभियान Lek Vachava Lek Shikava Abhiyaan

Lek Vachava Lek Shikava Abhiyaan

Lek Vachava Lek Shikava Abhiyaan

Lek Vachava Lek Shikava Abhiyaan GR

Beti Bachao Beti Padhao

Save the girl child, educate the girl child

Save Girl Teach girl

Regarding the implementation of the Gyanjyoti Savitribai Phule “Save Lakes, Teach Lakes” campaign in schools from January 3rd to January 26th.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Join Now

क्र. शिसंमा/संकीर्ण-सा. फुले.ले. वा. ले. शि.अभियान/२०२६/विद्याशाखा/ए-२/

दिनांक ०१/०१/२०२६

विषय: दि.३ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत शाळांमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले “लेक वाचवा लेक शिकवा” अभियान राबविण्याबाबत..

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना काय आहे जाणून घ्या या ओळीला स्पर्श करून

संदर्भ :
१) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे शासन परिपत्रक क्र. संकीर्ण २०१६/प्र.क्र.१-एस.डी.-४, दि.२/१/२०१६.
२) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे शासन परिपत्रक क्र. संकीर्ण २०१६/प्र.क्र.३७६/एस.डी.-४, दि.३०/१२/२०१६.
३) मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. लेक शिकवा/२०१६-१७/ड-५१६, दि.३१/१२/२०१६.
४) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२०/प्र.क्र.२३०/एस.डी.-४, दि.२४/१२/२०२०.
५) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे पत्र क्र. संकीर्ण-२०२५/प्र.क्र.१७/एस.डी.-४, दि.३०/०१/२०२५.
६) शासन पत्र क्र. संकीर्ण २०२५/प्र.क्र.१-एस.डी.-४, दि. ३१/०१/२०२५.
७) मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. आस्था-क/टे.क्र.प्राथ/शा.प/१६०१/२०२५/८७८, दि.२०/२/२०२५.
८) सामान्य प्रशासन विभागाचे शासन परिपत्रक क्र.जपुती-२०२५/प्र.क्र१९५/कार्या-जपुक (२९), दि.२९/१२/२०२५.

उपरोक्त विषयाबाबतच्या संदर्भिय शासन परिपत्रक, शासन निर्णय तसेच पत्रांचे अवलोकन करावे. सावित्रिबाई फुले यांच्या महान शैक्षणिक कार्याची ओळख शाळांतील विद्यार्थ्यांना व्हावी व त्यांच्या कार्यापासून प्रेरणा मिळावी यासाठी राज्यातील सर्व शाळांमधून “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा, लेक शिकवा” अभियान राबविण्याचा निर्णय संदर्भ क्र.१ चे दि.०२/०१/२०१६ चे शासन परिपत्रकान्वये घेण्यात आला. (प्रत संलग्न) त्यानुसार हे अभियान दरवर्षी दि.०३ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येते.

Savitribai Phule Quiz With Certificate क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवन चरित्र व कार्यावर प्रश्नमंजुषा सोडवा आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त करा या ओळीला स्पर्श करून

सदर परिपत्रकान्वये निर्देश दिल्यानुसार, बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ नुसार प्रत्येक बालकास समान गुणवत्तेचे मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्याची कायदेशीर तरतूद आहे. त्यानुसार राज्यात मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी, मुलीच्या शिक्षणाला गती मिळावी, एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, मुलींच्या शिक्षणाला प्रतिष्ठा आणि गुणात्मक दर्जाचे अधिष्ठान लाभावे, परिस्थितीमुळे मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये, शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणे, स्थलांतरीत पालकांच्या मुलींच्या अखंडीत शिक्षणाची हमी देणे, मुलींना शिक्षणाची प्रेरणा देणे, त्यांच्यात आत्मविश्वास रुजविणे, वैचारिक व तार्किक क्षमता निर्माण करणे, शारीरिक क्षमता वाढीस लावणे, त्यांच्या सृजनशिलतेस वाव देणे तसेच विशेष करुन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणातील विद्यार्थिनींची गळती कमी होणे यासाठी “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा, लेक शिकवा” अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार सम्पूर्ण माहिती जाणून घ्या या ओळीला स्पर्श करून

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्या उद्देशाने स्त्री शिक्षणास सुरुवात केली तो उद्देश केंद्रिभुत ठेवून “लेक वाचवा, लेक शिकवा” या अभियानांतर्गत दि.०३ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
तसेच शासन परिपत्रक दि.२९/१२/२०२५ अन्वये सन २०२६ मध्ये राष्ट्र पुरुष थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिनांचे कार्यक्रम सोबत असलेल्या परिशिष्टानुसार साजरे करण्याबाबत आपल्या अधिनस्त कार्यालयांस तसेच सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये साजरे करण्यासाठी कळविण्यात यावे.

