Rashtra Purush Thor Vykti Jayanti Rashtriy Din 2026
Rashtra Purush Thor Vykti Jayanti Rashtriy Din 2026
Regarding the celebration of the birth anniversary and National Day of the national hero/great person in the year 2026.
सन २०२६ मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत.
दिनांकः २९ डिसेंबर, २०२५.
संदर्भ: सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र. GAD-49022/50/2024-GAD(DESK-29), दिनांक १०.०१.२०२५.
परिपत्रक :-
सन २०२६ मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिनांचे कार्यक्रम सोबत जोडलेल्या परिशिष्टानुसार मंत्रालयात व सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयात साजरे करण्यात यावेत.
२. परिशिष्टात दर्शविलेले कार्यक्रम सार्वजनिक सुट्टी, साप्ताहिक सुट्टी (शनिवार व रविवार) आणि स्थानिक सुट्टीच्या दिवशी येत असतील आणि या संदर्भात केंद्र शासनाने कार्यक्रमात बदल सुचविल्यास त्याप्रमाणे साजरे करण्यात यावेत, अन्यथा ते कार्यक्रम त्याच दिवशी साजरे करण्यात यावेत.
सार्वजनिक सुट्ट्या २०२६ Public Holidays 2026 Declared सार्वजनिक सुट्ट्या राजपत्र पीडीएफ मध्ये प्राप्त करा या ओळीला स्पर्श करून
३. विभागीय आयुक्त / जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील / जिल्हयातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयात सदर कार्यक्रम आयोजित करण्याबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित करुन त्यांच्या अंमलबजावणीबाबत योग्य ती कार्यवाही करावी.
तसेच सदर शासन परिपत्रक सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयाबरोबरच राज्यातील सर्व महाविद्यालये व सर्व शाळा यांनाही लागू राहील.
४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२५१२२९१६०४५८९१०७ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,
उप सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक: जपुती-२०२५/प्र.क्र.१९५/कार्या-जपुक (२९)
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र. जपुती-२०२५/प्र.क्र.१९५/कार्या-जपुक (२९), दि.२९.१२.२०२५ चे परिशिष्ट सन २०२६ मध्ये मंत्रालय, शासकीय / निमशासकीय कार्यालयात साजरे करावयाच्या जयंती / राष्ट्रीय दिन कार्यक्रमांची यादी