प्रत संलग्न पीडीएफ प्राप्त करा या ओळीला स्पर्श करून

शिक्षण उपसंचालक
माध्यमिक व उच्च माध्यमिक, शिक्षण संचालनालय महा.राज्य पुणे.

Lek Vachava Lek Shikava Abhiyaan दि.३ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत शाळांमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले "लेक वाचवा लेक शिकवा" अभियान राबविण्याबाबत.
Lek Vachava Lek Shikava Abhiyaan दि.३ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत शाळांमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले “लेक वाचवा लेक शिकवा” अभियान राबविण्याबाबत.

दिनांक ३ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत शाळांमध्ये “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा लेक शिकया” अभियान राबविण्याचावत.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्र. संकीर्ण २०१६/प्र.क्र.१-एस.डी. मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु मार्ग, मंत्रालय, मुंबई- ४०००३२

दिनांक:- ०२ जानेवारी, २०१६

            परिपत्रकः

“विद्या है धन आहे रे, श्रेष्ठ सान्या धनाडून, तिचा साठा जयापासी, आहे तो खरा धनवान’ अशा शब्दात शिक्षणाचे महत्व सांगून, श्री शिक्षणासाठी अहोरात्र ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी पो कार्य केले त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. अज्ञान, अनिष्ट रुढी व परंपरांच्या विळख्यात गुरफटलेल्या समाजात बीकडे तुच्छ व उपभोग्य वस्तु म्हणून पाहिले जात होते. अशा काळात समाजाची यक्रदृष्टी स्वीकारुन सियांना चूल व मूल यातून बाहेर काढण्यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढून सामाजिक परिवर्तन घळपळीचा पाया घातला. सावित्रीबाई यांच्या महान शैक्षणिक कार्याची ओळख शाळांतील विद्यार्थ्यांना व्हावी व त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी यासाठी राज्यातील सर्व शाळांमधून “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा लेक शिकया” अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. हे अभियान दरवर्षी दिनांक ०३ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात यावे.

“सत्यशोधक” हा मराठी चित्रपट राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना दाखविण्यास परवानगी जाणून घ्या या ओळीला स्पर्श करून

बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ नुसार प्रत्येक बालकास समान गुणवतेचे मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्याची कायदेशीर तरतूद आहे. त्यानुसार राज्यात मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी, गुलीच्या विशक्षणाला गती मिळावी, एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, मुलींच्या शिक्षणाला प्रतिष्ठा आणि गुणात्मक दर्जाचे अधिष्ठान लाभाये, परिस्थितीमुळे मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये, शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणे, स्थलांतरीत पालकांच्या मुलींच्या अखंडीत शिक्षणाची हमी देणे, मुलींना शिक्षणांची प्रेरणा देणे, त्यांच्यात आत्मविश्वास रुजविणे, वैचारिक व तार्किक क्षमता निर्माण करणे, शारीरिक क्षमता वाढीस लावणे, त्यांच्या सृजनशिलतेस थाय देणे तसेच विशेष करून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणातील विद्यार्थिनींची गळती कमी होणे यासाठी ‘ज्ञानज्योती सावित्रिबाई फुले लेक वाचवा लेक शिकवा’ अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्या उद्देशाने श्री शिक्षणास सुरुवात केली तो प्रदेश केंद्रिभूत ठेवून “लेक शिकवा लेक वाचवा” या अभियानांतर्गत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०१६०१०२१०५९२२८९२१ असा आहे. है परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नाथाने.

परिपत्रकः पीडीएफ प्राप्त करा या ओळीला स्पर्श करून

उपसचिव, महाराष्ट्र शासन

Lek Vachava Lek Shikava Abhiyaan दिनांक ३ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत शाळांमध्ये "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा लेक शिकया" अभियान राबविण्याचावत.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्र. संकीर्ण २०१६/प्र.क्र.१-एस.डी.
दिनांक ३ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत शाळांमध्ये “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा लेक शिकया” अभियान राबविण्याचावत. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्र. संकीर्ण २०१६/प्र.क्र.१-एस.डी.

Leave a Comment

error: Content is protected !!